तमिळनाडू, 09 डिसेंबर: तामिळनाडूत झालेल्या भीषण दुर्घटनेत देशाचे चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपीन रावत (CDS Bipin Rawat) यांचं निधन झालं. भारतीय वायूदलाने ट्विट करत याबबात माहिती दिली आहे. जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह विमानात (IAF helicopter crash in Tamil Nadu) असलेल्या आणखी 11 जणांचं दुर्देवी निधन झालं. आता समोर आलेल्या माहितीनुसार, IAF हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. याचा EXCLUSIVE Video न्यूज 18 च्या हाती आला आहे. काल घडली घटना न्यूज एजन्सी एएनआयच्या वृत्तानुसार, या हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 जण प्रवासी करत होते. यामध्ये बिपीन रावत, बिपीन रावत यांच्या पत्नी, लष्कराचे काही अधिकारी तसेच इतर सुरक्षारक्षक, कमांडोज उपस्थित होते. अपघातानंतर तात्काळ घटनास्थळी मदतकार्य सुरू करण्यात आले होते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी ही दुर्घटना घडली आहे. हेलिकॉप्टर कोसळताच आग लागली. घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य वेगाने सुरू करण्यात आले होते. या घटनेबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती दिली आहे.
IAF हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स सापडला pic.twitter.com/84vVX6kZI0
— News18Lokmat (@News18lokmat) December 9, 2021
प्राथमिक माहितीनुसार, सीडीएस बिपीन रावत हे आपल्या पत्नीसोबत एका कार्यक्रमासाठी तमिळनाडूला गेले होते. वेलिंग्टन येथे आर्म्ड फोर्सेजचं कॉलेज आहे. जेथे सीडीएस बिपीन रावत यांचं लेक्चर होतं. तेथून ते हेलिकॉप्टरने कुन्नूर येथे येत असताना कुन्नूर येथे त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. कुन्नूर येथून बिपीन रावत हे दिल्लीला जाणार होते. मात्र, कुन्नूर येथे पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. या अपघातानंतर लष्कराने चौकशीचे आदेश दिले आहेत. असं म्हटलं जात आहे की, ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली आहे त्या परिसरात घनदाट जंगल आहे. या घटनास्थळावरचे फोटोज आणि व्हिडीओ सुद्धा समोर आले आहेत.