मराठी बातम्या /बातम्या /explainer /मुंबईकरांना मोठा दिलासा! पॉझिटिव्ही रेट घसरला; काय असतो हा Rate आणि कशी काढतात Positivity?

मुंबईकरांना मोठा दिलासा! पॉझिटिव्ही रेट घसरला; काय असतो हा Rate आणि कशी काढतात Positivity?

कोरोना लॉकडाऊनमधून अनलॉक होण्यात पॉझिटिव्ही रेट का महत्त्वाचा आहे?

कोरोना लॉकडाऊनमधून अनलॉक होण्यात पॉझिटिव्ही रेट का महत्त्वाचा आहे?

कोरोना लॉकडाऊनमधून अनलॉक होण्यात पॉझिटिव्ही रेट का महत्त्वाचा आहे?

मुंबई, 18 जून : पॉझिटिव्ह (Positive) हा शब्द सकारात्मक असला तरी सध्या कोरोनाच्या बाबती मात्र हा शब्द नकोसा ठरतो आहे. कोरोना काळात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण (Corona positive patient), पॉझिटिव्ही रेटबाबत (Positivity rate) हा शब्द वापरला जातो आहे. एरवी आपण जास्त पॉझिटिव्हीटी असणं चागलं असं म्हणतो. पण कोरोनाच्या महासाथीत कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणं नको, पॉझिटिव्हीटी रेट कमी हवा, असंच म्हणतो आहे. याच पॉझिटिव्हीटी रेट वरून आता तुम्ही लॉकडाऊनमधून (Corona unlock) मुक्त होणार की नाही हेसुद्धा ठरतं आहे.

एकंदरच कोरोना पॉझिटिव्हिटी रेट  हा कोरोना लॉकडाऊनची (Corona lockdown) चावीच आहे, असं म्हणण्यास हरकत नाही. या चावीमुळेच तुमचा जिल्हा अनलॉक होणार आहे. या अशा चावीबद्दल तर तुम्हाला माहिती असायलायच हवी नाही का? हा पॉझिटिव्ही रेट म्हणजे नेमकं काय आणि तो कसा काढतात, तो कमी-अधिक असणं म्हणजे काय त्याचा काय परिणाम होतो, या पॉझिटिव्हिटी रेटनुसार जिल्हा कसा अनलॉक होणार हे सर्व जाणून घेऊयात.

पॉझिटिव्ही रेट म्हणजे काय तो कसा काढतात?

एकूण कोरोना टेस्टच्या तुलनेत किती रुग्ण पॉझिटिव्ह सापडले हे प्रमाण. जॉन हॉपकिन्सने दिलेल्या माहितीनुसार पॉझिटिव्ह टेस्ट  (positive tests)/एकूण कोरोना टेस्ट (total tests) X 100% असा हा आकडा काढला जातो. याला पर्सेंट पॉझिटिव्ह percent positive किंवा पर्सेंट पॉझिटिव्ह रेटही percent positive rate म्हणतात.

पॉझिटिव्ह रेट जास्त म्हणजे किती जास्त?

पॉझिटिव्ह रेट किती असणं चिंताजनक आहे, असा प्रश्नही उपस्थित होतोच. सध्या 5 टक्के पॉझिटिव्ही रेट ही मर्यादा आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेनं गेल्या वर्षी मे महिन्यात निर्धारित केलेल्या मर्यादेनुसार 5% पॉझिटिव्ही रेट हा दिलासादायक आहे. म्हणजे त्या ठिकाणी कोरोना नियंत्रणात आहे.  यापेक्षा जास्त पॉझिटिव्ही रेट असणं म्हणजे परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे सरकारने नियम शिथील करताना किमान दोन आठवडे पॉझिटिव्ही रेट हा 5% च्या खाली असावा याकडे लक्ष द्यावं, असं डब्ल्यएचओने सांगितं आहे.

हे वाचा - मुंबईचा समावेश लेवल 1 मध्ये; आता लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी सुरू होणार?

कोरोना चाचणीचं प्रमाण आणि कुणाच्या चाचणी होत आहेत, यावर सर्व अवलंबून आहे. लक्षणं न दिसणाऱ्यांची दैनंदिन चाचणी, लक्षण दिसणाऱ्यांची निदान चाचणी किंवा कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची चाचणी हा आकडा वेगवेगळा असू शकतो. यावरही हा आकडा अवलंबून आहे.

पॉझिटिव्ही रेट का महत्त्वाचा?

यामुळे दोन बाबी समजतात एक म्हणजे कोरोना किती प्रमाणात पसरला आहे आणि कोरोना संक्रमित लोकांच्या तुलनेत टेस्ट पुरेशा होत आहेत की नाहीत. जास्त पॉझिटिव्ह रेट म्हणजे जास्त संक्रमण आणि जास्त टेस्ट करण्याची गरज दर्शवतं. निर्बंध शिथील करण्याची ही योग्य वेळ नाही. निर्बंध ठेवण्याची हीच योग्य वेळ आहे.

हे वाचा - तुमच्याजवळ कोरोना रुग्ण असेल तर वाजणार अलार्म; 15 मिनिटांत देणार धोक्याची घंटा

कोरोना किती प्रमाणात पसरतो आहे, हे समजून त्यानुसार त्याला नियंत्रित करण्याासठी आवश्यक ती पावलं उचलण्यास याची मदत होते.

जिथं जास्त रेट आहे, तिथं प्रत्यक्ष आकड्यापेक्षा संसर्ग अधिक असण्याची शक्यता आहे.  जितकी प्रकरणं दिसत आहे, त्यापेक्षा जास्त वेगाने व्हायरस पसरतो आहे.

पॉझिटिव्हिटी रेट कमी कसा करता येतो?

कोरोना संसर्गाचा प्रमाण कमी करणं आणि जास्तीत जास्त तपासणी करणं हे दोन मार्ग आहेत.  जर जास्त टेस्ट केल्या आणि पॉझिटिव्ह टेस्ट जास्त आल्या तर त्या लोकांना आयसोलेट होण्याचा सल्ला दिला जातो आणि संक्रमण रोखता येतं. जर टेस्टिंग झाल्या नाही तर कडक निर्बंध, मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि सार्वजनिक कार्यक्रम, उत्सव, गर्दी करण्यास बंदी अशा मार्गाने कोरोनाला रोखता येतं.

First published:
top videos

    Tags: Corona, Coronavirus, Lockdown, Mumbai