मुंबई, 4 जानेवारी : देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. देशासमोर तिसऱ्या कोरोना लाटेचा धोका उद्भवण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. वाढत्या कोरोना केसेसमुळे लोकांच्या मनात दुसऱ्या लाटेच्या भयानक दृश्याच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत औषध किंवा आवश्यक वैद्यकीय सुविधा मिळणेही मुश्कील होतं. सध्या कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असताना घरात असे काही गॅजेट्स असायला हवेत जे आपण आपत्कालीन परिस्थितीत वापरू शकतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गॅजेट्सबद्दल सांगत आहोत जे केवळ स्वस्तच नाहीत तर बाजारात सहज उपलब्ध आहेत आणि ते वापरण्यासही सोपे आहेत. पल्स ऑक्सिमीटर (Pulse Oximeter) पल्स ऑक्सिमीटर हे कोविड-19 च्या तपासणीतील एक अतिशय महत्त्वाचे गॅझेट आहे. कोरोनाबाधित व्यक्तीच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी थोड्या अंतराने तपासावी लागते. ऑक्सिजनची पातळी कमी होणे धोकादायक ठरू शकते. हे उपकरण हाताच्या बोटावर ठेवून तुम्ही पल्स रेट जाणून घेऊ शकता. हे तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त आहे. म्हणूनच ते घरात असलेच पाहिजे. पल्स ऑक्सिमीटरही बाजारात उपलब्ध आहे. त्याची किंमत 500 रुपयांपासून सुरू होते. Pune Corona Virus : पुण्यात कोरोनाचा विस्फोट, थेट 1 हजार 104 नवे रुग्ण; चिंता वाढली डिजिटल ग्लुकोमीटर (Digital Glucometer) हे गॅझेट रक्तातील साखर मोजण्यासाठी वापरले जाते. शुगर रुग्णांसाठी कोरोना अत्यंत जीवघेणा आहे. म्हणूनच कोरोनाच्या या युगात हे गॅझेट घरी असणे अत्यंत गरजेचे आहे. घरात कोणाच्या रक्तातील साखरेची पातळी कमी झाली किंवा वाढली तर घरीच तपासणी करून तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाणे टाळू शकता. एक चांगला ग्लुकोमीटर 800 रुपयांमध्ये येतो. कॉन्टॅक्टलेस थर्मामीटर (Contactless Thermometer) शरीराचे तापमान हे कॉन्टॅक्टलेस थर्मामीटर कोरोनाच्या तपासणीत एक अतिशय महत्त्वाचे गॅझेट आहे. याच्या मदतीने तुम्ही एखाद्याच्या शरीराला स्पर्श न करता त्याच्या शरीराचे तापमान मोजू शकता. घरातील कोणीतरी कोरोनाच्या विळख्यात असताना हे गॅझेट कामाचे आहे. तसेच सावधगिरीच्या वापरासाठी देखील ते प्रभावी आहे. चांगला थर्मामीटर हजार रुपयांना मिळतो. BREAKING : मुंबईनंतर आता पुण्यातही पहिली ते 9 वीपर्यंतच्या शाळा बंद! पुन्हा वर्ग भरणार ऑनलाइन! रॅपिड अँटीजेन सेल्फ टेस्ट किट (Rapid Antigen Self Test Kit) हे गॅझेट कोरोनाविरुद्धच्या युद्धासाठी अत्यंत प्रभावी आहे. याच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी कोरोनाची रॅपिड अँटीजेन टेस्ट करू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यात कोरोनाची काही लक्षणे आहेत आणि तुम्हाला किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हॉस्पिटलमध्ये जायचे नसेल, तर घरीच प्राथमिक चाचणी म्हणून हा एक चांगला पर्याय आहे. ही कीट बाजारात 250 ते 300 रुपयांना मिळते. नेब्युलायझर मशीन (Nebulizer machine) हे मशीन मेडिकल स्टोअर्समध्ये सहज उपलब्ध होते. तुम्ही ते ऑनलाइनही ऑर्डर करू शकता. रुग्णाला ऑक्सिजन देण्यासाठी नेब्युलायझर मशीनचा वापर केला जातो. ते थेट फुफ्फुसात ऑक्सिजन पोहोचवते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







