Home /News /explainer /

सोनियांच्या वडिलांची अट पाळली नसती तर राजीव गांधी यांचं लग्न झालं नसतं!

सोनियांच्या वडिलांची अट पाळली नसती तर राजीव गांधी यांचं लग्न झालं नसतं!

Love Story Of Sonia & Rajiv Gandhi : आज सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म इटलीत (Italy) झाला. गांधी-नेहरू कुटुंबात त्यांचं लग्न इटलीबाहेर भारतात होईल, याची कल्पनाही त्यांनी केली नव्हती. केंब्रिजमध्ये (Cambridge) शिकत असतानाच त्या राजीव गांधींच्या (Rajiv Gandhi) प्रेमात पडल्या. या प्रेमकथेत चढ-उतार आले पण दोघांनी पुढं जाऊन लग्न केलं.

पुढे वाचा ...
    मुंबई, 9 डिसेंबर : 7 जानेवारी 1965 साली सोनिया केंब्रिजला पोहोचल्या. इथं सहसा परदेशी तरुण-तरुणी शिक्षणसाठी येत असतात. लंडनचा हा परिसर सुरक्षित आणि स्वच्छही आहे. येथील दोन मुख्य भाषिक शाळांपैकी एका शाळेत त्यांनी प्रवेश घेतला. केंब्रिजमध्ये अशी व्यवस्था होती की तुम्ही परदेशी असाल तर ते तुमची राहण्याची व्यवस्था एखाद्या कुटुंबाच्या घरी केली जात असे. सोनिया यांनाही असं एक घर देण्यात आलं. त्यांना येथील जेवण आवडत नसे आणि सुरुवातीला इंग्रजी बोलायलाही जमत नव्हतं. त्याच कॅम्पसमध्ये एक ग्रीक रेस्टॉरंट होतं, जिथं इटालियन खाद्यपदार्थही मिळत होते. त्याचं नाव होतं वर्सिटी. विद्यापीठातील तरुणांमध्ये ते खूप लोकप्रिय होते. सोनिया इथं नियमित जेवण करू लागल्या. जेवणाच्या किमतीही विद्यार्थ्यांना परवडतील अशा होत्या. राजीव गांधीही अनेकदा आपल्या मित्रांसह येथे येत असत. जेव्हा सोनियांनी राजीव यांना पहिल्यांदा पाहिलं इथेच सोनियांनी राजीव यांना पहिल्यांदा पाहिलं. तो शांत आणि देखणा होता. तसेच अतिशय सभ्य आणि इतरांपेक्षा वेगळा. एके दिवशी सोनिया तिथं दुपारचं जेवण घेत असताना राजीव तिचा कॉमन फ्रेंड ख्रिश्चन वॉन स्टीग्लिजसोबत आत शिरला. तेव्हा त्यांची एकमेकांशी पहिल्यांदा ओळख झाली. "सोनिया गांधी - अॅन एक्स्ट्राऑर्डिनरी लाइफ, अॅन इंडियन डेस्टिनी" या बायोग्राफीच्या लेखिका राणी सिंग यांना सोनियांनी सांगितले, "ती पहिल्याच नजरेत राजीवच्या प्रेमात पडली. राजीवच्या बाबतीतही असेच होते, कारण राजीवने तिलाही हेच सांगितले होतं. त्याने आधीच ख्रिश्चनला सोनियाशी ओळख करून देण्यास सांगितले होते. राजीव यांनी आपल्या आईला लिहिलेल्या पत्रात सोनियांचा उल्लेख सुरू केला त्यानंतर त्यांची मैत्री झाली. दोघेही एकमेकांच्या जवळ येऊ लागले. नेहरू-गांधी घराण्यात दीर्घ पत्र लिहिण्याची परंपरा आहे. राजीवही त्याच अनुकरण करायचे. जेव्हा ते त्यांच्या आई इंदिरा गांधींना पत्र लिहायचे तेव्हा ते कॅम्पस, अभ्यास, जीवन, दिनचर्या याबद्दल सर्व काही लिहायचे. लवकरच सोनियाही त्यांच्या पत्रात सहभागी झाल्या. त्यांनी आपल्या आईला तिच्याविषयी सांगितले. सोनिया आणि राहुल गांधी यांच्यात खरंच आहे का दुरावा? त्या दिवसांत राजीव यांकडे लाल रंगाची जुनी कार होती दोघेही कुटुंबापासून दूर होते. तणावमुक्त आणि स्वतंत्र. त्या दिवसांत राजीव यांच्याकडे लाल रंगाची जुनी फोक्सवॅगन कार