मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Explainer : कार चोरीला गेल्यानंतर काय करायचं? या 6 बाबी ठेवा लक्षात!

Explainer : कार चोरीला गेल्यानंतर काय करायचं? या 6 बाबी ठेवा लक्षात!

 मोठमोठ्या शहरांमध्ये कारचोरीच्या घटना अधूनमधून घडत असतात. कारसारखी मौल्यवान गोष्ट चोरीला जाण्यामुळे मानसिक आणि अर्थातच मोठा आर्थिक धक्काही बसतो;मात्र तुमच्या गाडीची कागदपत्रं व्यवस्थित असतील आणि तुम्ही पोलिसांकडे वेळेत तक्रार दाखल केली,तर पोलिसांकडून कारचा शोध लावला जाऊ शकतो. याच सर्व विषयांवर सविस्तर माहिती सांगितली आहे, उच्च न्यायालयीन वकील प्राची मिश्रा यांनी.

पुढे वाचा ...

दिल्ली, 11 मार्च: मोठमोठ्या शहरांमध्ये कारचोरीच्या घटना अधूनमधून घडत असतात. कारसारखी मौल्यवान गोष्ट चोरीला जाण्यामुळे मानसिक आणि अर्थातच मोठा आर्थिक धक्काही बसतो;मात्र तुमच्या गाडीची कागदपत्रं व्यवस्थित असतील आणि तुम्ही पोलिसांकडे वेळेत तक्रार दाखल केली,तर पोलिसांकडून कारचा शोध लावला जाऊ शकतो. दुर्दैवाने शोध लागला नाही,तर इन्शुरन्स कंपनीकडून तुम्हाला नुकसानभरपाई मिळू शकते. त्यासाठी काय करायचं,याची ही थोडी माहिती...

1.एफआयआर (FIR)

कार चोरीला गेल्यानंतर स्थानिक पोलिस स्थानकात प्राथमिक माहिती अहवाल (First Information Report) दाखल करावा. पोलिसांकडून तक्रार दाखल करून घेण्यासाठी माहिती विचारली जाईल. त्यानंतर तुम्हाला FIRची कॉपी दिली जाईल. ती कॉपी तुम्हाला इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी सादर करावी लागते.

2.इन्शुरन्स कंपनीशी (Insurance Company)संपर्क

कार चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांत दाखल केल्यानंतर या घटनेची माहिती तुमच्या कारचा इन्शुरन्स ज्या कंपनीचा आहे,त्या कंपनीला द्यावी लागते.

3.प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (RTO)माहिती

-कार चोरीला गेल्याची माहिती तुमच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (RTO) देणं मोटार वाहन कायद्यानुसार बंधनकारक आहे.

4.इन्शुरन्स कंपनीकडे कागदपत्रं सादर करणं

-कार चोरीला गेल्यानंतर इन्शुरन्सचा दावा मंजूर होण्यासाठी तुम्हाला इन्शुरन्स कंपनीकडून काही कागदपत्रं (Documents) सादर करण्यास सांगितलं जाईल. त्यात खालील कागदपत्रांचा समावेश असेल.

-इन्शुरन्स कागदपत्राची प्रत

-एफआयआरची मूळ प्रत

-क्लेम फॉर्म (Claim Form)

-वाहन चालवण्याच्या परवान्याची प्रत (Driving License)

-वाहनाच्या नोंदणीपुस्तकाची प्रत (RC Book)

-आरटीओ ट्रान्स्फर पेपर्स आणि आरटीओचे अन्य फॉर्म्स

-याशिवाय दावा यशस्वी होण्यासाठी तुम्हाला कारच्या दोन्ही मूळ चाव्याही सोबत सादर कराव्या लागतात.

(हे वाचा: Explainer : प्रवासी आणि वाहन उत्पादकांसाठी Airbags बाबत नव्या नियमांचा अर्थ काय?)

5.नो-ट्रेस रिपोर्ट (No-Trace Report)

-तुमच्या चोरीला गेलेल्या कारचा काही ठरावीक कालावधीपर्यंत शोध लागला नाही,तर तुम्हाला पोलिस स्टेशनमधून नो-ट्रेस रिपोर्ट घ्यावा लागतो. दावा इन्शुरन्स कंपनीकडून मान्य केला जाण्यासाठी हा कागद महत्त्वाचा असतो.

6.दावा मंजूर होण्यासाठी किती कालावधी लागतो?

-नो-ट्रेस रिपोर्ट30दिवसांच्या आत मिळू शकत नाही. तसंच ठिकाणानुसार त्याला जास्त कालावधीही लागू शकतो. तसंच,इन्शुरन्स कंपनीला तुमच्या कारचीIDVअर्थात इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू काढण्यासाठी60ते90दिवस लागू शकतात. एकंदरीत सगळ्या प्रक्रियेला तीन ते चार महिने सहज लागू शकतात.

First published:

Tags: Car, Insurance, Police complaint, Robbery, RTO, Theft