Home /News /explainer /

पृथ्वीवरील सुरुवातीचे महासागर आजच्या तुलनेत जास्त खारट! संशोधनातून अनेक रहस्ये उजेडात

पृथ्वीवरील सुरुवातीचे महासागर आजच्या तुलनेत जास्त खारट! संशोधनातून अनेक रहस्ये उजेडात

महासागरातील (Oceans) मिठाच्या प्रमाणात पृथ्वीबद्दल बरीच माहिती आहे. म्हणूनच पृथ्वीच्या निर्मितीच्या वेळी महासागरांमध्ये मीठ किती होते हे जाणून घेण्याचा शास्त्रज्ञ नेहमीच प्रयत्न करत असतात. एका नवीन अभ्यासात यात यश आले आहे, ज्यामध्ये असे दिसून आले आहे की पूर्वीचे महासागर आजच्या महासागरांपेक्षा जास्त खारट होते.

पुढे वाचा ...
    मुंबई, 20 डिसेंबर : पृथ्वीच्या (Earth) निर्मितीच्या इतिहासावर शास्त्रज्ञ सखोल संशोधन करत आहेत. यासाठी ते सध्या पृथ्वीच्या पृष्ठभागाचा आणि भूगर्भीय प्रक्रियांचा तसेच ऐतिहासिक संशोधन आणि इतर ग्रहांचा अभ्यास करतात. आतापर्यंत केलेल्या काही अभ्यासांच्या मदतीने शास्त्रज्ञांनी आपल्या ग्रहाच्या सुरुवातीच्या महासागरांच्या (Oceans) खारटपणाचा (Salinity) अंदाज लावण्याचा प्रयत्न केला आहे. पण नवीन अभ्यासात संशोधकांना असे आढळून आले आहे की त्यावेळच्या महासागरांचे पाणी आजच्या तुलनेत जास्त खारट होते. अनेक रहस्यांची गुरुकिल्ली महासागरांची क्षारता हा ग्रहशास्त्रज्ञांसाठी विशेष अभ्यासाचा विषय आहे. यातून त्यांना पृथ्वीवरील वातावरण, हवामान आणि जीवसृष्टीच्या विकासाविषयी बरीच माहिती मिळू शकते. येल विद्यापीठातील पृथ्वी आणि ग्रह विज्ञानाचे प्राध्यापक जून कोरेनागा आणि पदवीधर विद्यार्थी मेंग गुओ यांनी केलेले संशोधन प्रोसीडिंग्ज ऑफ द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. मीठाची पातळी काय होती? या अभ्यासात, संशोधकांनी असे सुचवले की पृथ्वीच्या अस्तित्वाच्या पहिल्या 50 कोटी वर्षांमध्ये, त्याच्या महासागरांच्या पाण्यात क्षार पातळी 7.5 टक्के होती. दुसरीकडे, जर आपण आजच्या महासागरांबद्दल बोललो तर त्यामध्ये सुमारे 2.5 टक्के मीठ आहे. यापूर्वी खारटपणाचे केलेले अंदाज सर्व अप्रत्यक्ष डेटावर आधारित होते, ते सध्याच्या पातळीच्या दहापट जास्त खारट होते. चांगली सुरुवात कोरेनागा म्हणतात की ही फक्त सुरुवातीच्या महासागरांची रसायनशास्त्र समजून घेण्याची सुरुवात आहे. कारण, त्यांच्याबद्दल अद्याप बरेच काही माहित नाही, तरीही कोरेनागा यांचा असा विश्वास आहे की आता शास्त्रज्ञांना एक मजबूत पाया सापडला आहे ज्यानंतर आता पुढील काम केले जाऊ शकते. -83 अंश सेल्सिअस तापमानात लोकं कशी राहत असतील? हॅलोजनची भूमिका कोरेनागा आणि गुओ यांनी त्यांच्या संशोधनाची सुरुवात एका मोठ्या आणि मूलभूत प्रश्नाने केली. त्यांना हे जाणून घ्यायचे होते की किती हॅलोजन, म्हणजे फ्लोरिन, क्लोरीन, ब्रोमाइन आणि आयोडीन यांसारख्या घटकांनी धातूंवर प्रतिक्रिया झाल्याने पृथ्वीवरील मीठाची निर्मिती झाली. हे घटक ग्रहाच्या निर्मिती आणि विकासाच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. अनेक गोष्टी निश्चित हॅलोजनची उपस्थिती आणि प्रमाण पृथ्वीचे वातावरण, महासागर आणि खडकाळ आवरण यांच्या परस्परसंवादावर परिणाम करते. समुद्राच्या पाण्यात त्यांच्या उपस्थितीला विशेष महत्त्व आहे. कारण पृथ्वीवर जीवसृष्टीची निर्मिती केवळ महासागरातूनच शक्य होती. गुओ म्हणतात की महासागराच्या पाण्याचे रसायनशास्त्र केवळ महासागरांच्या आंबटपणावर परिणाम करत नाही तर महासागर आणि वातावरण यांच्यातील कार्बन डायऑक्साइडचे विभाजन देखील ठरवते. हॅलोजनच्या विपुलतेचा अंदाज हॅलोजनच्या जागतिक मुबलकतेचे आतापर्यंतचे अंदाज पृथ्वीच्या कवच आणि आवरण यांच्यातील काही घटकांचे प्रमाण नेहमीच स्थिर असतात या गृहितकावर आधारित होते. हे अंदाज सूचित करतात की बहुतेक हॅलोजन पृष्ठभागाजवळ राहतात. या अभ्यासात कोरेनागा आणि गुओ यांना हे सत्य नसल्याचे आढळून आले आहे. उत्तर भारतात पारा झपाट्याने का घसरतोय! शास्त्रज्ञांचा इशारा काय सांगतो? संशोधकांनी हॅलोजनच्या प्रमाणाचा अंदाज घेण्यासाठी आणि पृथ्वीवरील पृष्ठभागापासून आतील स्तरांपर्यंत त्यांचे चक्र शोधण्यासाठी नवीन अल्गोरिदमिक साधन वापरले. त्यांना आढळले की 50 कोटी वर्षांपूर्वी ग्रहाच्या आतील थरांमधून क्लोराईड आणि इतर हॅलोजन बाहेर फेकले गेले होते, ज्यामुळे पृष्ठभागावर अधिक हॅलोजन तयार झाले. यानंतर, त्यापैकी बहुतेक परत आवरणाच्या थरावर गेले आहेत.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Deep ocean, Earth, Indian ocean

    पुढील बातम्या