मराठी बातम्या /बातम्या /explainer /

मोदी सरकारनेही दिला ग्रीन सिग्नल; प्रेग्नन्सीत कोरोना लस घेणं का आहे महत्त्वाचं?

मोदी सरकारनेही दिला ग्रीन सिग्नल; प्रेग्नन्सीत कोरोना लस घेणं का आहे महत्त्वाचं?

ऍन्टीबायोटीक्सचे शरीरावर साईडइफेक्ट होतात.

ऍन्टीबायोटीक्सचे शरीरावर साईडइफेक्ट होतात.

प्रेग्नन्सीत कोरोना लस घेण्याने दुष्परिणाम होत नाही उलट फायदाच होतो.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 26 जून : आतापर्यंत प्रेग्नंट महिलांना कोरोना लस (Pregnant woman corona vaccination) दिली जात नव्हती. कारण कोरोना लशीचा त्या महिलेवर (Corona vaccination during pregnancy) आणि तिच्या पोटातील बाळाच्या आरोग्यावर काही दुष्परिणाम तर होत नाही ना, याबाबत स्पष्टता नव्हती. पण आता मात्र प्रेग्नंट महिलांसाठी कोरोना लस सुरक्षित असून प्रेग्नन्सीत कोरोना लस घेता येऊ शकते, असं केंद्र सरकारने सांगितलं आहे.

प्रेग्नंट महिलांच्या लसीकरणाबाबत मोदी सरकारने गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. त्यामुळे या महिलांच्या लसीकरणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. प्रेग्नन्सी कोरोना लस घेतल्याने काही दुष्परिणाम होत नाही उलट त्याचा फायदाच होतो, हे सरकारनेही मान्य केलं आहे.

प्रेग्नंट महिलांच्या लसीकरणाबाबत सरकारने काय सांगितलं?

आयसीएमआरचे  (ICMR) महासंचालक डॉ. बलराम भार्गव  (Balram Bhargava) यांनी सांगितलं की, प्रेग्नंट महिलाही कोरोना लस घेऊ शकता. आरोग्य मंत्रालयाने तशा गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. आयसीएमआरच्या प्रॅगकोविड रजिस्ट्रीमध्येही लसीकरण गर्भवती महिलांसाठी फायदेशीर आहे आणि त्यांना लस द्यायला हवी, असं नमूद करण्यात आलं आहे.

प्रेग्नन्सीत कोरोना लस घेतल्याने बाळाला मिळाल्या अँटिबॉडीज

यूएसमधील एका महिलेनं प्रेग्नन्सीच्या 36 व्या आठवड्यात या महिलेनं मॉडर्ना कोरोना लशीचा पहिला डोस घेतला तीन आठवड्यांनंतर तिनं एका निरोगी बाळाला जन्म झालं. तिला मुलगी झाली. जन्मानंतर लगेच तिच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्यावेळी तिच्या रक्तात कोरोनाव्हायरसविरोधात (SARS-CoV-2) अँटिबॉडीज असल्याचं दिसून आलं. हे प्रकरण medRxiv वर प्रसिद्ध करण्यात आलं होतं.

हे वाचा - Corona vaccine न घेणं पडलं महागात? लसीकरण न झालेल्या 98% कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

आईला लस दिल्यानंतर बाळाच्या शरीरात अँटिबॉडीज आढळल्याचं हे पहिलंच प्रकरण असल्याचं  यूएसच्या फ्लोरिडा अटलांटिक युनिव्हर्सिटीतील अभ्यासक पॉल गिलबर्ट आणि चॅड रूडनिक यांनी सांगितलं. यानंतर ब्रेस्टफिडिंग करणाऱ्या या महिलेला लसीकरण नियमानुसार 28 दिवसांनी कोरोना लशीचा दुसरा डोस देण्यात आला, असं डॉक्टरांनी सांगितलं.

याआधी झालेल्या अभ्यासांनुसार कोरोनामुक्त झालेल्या आईच्या शरीरातील अँटिबॉडीज प्लेसेंटामार्फत तिच्या गर्भापर्यंत जाणं अपेक्षेपेक्षा कमीच आहे. पण या अभ्यासानुसार आईच्या लसीकरणानंतर बाळाला होणाऱ्या संसर्गाचा धोका कमी करता येऊ शकतो आणि सुरक्षा देता येऊ शकते, असं ते म्हणाले.

प्रेग्नन्सीत कोरोना लशीचा असाही फायदा

एका संशोधनानुसार कोरोना लस घेतल्याने गर्भातील बाळावर वाईट परिणाम होत नाही, उलट त्याला सुरक्षाच मिळते. बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, वेळेआधी होणाऱ्या प्रसूतीचा धोकाही कमी होतो. शिवाय कोरोना पॉझिटिव्ह आईने जरी बाळाला जन्म दिला तरी त्या बाळाला कोरोनाचा धोका कमी होतो.

प्रेग्नन्सीत कोरोना लसीकरणाबाबत स्त्रीरोग तज्ज्ञ काय सांगतात?

ऑक्सफोर्डमधील एका अभ्यासानुसार लस घेतल्यानंतर त्याचे चांगलेच परिणाम होतात. गरोदरपणात कोरोना झाला तरी त्याचे दुष्परिणाम, लक्षणं कमी होतात. गरोदरपणात लस सुरक्षित आहे. डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही लस घेऊ शकता, असं वोक्हार्ट रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. गंधाली देवरुखकर  यांनी न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक लाइव्हवर बोलताना सांगितलं होतं.

हे वाचा - Pregnant महिलांनाही कोरोना लस द्या; मोदी सरकारने जारी केल्या गाइडलाइन्स

कोरोना लस घेतल्यानंतर प्रेग्नंट राहिल्यासही काहीही करायची गरज नाही. गर्भ राहू द्यावा कारण लशीचा गर्भावर काहीही दुष्परिणाम होणार नाही, असं त्यांनी सांगतिलं.

First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus, Pregnancy, Pregnant woman