मराठी बातम्या /बातम्या /explainer /Explained : गाढवांच्या विक्रीतून पाकिस्तानला होतो मोठा आर्थिक फायदा, काय आहे चीन कनेक्शन?

Explained : गाढवांच्या विक्रीतून पाकिस्तानला होतो मोठा आर्थिक फायदा, काय आहे चीन कनेक्शन?

पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत गाढवाला (Donkey) प्रचंड महत्त्व आहे. पाकिस्तान (Pakistan) सरकारने केलेल्या आर्थिक सर्वेक्षण 2020-21 मध्ये स्पष्ट करण्यात आलंय की पाकिस्तानात गेल्या काही काळात गाढवांची संख्या 3 लाखांनी वाढली आहे.

पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत गाढवाला (Donkey) प्रचंड महत्त्व आहे. पाकिस्तान (Pakistan) सरकारने केलेल्या आर्थिक सर्वेक्षण 2020-21 मध्ये स्पष्ट करण्यात आलंय की पाकिस्तानात गेल्या काही काळात गाढवांची संख्या 3 लाखांनी वाढली आहे.

पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत गाढवाला (Donkey) प्रचंड महत्त्व आहे. पाकिस्तान (Pakistan) सरकारने केलेल्या आर्थिक सर्वेक्षण 2020-21 मध्ये स्पष्ट करण्यात आलंय की पाकिस्तानात गेल्या काही काळात गाढवांची संख्या 3 लाखांनी वाढली आहे.

कराची 14 जून : पाकिस्तान या देशाची अर्थव्यवस्था कायमच खराब असते आणि त्यात कोरोना महामारीमुळे (Coronavirus) ती आणखी खालवली आहे. पण पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत गाढवाला (Donkey) प्रचंड महत्त्व आहे. पाकिस्तान (Pakistan) सरकारने केलेल्या आर्थिक सर्वेक्षण 2020-21 मध्ये स्पष्ट करण्यात आलंय की पाकिस्तानात गेल्या काही काळात गाढवांची संख्या 3 लाखांनी वाढली आहे. पाकिस्तानातून चीनला गाढवं विकली जातात आणि त्यातून मोठी रक्कम पाकिस्तानला मिळते. त्यामुळे गाढवांचं प्रजनन, त्यांची रखरखाव याला पाकिस्तानात खूप महत्त्व आहे. इतकं की गाढवांसाठी स्वतंत्र हॉस्पिटल्स पाकिस्तानात आहेत. चीनमधील पारंपरिक वैद्यकीय उपचारांसाठी गाढवाचं मांस आणि कातडी वापरली जाते त्यामुळे चीन नेहमी पाकिस्तानातून गाढवं विकत घेतं. चिनी कंपन्यांनी पाकिस्तानात गुंतवणूक करून गाढवांच्या पालन पोषणासाठी सुविधा निर्माण केल्या आहेत.

चोरीला गेलेलं 40 किलो सोनं अन् 6 कोटी सापडले पण मालकच झाला गायब; अजब गौडबंगाल

क्रमवारी कशी

ब्लू मार्बल वेबसाईट ही जगभरातील पशुंच्या संख्येचा लेखा-जोखा ठेवते. त्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार इथिओपिया या देशात जगातील सर्वाधिक म्हणजे 8 लाख गाढवं आहेत. त्यानंतर चीनचा नंबर लागतो आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे पाकिस्तान. या क्रमवारीत भारत 25 व्या स्थानावर आहे.

गाढवांचा काय उपयोग?

चीन आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनात आघाडीवर असला तरीही त्यांनी पारंपरिक औषध पद्धतीकडे दुर्लक्ष केलेलं नाही. त्यामुळे या पद्धतीत सांगितलेली औषधं अजूनही मोठ्या प्रमाणात खपतात. गाढवाचं मांस आणि त्याच्या कातड्यापासून औषध तयार करण्याची पारंपरिक पद्धत चिनी परंपरेत सांगितली आहे. गाढवाच्या कातड्यापासून इजियाओ नावाचं जिलेटिनसारखं चिकट औषध तयार केलं जातं, जे मानवी शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वापरलं जातं. त्याचबरोबर सांध्यांच्या आजारासाठीही ते फायद्याचं ठरतं. याच जिलेटिनपासून तयार झालेलं औषध आणि गाढवाचं मांस खाल्ल्याने माणसाची प्रजननक्षमता वाढते असंही मानतात. त्यामुळे पाकिस्तानात 20 हजार रुपये किंमत असलेलं गाढवाचं कातडं चीनमध्ये गेल्यावर कितीतरी पटीने महाग होतं.

Corona Virus:धारावीतल्या कोरोना संदर्भातली सर्वात मोठी बातमी

चीनमध्ये पारंपरिक औषधांच्या व्यवसायाची उलाढाल 130 बिलियन डॉलर आहे असं मानतात. साप, विंचू, कोळी आणि झुरळासारख्या प्राण्यांपासून तयार केलेल्या औषधांमुळे कर्करोग, पक्षाघात, पार्किन्सन, हृदयविकार आणि दम्यासारख्या आजारांवर उपचार केले जाऊ शकतात. त्यामुळे या औषधांना चीनमध्ये प्रचंड मागणी आहे.

कुठून मागवतात गाढवं?

गाढवांशी संबंधित काम करणाऱ्या ब्रिटनमधील द डाँकी सँच्युरी या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार चीनला दरवर्षी औषधं तयार करण्यासाठी 50 लाख गाढवं लागतात. पाकिस्तानसह आफ्रिका खंडातील अनेक देश चीनला गाढवं विकतात. गेल्या सहा वर्षांपासून मागणी वाढल्याने गाढवांची तस्करीपण वाढली आहे. चीनमध्ये औद्योगिकरण झाल्यानंतर 1992 पासून गाढवं राखण्याचा व्यवसाय मागे पडला आहे त्यामुळे त्यांना गाढवांची आयात करावी लागते. ब्राझीलमधूनही चीनमध्ये गाढवांची तस्करी केली जाते. 2007 मध्ये ब्राझीलमधली गाढवांची संख्या 30 टक्क्यांनी कमी झाली. त्यानंतर गाढवांची तस्करी सुरू झाली.

गाढवांवर अत्याचार

गाढवांची तस्करी होते म्हणजे सहाजिकच त्यांच्यावर अत्याचार होतातच. समुद्रमार्गे ही गाढवं चीनला पाठवली जातात त्यामुळे त्या प्रवासादरम्यानच 20 टक्के गाढवांचा मृत्यु होतो. सीएनएनच्या वृत्तानुसार चीनची मागणी पूर्ण करण्यासाठी पुरवठा करणाऱ्या देशांतून गरोदर गाढविणी, लहान आणि आजारी गाढवांचीही तस्करी केली जाते. गाढवांचा प्रजनन दर इतर जनावरांच्या तुलनेत कमी असतो आणि गाढवाला प्रजननक्षम व्हायला वेळ लागतो, त्यामुळेच चीनमध्ये गाढवांची संख्या कमी झाली आहे. गाढवांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी रजिस्ट्रार ऑफ चायनीज हर्बल मेडिसिनने गाढवापासून तयार होणाऱ्या पारंपरिक औषधावर बंदी घालण्याचा प्रयत्न केला आहे.

First published:
top videos

    Tags: China, Donkey meat, Pakistan