मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Red sandalwood | भारतातील 'लाल सोनं', ज्यासाठी झाला होता रक्तपात! का होते इतकी तस्करी?

Red sandalwood | भारतातील 'लाल सोनं', ज्यासाठी झाला होता रक्तपात! का होते इतकी तस्करी?

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रतिकात्मक छायाचित्र

अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा 'पुष्पा: द राईज' (Pushpa: The Rise) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालला आहे. रक्त चंदन (Red sandalwood) तस्करीवर या चित्रपटाचे कथानक आहे. लाल चंदनाविषयी (Red Sanders) तुम्हाला किती माहिती आहे? यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तपातही झालाय.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 29 डिसेंबर : दाक्षिणात्य चित्रपट (South Movies) आपल्या हटके कथानकांच्या जोरावर कायमच बॉलिवूड चित्रपटांना जोरदार टक्कर देत असतात. असाच एक साउथचा चित्रपट सध्या तिकीट बारीवर धुमाकूळ घालत आहे. स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या भूमिका असलेलाल 'पुष्पा: द राईज' (Pushpa: The Rise) हा चित्रपट लाल चंदन (Red sandalwood) तस्करीवर आधारीत आहे. भारतात विशेष ठिकाणी आढळणाऱ्या लाल चंदनाच्या (Red Sanders) लाकडाला खूप महत्त्व आहे. रक्तचंदनाच्या तस्करीवरुन मोठा रक्तपातही झाला आहे.

टेरोकार्पस सेन्टेन्स (Pterocarpus santalinus) या वैज्ञानिक नावाने ओळखले जाणारे रक्तचंदन हे आंध्र प्रदेशातील जंगलांमध्ये आढळणारे एक झाड आहे, ज्यामुळे तेथे खूप रक्तपातही झाला आहे. चीनमध्ये या झाडाला विशेष मागणी असून, त्यासाठी तस्करीही केली जाते. या झाडांच्या संरक्षणासाठी एक विशेष टास्क फोर्स तैनात करण्यात आला आहे, यावरुन तुम्हाला याचं महत्व समजेल. काय आहे या रक्त चंदनाचं महत्व चला जाणून घेऊ.

फर्निचरपासून औषधापर्यंत रक्त चंदनाचा वापर

आंध्र प्रदेशच्या शेषाचलम पर्वतरांगांमध्ये आढळणारे लाल चंदनाचे झाड हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. जे शैव आणि शाक्त श्रद्धेवर विश्वास ठेवतात ते पूजेत या लाकडाचा वापर करतात. रक्तचंदनाला पांढर्‍या चंदनासारखा सुगंध नसतो. ते खूप प्रभावी आहे. औषधी गुणधर्मांसोबतच सौंदर्य वाढवण्यासाठीही याचा उपयोग होतो.

खूप महाग किंमत, सुरक्षेसाठी आंतरराष्ट्रीय करार

महागडे फर्निचर, सजावटीच्या कामासाठीही रक्तचंदनाच्या लाकडाला मोठी मागणी आहे. यासोबतच हे दारू आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये देखील पूर्णपणे वापरले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याच्या लाकडाची किंमत खूप जास्त आहे. आंतरराष्ट्रीय करारानुसार चंदनाच्या झाडांच्या संरक्षणाची जबाबदारी भारताची आहे.

शेषाचलम जंगलाशिवाय जगात कुठेही ही झाडे वाढत नाहीत

तमिळनाडू राज्याच्या सीमेलगत असलेल्या आंध्र प्रदेश राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या शेषाचलमच्या टेकड्यांवरच हे झाडं उगवतं. यात नेल्लोर, कुरनूल, चित्तूर, कडप्पाह जिल्ह्यांचा समावेश आहे. या झाडाची सरासरी उंची 8 ते 11 मीटर पर्यंत असते. त्याची घनता खूप जास्त असल्याने ते पाण्यात बुडते. हे लाल चंदनाच्या लाकडाचे वैशिष्ट्य आणि ओळखही आहे.

In Pics : 'Pushpa'च्या सक्सेस पार्टीत Rashmika Mandanna चा ग्लॅमरस लूक

मोठ्या प्रमाणावर तस्करी, सापडल्यास 11 वर्षे तुरुंगवास

रक्तचंदनाची तस्करीही मोठ्या प्रमाणावर होते. सव्वादोन लाख हेक्टरमध्ये पसरलेल्या शेषाचलमच्या टेकड्यांवरील अनेक भागात या विशेष लाकडांची संख्या 50 टक्क्यांनी कमी झाली आहे. पाच वर्षांपूर्वी 2015 मध्ये 20 तस्कर चकमकीत मारले गेले होते. यानंतर मोठ्या प्रमाणात तस्करांना अटकही करण्यात आली. चंदनाची तस्करी करताना आढळल्यास 11 वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे.

चीनमध्ये चंदनाच्या लाकडाला सर्वाधिक मागणी

सध्या चीनमध्ये लाल चंदनाची मागणी सर्वाधिक आहे. कारण, चौदाव्या शतकापासून ते सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत मिंग राजघराण्याच्या राज्याच्या काळापासून रक्तचंदनाची लोकप्रियता कायम आहे. चायना डेली या इंग्रजी वृत्तपत्रानुसार, मिंग राजघराण्यातील शासकांना लाल चंदनापासून बनवलेल्या फर्निचर आणि सजावटीच्या वस्तूंचे इतके शौकीन होते की त्यांनी ते सर्व शक्य ठिकाणांहून मागवले. सध्या चीनमध्ये लाल चंदनाची मागणी सर्वाधिक आहे. कारण, चौदाव्या शतकापासून ते सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत मिंग राजघराण्याच्या राज्याच्या काळापासून रक्तचंदनाची लोकप्रियता कायम आहे. चायना डेली या इंग्रजी वृत्तपत्रानुसार, मिंग राजघराण्यातील शासकांना लाल चंदनापासून बनवलेल्या फर्निचर आणि सजावटीच्या वस्तूंचे इतके शौकीन होते की त्यांनी ते सर्व शक्य ठिकाणांहून मागवले. मिंग राजघराण्यातील आणि त्यानंतरच्या राज्यकर्त्यांमध्ये लाल चंदनाची क्रेझ यावरून लक्षात येते की, 'रेड चंदन संग्रहालय' नावाचे एक खास संग्रहालय आहे ज्यामध्ये लाल चंदनापासून बनवलेल्या असंख्य फर्निचर आणि सजावटीच्या वस्तू आहेत.

‘पुष्पा’च्या क्लायमॅक्समध्ये अल्लू अर्जुन आणि फहाद फास‍िल दिसणार होते ‘न्यूड’

यापूर्वी जपानमध्येही याला मोठी मागणी होती जिथे लाल चंदनाचे लाकूड पारंपरिक वाद्य शमिशेन बनवण्यासाठी वापरले जात होते, पण आता ही परंपरा हळूहळू नष्ट होत आहे, त्यामुळे तिची मागणीही कमी होत आहे." रक्तचंदनाच्या लाकडाची तस्करी रस्ता, पाणी, हवाई या तिन्ही मार्गाने केली जाते. कधी कधी पकडले जाऊ नये म्हणून पावडरच्या स्वरूपात त्याची तस्करी केली जाते. चीन, जपान, सिंगापूर, यूएई, ऑस्ट्रेलियासह इतर अनेक देशांमध्ये या लाकडांना मागणी आहे. मात्र, सर्वाधिक मागणी चीनमध्ये आहे. येथेच सर्वात जास्त तस्करी होते. फर्निचर, सजावटीच्या वस्तू, पारंपरिक वाद्ये तयार करण्यासाठी या लाकडाला जास्त मागणी आहे.

First published:

Tags: Allu arjun, Rashmika mandanna, Smuggling