• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि महाविकास आघाडीत पुन्हा सुप्त संघर्ष, राज्यपालांच्या दौऱ्याकडे पालकमंत्र्यांची पाठ

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि महाविकास आघाडीत पुन्हा सुप्त संघर्ष, राज्यपालांच्या दौऱ्याकडे पालकमंत्र्यांची पाठ

महाविकास आघाडी सरकार (maha vikas aghadi) आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (governor bhagat singh koshyari) यांच्यातील राजकीय सुप्त संघर्ष परत एकदा चर्चेचा विषय झाला आहे.

  • Share this:
मुंबई, 05 ऑगस्ट: महाविकास आघाडी सरकार (maha vikas aghadi) आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (governor bhagat singh koshyari) यांच्यातील राजकीय सुप्त संघर्ष परत एकदा चर्चेचा विषय झाला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी दोन दिवस मराठवाड्यातील परभणी (parbhani), हिंगोली (hingoli) नांदेड (nanded) या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. दरम्यान यावेळी तिन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री (Guardian Minister) मात्र अनुपस्थित राहणार आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आजपासून नांदेड-परभणी- हिंगोली या जिल्ह्यात जाणार आहेत. अल्पसंख्यांक समाजाच्या विभागातील वसतिगृहाचे उद्घाटन तसेच जिल्हाधिकार्‍यांना समवेत आढावा बैठक घेणार आहेत. राज्यपाल यांचा राजकीय हस्तक्षेप वाढत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीत लेख कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यपालांच्या वाढत्या राजकीय हस्तक्षेपाचा विषयी नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी राज्यपाल भवन येथे भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निरोप कुंटे यांनी राजभवनला कळवला होता. त्यानंतर राज्यपाल त्यांच्या दौऱ्यात अपेक्षित बदल करतील असं वाटत असतानाच राज्यपाल यांनी पूर्वनियोजित दौर्‍यात कोणताही बदल केलेला नाही. राज्यपाल तिन्ही जिल्ह्यांमध्ये कोळी संबंधित आढावा घेणार असून जिल्हाधिकारी तसेच इतर सर्व प्रशासकीय अधिकारी त्यावेळेस उपस्थित राहणार आहेत. तसेच वसतिगृहाचे उद्घाटन देखील करणार आहेत. राज्यपालांचा महाविकासआघाडी मधील प्रशासनात आणि राजकीय हस्तक्षेप अधिक असल्याचा आरोप यापूर्वी देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता. मात्र वारंवार राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्री असा सुप्त संघर्ष दिवसेंदिवस वाढतच आहे. पुण्यातल्या Unlock बाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंची महत्त्वाची माहिती राज्यपाल यांनी पूर्वनियोजित दौऱ्यात कोणताही बदल न करता आधीची भूमिका ठाम ठेवल्यानं पुढील काळात परत एकदा महाविकास आघाडी आणि राज्यपाल असा संघर्ष वाढेल असं म्हटलं जातं आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील पालकमंत्री देखील राज्यपाल दौऱ्यादरम्यान अनुपस्थित राहणार असल्याने महाविकास आघाडीनं योग्य ते सूचक संकेत दिल्याचे देखील म्हटले जातं आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना विचारले असता पालकमंत्री यांचे पूर्व नियोजित दौरे असतील. त्यामुळे पालक मंत्री राज्यपाल महोदयांच्या दौऱ्यात नसतील. तसंच दुसरीकडे राज्यपाल यांना महाविकास आघाडीच्या वतीने समज दिला असून पुढील कार्यपद्धत बदलतील अशी अपेक्षा देखील मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे.
Published by:Pooja Vichare
First published: