मराठी बातम्या /बातम्या /explainer /निवडणुका किंवा काँग्रेस प्रवेश नव्हे; प्रशांत किशोर आणि सोनिया गांधी यांच्यात सुरू असलेल्या चर्चेचा हा आहे खरा मुद्दा

निवडणुका किंवा काँग्रेस प्रवेश नव्हे; प्रशांत किशोर आणि सोनिया गांधी यांच्यात सुरू असलेल्या चर्चेचा हा आहे खरा मुद्दा

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीगाठी गेलं वर्षभर सुरू आहेत. माध्यमांतल्या चर्चांनुसार हे सगळं विधानसभा निवडणुकीसंदर्भात सुरू आहे. पण खरा मामला वेगळाच आहे. ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवाई यांचं विश्लेषण...

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीगाठी गेलं वर्षभर सुरू आहेत. माध्यमांतल्या चर्चांनुसार हे सगळं विधानसभा निवडणुकीसंदर्भात सुरू आहे. पण खरा मामला वेगळाच आहे. ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवाई यांचं विश्लेषण...

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीगाठी गेलं वर्षभर सुरू आहेत. माध्यमांतल्या चर्चांनुसार हे सगळं विधानसभा निवडणुकीसंदर्भात सुरू आहे. पण खरा मामला वेगळाच आहे. ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवाई यांचं विश्लेषण...

पुढे वाचा ...

    रशीद किडवाई

    नवी दिल्ली, 5 ऑगस्ट: पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांचं सल्लागारपद सोडण्याचा निर्णय प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी गुरुवारी (5 ऑगस्ट) जाहीर केला. 'फ्री एजंट' या भूमिकेत आपण जास्त काळ राहू शकत नसल्याचे संकेत त्यांनी या निर्णयातून दिले. त्यापेक्षा त्यांनी राजकीय पक्षात सहभागी व्हावं आणि 2024मध्ये स्वतःची क्षमता आजमावावी. काही जणांना असं वाटतं, की प्रशांत किशोर यांनी पंजाबपासून घेतलेली फारकत म्हणजे फेब्रुवारी 2022मध्ये होऊ घातलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जिंकण्याच्या आशा कमी होत असल्याचं लक्षण आहे.

    काँग्रेसच्या अंतर्गत सूत्रांचं म्हणणं खरं मानायचं झालं, तर उत्तर प्रदेश, उत्तराखंड किंवा गुजरात या राज्यांतल्या 2022मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये प्रशांत किशोर रणनीती आखण्यात सक्रियपणे सहभागी होणार नाहीयेत.

    काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीगाठी गेलं वर्षभर सुरू आहेत. माध्यमांमध्ये वर्तवले जाणारे अंदाज आणि लोकांचं मत असं आहे, की या भेटीगाठी निवडणुकीच्या संदर्भात असाव्यात. प्रत्यक्षात मात्र तसं नाही. काँग्रेसचं पुनरुज्जीवन (Congress Revamp) करण्यावर त्यांनी भर दिला आहे. निवडणुका जिंकण्यावर नव्हे, तर काँग्रेस पक्षाची संघटनात्मक पुनर्बांधणी (Organisational Rebuilding) करण्यावर भर देण्याची गरज आहे, असं प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी सोनिया, राहुल, प्रियांका यांना सांगितलं असल्याचं म्हटलं जातं. विचारसरणी, संघटना आणि कार्यकर्ते यांच्या जोरावर काँग्रेस 136 वर्षं तगली. आगामी दशकांमध्येही टिकून राहण्याच्या आणि भरभराट होण्याच्या दृष्टीने काँग्रेसची पुनर्बांधणी करण्याची गरज आहे.

    Inside Video'..पंतप्रधान पाणीही विचारत नाही', संजय राऊत यांनी व्यक्त केली नाराजी

    काँग्रेसमधल्या उच्चपदस्थ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांनी पक्षसंघटनेत (Party Organisation) मोठे बदल करून आणण्याचं म्हणणं सातत्याने मांडलं आहे. तिकीट देण्याच्या यंत्रणेचं संस्थात्मीकरण, निवडणूक आघाड्या, निधीची उभारणी या अन्य बाबींवरही विस्ताराने चर्चा झाली आहे. काही गुप्त चर्चांमध्ये काँग्रेसचे मध्य प्रदेशचे प्रभारी कमलनाथही (Kamalnath) सहभागी होते. प्रशांत किशोर यांनी मांडलेल्या मुद्द्यांना सोनिया, राहुल आणि प्रियांका यांनी पाठिंबा दिला आहे. कमल नाथ यांच्याकडे राष्ट्रीय पातळीवरची जबाबदारी देण्याचंही ठरतं आहे.

