सोनिया आणि मनेका गांधी जेव्हा समोरासमोर भेटल्या तेव्हा नेमकं काय झालं?

सोनिया आणि मनेका गांधी जेव्हा समोरासमोर भेटल्या तेव्हा नेमकं काय झालं?

वरुण शपथ घ्यायला जात असताना सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनीही बाकं वाजवून त्यांचं स्वागत केलं.

  • Share this:

नवी दिल्ली 18 जून : लोकसभेत सध्या सर्व सदस्यांचा शपथविधी सुरू आहे. लोकसभेतला हा कार्यक्रम सर्वांसाठी आठवणींचा असतो. अनेक सदस्य आपल्या मातृभाषेत आणि पारंपरिक वेशभूषेत शपथ घेतात. त्यामुळे हे शपथ घेणं आकर्षक असतं. जेव्हा मोठे नेते शपथ घेतात तेव्हा सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे लागलेलं असतं. भाजपच्या नेत्या मनेका गांधी यांचं आणि सोनिया गांधी परिवाराचं सख्य जगजाहीर आहे. गांधी परिवारातली ही  मंडळी जेव्हा आमने-सामने येतात तेव्हा एकमेकांना टाळत असतात. मात्र लोकसभेत शपथविधीच्या वेळी सोनिया आणि मनेका गांधी समोरासमोर आल्या आणि त्यांनी एकमेकींना अभिवादनही केलं.

भाजपच्या खासदार मनेका गांधी यांनी सोमवारी शपथ घेतली. लोकसभेत शपथ घेतल्यानंतर सर्व सदस्य सत्ताधारी  आणि विरोधी बाकांवरच्या नेत्यांना अभिवादन करतात. ही प्रथा दोन्ही बाजूंचे सदस्य पाळत असतात. मनेका गांधी या शपथ घेतल्यानंतर विरोधी बाकांकडे वळल्या तेव्हा समोरच सोनिया गांधी बसल्या होत्या. तेव्हा मनेकांनी त्यांना हात जोडून अभिवादन केलं. तर सोनियांनीही त्यांना प्रतिसाद दिला.

वरुण आणि राहुलही समोरासमोर

असाच प्रसंग वरुण गांधी यांच्यासोबतही घडला. वरुण जेव्हा शपथ घेऊन विरोधी बाकांकडे वळले तेव्हा राहुल गांधींशी त्यांनी हस्तांदोलन केलं. वरुण शपथ घ्यायला जात असताना सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनीही बाकं वाजवून त्यांचं स्वागत केलं.

भारत माता की जय

17 व्या लोकसभेचं अधिवेशन सोमवारपासून सुरू झालं. लोकसभा नवीन असल्याने सुरुवातीला सर्व सदस्यांचा शपथविधी सध्या सुरू आहे. पहल्या दिवशी 300 पेक्षा जास्त सदस्यांनी शपथ घेतली. आज MIMचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असादुद्दीन ओवेसी यांनी शपथ घेतली. ओवेसी शपथ घेण्यासाठी येत असतानाच भाजपच्या सदस्यांनी भारत 'माती की जय' आणि 'वंदे मातरम'चे नारे लावले. भाजपच्या सदस्यांची घोषणाबाजी सुरू असताना ओवेसी यांनीही हातवारे करत आणखी मोठ्याने घोषणा द्या, असं हातानेच सुचवलं. त्यांनी उर्दुतून आणि 'खुदा'ला स्मरून शपथ घेतली. शपथ झाल्यावर त्यांनी, जय भीम, तकबीर, अल्ला हु अकबर आणि जय हिंद अशी घोषणा दिली.

वंदे मातरम् म्हणणार नाही.

समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेशातले खासदार शफीकुर रहेमान बर्क हे शपथ घेत असताना 'वंदे मातरम् 'च्या घोषणा दिल्या गेल्या. बर्क यांनी त्या घोषणांना आक्षेप घेत आपण अशी घोषणा देणार नसल्याचं सांगितलं. ते म्हणाले, वंदे मातरम् म्हणणं हे इस्लामविरोधी आहे. त्यामुळे मी ते म्हणणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 18, 2019 07:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading