मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /‘पुष्पा’च्या क्लायमॅक्समध्ये ऐनवेळी बदल! अल्लू अर्जुन आणि फहाद फास‍िल दिसणार होते ‘न्यूड’

‘पुष्पा’च्या क्लायमॅक्समध्ये ऐनवेळी बदल! अल्लू अर्जुन आणि फहाद फास‍िल दिसणार होते ‘न्यूड’

साउथचा स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) याचा 'पुष्पा: द राईज' (Pushpa: The Rise) नावाचा चित्रपट सध्या चित्रपटगृहात धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटासंदर्भात आता नवीन माहिती समोर आली आहे. दिग्ददर्शक सुकुमार यांनी सांगितले की, पुष्पाच्या क्लायमॅक्समध्ये अल्लू अर्जुन आणि फहाद फास‍िल (Fahadh Faasil) या दोघांना न्यूड दाखवण्याचा विचार केला होता. मात्र, हा सीन का काढून टाकला?

पुढे वाचा ...

  मुंबई, 27 डिसेंबर : दाक्षिणात्य चित्रपटांनी (South Movies) आपल्या हटके कथानकांच्या जोरावर कायमच बॉलिवूड चित्रपटांना जोरदार टक्कर दिलेली आहे. सध्या साउथचा स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) याचा 'पुष्पा: द राईज' (Pushpa: The Rise) नावाचा चित्रपट रिलिज झाला आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. पुष्पानं रिलीज झाल्यानंतर 10 दिवसांत 200 कोटी रुपयांची कमाई केली आहे. असा अंदाज आहे की, येत्या काही दिवसांत हा चित्रपट 300 कोटींचा टप्पा सहज पार करेल. दररोज या चित्रपटाविषय नवनवीन माहिती येत आहे. आता नवीन माहितीनुसार पुष्पाच्या क्लायमॅक्समध्ये अल्लू अर्जुन आणि फहाद फास‍िल (Fahadh Faasil) या दोघांना न्यूड दाखवण्याचा विचार दिग्दर्शक सुकुमार यांनी केला होता. मात्र, याचं पुढे काय झालं?

  सुकुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या 'पुष्पा' चित्रपटाची सुरुवातीपासूनच प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. समंथाच्या सेन्शुअस आयटम नंबरमुळं सर्वात अगोदर हा चित्रपट चर्चेत आला होता. त्यानंतर आता तरुणींचा लाडका हिरो अल्लू अर्जुन आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या जोडीनं प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. त्यांच्या अभिनय कौशल्याला चांगली दाद मिळत आहे. दिग्दर्शक सुकुमार यांनी तमिळ प्रेक्षकांचा विचार करून या चित्रपटामध्ये ऐनवेळी अनेक बदल केले. या बदलांमध्ये चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनचादेखील समावेश आहे. अलीकडेच मीडियासोबत बोलताना दिग्दर्शक सुकुमार (Sukumar) यांनी चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनबद्दल (Climax scene) काही खुलासे केले आहेत.

  भयावह घटना सांगत Salman Khan म्हणतोय, 'माझी आणि सापाची झाली मैत्री'

  दिग्दर्शक सुकुमार यांनी रश्मिका आणि अल्लू अर्जुनचा एक सेन्शुअल सीन शूट केला होता. याबाबत माहिती समोर येताच तमिळ प्रेक्षकांनी खूप निगेटिव्ह रिस्पॉन्स दिला होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही लोकांनी चित्रपटातून हा सीन हटवण्याची मागणीही केली होती. मात्र, या सीनपेक्षाही जास्त विरोध झाला असता, असा एक सीन क्लायमॅक्समध्ये घेतला जाणार होता. पुष्पाच्या क्लायमॅक्समध्ये अल्लू अर्जुन आणि फहाद फास‍िल (Fahadh Faasil) या दोघांना न्यूड दाखवण्याचा विचार दिग्दर्शक सुकुमार यांनी केला होता. तमिळ ऑडियन्ससोबत तेलुगू प्रेक्षकही हा सिनेमा पाहतील, तेलुगु ऑड‍ियन्सला (Telugu audiences) हा न्यूड सीन (Nude Scene) फारसा रुचला नसता म्हणून हा सीन क्लायमॅक्समध्ये घेतला गेला नाही. त्याऐवजी क्लायमॅक्समध्ये एक ट्विस्ट टाकण्यात आला. याशिवाय चित्रपटात असे अनेक रॉ सीन्स आहेत जे एकदम वास्तव‍िक वाटत आहेत.

  'पुष्पा: द राईज' हा पहिला पार्ट आहे. या चित्रपटाचं कथानक पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या चंदन तस्करांभोवती (Sandalwood smugglers) फिरणारं आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुननं जबरदस्त अॅक्शन सीन्स केले आहेत. याशिवाय त्याचा देसी अंदाजदेखील प्रेक्षकांना आवडला आहे. दिग्दर्शक सुकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाचा 'पुष्पा: द रूल' (Pushpa: The Rule) हा दुसरा पार्टसुद्धा रिलीज केला जाणार आहे. त्यामध्ये अनेक रॉ सिन्स असतील, असं सुकुमार यांनी सांगितलं आहे. त्यामुळे चाहत्यांना आता दुसऱ्या पार्टबद्दल उत्सुकता लागली आहे.

  First published:

  Tags: Allu arjun, Movie release, South film