    हा तर जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न,अशोक चव्हाणांची घटनादुरुस्तीवरून केंद्रावर टीका

    अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अनेक पदाधिकारी, प्रादेशिक महत्त्वाचे नेते-कार्यकर्ते, तरुण कार्यकर्ते यांना प्रशांत किशोर थेट भेटल्याचंही सांगण्यात येत आहे. 10पैकी 8 जणांना ते 'असेट' (संपत्ती) आहेत, असं वाटलं आहे.

    काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेस पक्षाच्या निर्णयांत प्रशांत किशोर यांचा सहभाग असू शकतो, या शक्यतेची माहिती राहुल गांधी यांनी पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना दिली आहे. ए. के. अँटनी, मल्लिकार्जुन खर्गे, अंबिका सोनी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांपासून अनेक मध्यमवयीन आणि तरुण नेत्यांनीही प्रशांत किशोर यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाच्या कल्पनेचं स्वागत केलं आहे; मात्र नव्याने आलेल्या व्यक्तीकडे आपल्या राजकीय कार्यांचं पक्षाकडून आउटसोर्सिंग केलं जात असल्यासारखं वाटू नये, असंही काही जणांनी दबक्या आवाजात सुचवलं आहे.

    त्यामुळे प्रशांत किशोर यांना 'फ्री हँड' मिळाला, तर 2024च्या लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करून प्रशांत किशोर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या वाटचालीची कल्पना कदाचित लवकरच सत्यात उतरू शकते.

    प्रशांत किशोर यांचे अनेकांशी मैत्रीचे संबंध आहेत आणि त्यासाठी पक्षाच्या सीमा नाहीत. ममता बॅनर्जी, शरद पवार, एम. के. स्टॅलिन, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, हेमंत सोरेन, जगनमोहन रेड्डी यांच्याशी असलेली त्यांची जवळीक सर्वांनाच माहिती आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, आसाम, हरियाणा, झारखंड इत्यादी राज्यांमध्ये काँग्रेस आणि भाजप हे पक्ष थेट एकमेकांच्या विरोधात आहेत. काँग्रेस जोपर्यंत आपल्या जुन्या विरोधी पक्षाला पराभूत करायला सुरुवात करत नाही, तोपर्यंत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या एनडीएला पराभूत करण्याचे विरोधकांचे एकत्रित प्रयत्न सफल होणार नाहीत, असं प्रशांत किशोर यांचं स्पष्ट मत आहे.

    राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि महाविकास आघाडीत पुन्हा सुप्त संघर्ष, राज्यपालांच्या दौऱ्याकडे पालकमंत्र्यांची पाठ

     काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी असोत किंवा नसोत, प्रशांत किशोर त्यांना हवं ते सगळं काही करू शकतात; पण बदलाची अॅलर्जी असलेला काँग्रेस पक्ष पुनरुज्जीवन करून घेण्याच्या किंवा नव्या आकारात येण्याच्या प्रयत्नांना साथ देईल का, हा खरा मोठा प्रश्न आहे.

    सोनिया गांधी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अंतरिम अध्यक्ष झाल्या, त्या गोष्टीला येत्या 10 ऑगस्ट रोजी दोन वर्षं पूर्ण होतील. आता त्या परदेशात जाणार असल्याचं समजतं. या पार्श्वभूमीवर, प्रशांत किशोर काँग्रेसची ऑफर स्वीकारणार की नाही, हे फक्त त्यांना स्वतःलाच माहिती आहे.

    (लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत. या लेखात त्यांनी व्यक्त केलेली मतं ही त्यांची वैयक्तिक आहेत)

    First published:

    Tags: Congress, Prashant kishor, Sonia gandhi