Home /News /explainer /

CPR म्हणजे नेमकं काय असतं? आपात्कालीन परिस्थिती यामुळे कसा वाचवता येतो जीव

CPR म्हणजे नेमकं काय असतं? आपात्कालीन परिस्थिती यामुळे कसा वाचवता येतो जीव

फोटो सौजन्य - Getty Images.

फोटो सौजन्य - Getty Images.

एखाद्या पोलीस कर्मचाऱ्यानं किंवा डॉक्टरनं आपात्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णाच्या छातीवर दाब देऊन किंवा तोंडानं श्वास देऊन जीव वाचवल्याचं तुम्ही पाहिलं असेल. यालाच सीपीआर (CPR) असं म्हटलं जातं.

मुंबई, 05 जानेवारी : आपल्या आयुष्यात ऑक्सिजनला किती महत्त्व आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली की आपला जीव गुदमरू लागतो. अशीच स्थिती जर दीर्घकाळ राहिली तर जीवही जाऊ शकतो. नाका-तोंडात पाणी गेल्यानं, एकदम दाट धुरामध्ये अडकल्यास किंवा हार्ट अटॅक आल्यास ऑक्सिजनची कमतरता भासण्याची शक्यता असते. अगदी सोपं उदाहरण म्हणजे, पाण्यात पडलेल्या हिरोईनला बाहेर काढून तिला तोंडानं ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न करणारा हिरो तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये पाहिला असेल. याशिवाय एखाद्या पोलीस कर्मचाऱ्यानं किंवा डॉक्टरनं आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये रुग्णाला तोंडानं श्वास दिल्याचंही तुम्ही पाहिलं आणि ऐकलं असेल. ही प्रक्रिया नेमकी काय आहे? त्यामुळे लोकांचा जीव कसा वाचू शकतो, असे प्रश्न कधी तुम्हाला पडले आहेत का? या प्रक्रियेला वैद्यकीय भाषेत सीपीआर (CPR) असं म्हणतात. कार्डियो पल्मनरी रेसॅसिटेशन (Cardiopulmonary Resuscitation) असा सीपीआरचा लाँगफॉर्म आहे. आपत्कालीन वैद्यकीय (medical emergency) परिस्थितीमध्ये तातडीचे उपचार म्हणून सीपीआरचा वापर केला जातो. यामुळे हार्ट अॅटॅक (Heart Attack) आलेल्या आणि श्वास कोंडलेल्या एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. काही वेळा कार्डिअॅक अरेस्टमुळं (Cardiac arrest) व्यक्तीचा श्वास कोंडला जातो. तिला सामान्यपणे श्वास घेता येत नाही. अशा स्थितीत त्या व्यक्तीला कृत्रिम ऑक्सिजनची (Artificial oxygen) अत्यंत आवश्यकता असते. मात्र, प्रत्येक व्यक्तीला वेळेवर वैद्यकीय मदत मिळेलच याची शाश्वती नसते. अशा वेळी सीपीआर फार उपयुक्त ठरतो. सीपीआर कसा दिला जातो? सीपीआर देण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या औषधाची किंवा इंजेक्शन गरज भासत नाही. ज्या व्यक्तीचा श्वास गुदमरला आहे किंवा हृदयाची गती मंदावली आहे, ती पूर्ववत होऊपर्यंत छातीवर दाब दिला जातो. यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सामान्य होण्यास मदत होते. याशिवाय सीपीआरमध्ये रुग्णाला तोंडानंही श्वास दिला जातो. सीपीआर देण्याची एक विशिष्ट पद्धत असते. जिचा वापर करून अनेकांचा जीव वाचवता येऊ शकतो. हे वाचा - कोरोना काळात 'ही' उपकरणे घरात फायद्याची ठरतील; तु्म्हीही चेक करा काहीवेळा अपघातात तोंडाला जखम झाली तर तोंडातून श्वास घेता येत नाही, अशा परिस्थितीत नाकातूनही श्वास दिला जातो.  यामुळे त्या व्यक्ती किंवा रुग्णाच्या फुफ्फुसांपर्यंत ऑक्सिजन पोहचतो. यामुळे शरीरात अगोदरच असलेल्या ऑक्सिजनमिश्रित रक्ताला चालना मिळते. सीपीआरमुळे काय होतं? या प्रक्रियेचा शरीरावर काय परिणाम होतो हे आपण समजून घेऊया. जर एखाद्या व्यक्तीचा श्वासोच्छ्वास किंवा हृदयाचे ठोके बंद झाले असतील, तर पुरेशा ऑक्सिजनअभावी तिच्या शरीरातील पेशी मृत होऊ लागतात. या गोष्टीचा व्यक्तीच्या मेंदूवर परिणाम होतो. यामुळे काहीवेळा व्यक्तीचा मृत्युदेखील होतो. अशा परिस्थितीत सीपीआर दिल्यास जीव वाचू शकतो. हे वाचा - 'अतरंगी रे' मध्ये उल्लेख असणारा आजार PTSD म्हणजे नक्की काय? वाचा त्याची लक्षणं सीपीआर ही साधीसोपी आपत्कालीन उपचार प्रक्रिया आहे. मात्र, त्यासाठी बेसिक प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. त्या व्यक्तीला सीपीआरची गरज आहे की नाही हे लक्षात येणं आवश्यक आहे. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही प्रशिक्षित असाल तरच त्याचा वापर करावा, असा सल्ला तज्ज्ञ देतात. सीपीआर कसा द्यायचा हे माहीत असल्यास संकटकाळी एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवता येतो.
First published:

Tags: Health, Lifestyle

पुढील बातम्या