होती. त्‍यामुळे ते सोनिया जिथे राहत असे त्‍यांच्‍याकडे जवळपास दररोज यायचा. अनेकदा ते आणि सोनिया इतर मैत्रिणींसोबत सुटीच्या दिवशी कारमध्ये फिरायला जात असत. इंधनाचे पैसे सर्वजण मिळून वाटून घ्यायचे. कधी-कधी तो सोनियासोबत कार रेसिंग पाहण्यासाठी सिल्व्हरस्टोनला जात असे. राजीव अतिरिक्त कमाईसाठी बेकरीमध्ये काम करत त्याकाळी केंब्रिजमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना घरून पैसे कमी येत असल्याने आर्थिक चणचण भासत असे. त्यामुळे फावल्या वेळात ते तुरळक कामे करत असे. राजीव एका सहकारी बेकरीमध्ये काम करायचे. ते ब्रेड विभागात होते. पुस्तकात असे लिहिले आहे की, "सोनिया अशी व्यक्ती होती जिच्याकडे पुरेसे पैसे होते, विशेषत: जेव्हा महिन्याच्या शेवटी तिच्या इतर मित्रांचे खिसे रिकामे होते." पुस्तकात राजीव यांचे केंब्रिज काळातील मित्र ताहीर जहांगीर म्हणाले, "सोनिया नेहमी चांगल्या पोशाखात असायची आणि नेहमी आनंदी मूडमध्ये भेटायची." सोनिया केंब्रिजमधील सर्वात सुंदर मुलगी होत्या त्यावेळी केंब्रिजमध्ये स्त्री-पुरुषांचे गुणोत्तर 12 आणि 1 होते. लांब दाट आणि काळे केस असलेली स्लिम सोनिया त्या काळात केंब्रिज टाऊनमधली सर्वात सुंदर मुलगी होती. त्यांना आपल्या दिसण्याचं भान होतं. राजीव यांना फोटोग्राफीची आवड होती. ते सोनियांचे अनेक फोटो काढायचे. राजीव त्यांच्यासाठी सगळ्यात खास व्यक्ती झाला होता. पण, ते दोन वेगवेगळ्या जगातले आहेत हे त्यांना माहीत होतं. त्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा काळ होता. ते मुक्तपणे त्यांच्या आयुष्याचा आनंद घेत होते. इंदिराजी सोनियांना लंडनमध्ये पहिल्यांदा भेटल्या आता राजीव यांनी आई इंदिराजींना लिहिलेल्या पत्रात पहिल्यांदाच सोनियांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. राजीव यांनी पहिल्यांदाच आईला सोनियांची भेट घेता यावी म्हणून व्यवस्था केली. तेव्हा त्या लाल बहादूर शास्त्री यांच्या सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्री होत्या. या भेटीमुळे सोनिया घाबरल्या होत्या. लंडनमध्येच ही भेट झाली. त्यानंतर लंडनमधील केनिंग्टन पॅलेस गार्डन्समधील भारतीय उच्चायुक्तांच्या घरी पुन्हा दुसरी भेट झाली. सोनिया घाबरल्या, संभाषण फ्रेंचमध्ये झालं इंदिराजींनी या भेटीत सोनियांना खूप रिलॅक्स करण्याचा प्रयत्न केला. त्या सोनियाशी फ्रेंचमध्ये बोलल्या, कारण त्यांना माहीत होते की सोनियाला इंग्रजीपेक्षा फ्रेंचमध्ये अधिक सोयीस्कर वाटते. त्यांच्या अभ्यासाबद्दल विचारले. राजीव आणि त्यांची आई इंदिरा यांच्यातील हे नातं जितकं सुखकर वाटत होतं तितकं सोनियाच्या कुटुंबीयांशी नव्हतं. सोनिया आणि मनेका गांधी जेव्हा समोरासमोर भेटल्या तेव्हा नेमकं काय झालं? सोनियांच्या कुटुंबीयांचा स्पष्ट नकार राजीवसोबतच्या प्रेमाची आणि नात्यात पुढे जाण्याची गोष्ट सोनियांनी आजवर घरात सांगितली नव्हती. या प्रकरणाबाबत राजीव यांनी इंदिराजींना लिहिलेल्या पत्रात, "सोनियाने अद्याप घरच्यांना का सांगितलं नाही? हे त्यांना समजू शकले नाही." बरं, सोनियाने राजीवसोबत आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला होता. ओर्बासनो येथील तिच्या घरी गेल्यावर तिने यावेळी घरच्यांशी बोलायचे ठरवले. मात्र, कुटुंबीय नाराज झाले. त्या तुटलेल्या मनाने केंब्रिजला परतल्या. मात्र, हा सगळा प्रकार कळल्यानंतरही तिने पुन्हा केंब्रिजला जावे असे कुटुंबीयांना वाटत नव्हते. दोघांनाही भविष्याची चिंता राजीव यानी आता इंपीरियल कॉलेज लंडनमध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता, त्यामुळे दोघे आता फक्त वीकेंडला भेटत असे. या दोन्ही तरुणांनी पुढचे आयुष्य एकत्र घालवायचे ठरवले होते. मात्र, कधीकधी भविष्याबद्दल शंका होत्या. सोनियाला अजूनही तिच्या कणखर वडिलांची भीती वाटत होती. पण हळूहळू दोघांनीही लग्न करून भारतात राहण्याचा निर्णय घेतला. सोनिया इटलीला परतल्या जुलै 1966 मध्ये सोनिया पुन्हा इटलीला परतल्या. राजीव यांनीही सोनियांचे वडील स्टेफानो यांना भेटण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन साइटवर काम करून पुरेसे पैसे कमवले. सोनिया आणि राजीव दोघेही रोज एकमेकांना पत्र लिहायचे. मात्र, राजीवने आता अभियांत्रिकीचे शिक्षण सोडून पायलटचा परवाना मिळविण्यासाठी प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. राजीव इटलीला जाऊन सोनियांच्या आई-वडिलांना भेटले पण.. नोव्हेंबर 1966 मध्ये राजीव इटलीला गेले. त्यांनी सोनियांच्या आई-वडिलांची भेट घेऊन त्यांना त्यांच्या नातेसंबंधाची खात्री दिली. राजीव तिच्या आई-वडिलांना पसंत पडले. राजीव हा एक उमदा माणूस असल्याचे त्यांच्या लक्षात आलं. त्यांचा हेतू चांगला असल्याचेही समजले. मात्र, तरीही आपली सोन्यासारखी मुलगी परदेशात कशी राहील याची चिंता त्यांना लागली होती. जर लग्नाला होकार दिला तर चांगल्या वडिलांचे कर्तव्य पार पडणार नाही, असं त्यांना वाटत होतं. सोनिया यांनी पुस्तकाच्या लेखकाला सांगितले की, "वडिलांनी तिला या नात्यात पुढे जाऊ नये म्हणून मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, सोनिया मागे सरणार नाही, याची जाणीव झाल्यावर त्यांनी लग्नासाठी किमान एक वर्ष वाट पाहावी, अशी अट घातली. तोपर्यंत त्यांचं प्रेम असेच चालू राहिलं तर ते सोनियाला राजीवच्या देशात जाण्याची परवानगी देणार होते. पण, लग्नात काही गडबड झाली तर त्यांना दोष द्यायचा नाही, हे देखील सांगितले. वर्षभरानंतर सोनिया दिल्ली विमानतळावर उतरल्या सोनियांनी 12 महिने वाट पाहिली. स्टेफानोला वाटले की मुलगी वर्षभर इटलीत त्यांच्यासोबत राहील, तेव्हा ती राजीवला विसरेल, पण तसं होऊ शकलं नाही. 13 जानेवारी 1968 रोजी सोनिया दिल्ली विमानतळावर उतरल्या. त्यांना घेण्यासाठी राजीव त्याचा भाऊ संजयसोबत आला होता. अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबियांसोबत सोनियाला ठेवण्यात आलं. त्यानंतर तिथंच सर्वांच्या साक्षीनं त्यांनी लग्न केलं.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Indira gandhi, Rahul gandhi, Sonia gandhi

    पुढील बातम्या