मराठी बातम्या /बातम्या /explainer /Human Rights Day 2021: जागतिक मानवाधिकार दिवस आज का साजरा केला जातो? दुसऱ्या महायुद्धात असं काय घडलं?

Human Rights Day 2021: जागतिक मानवाधिकार दिवस आज का साजरा केला जातो? दुसऱ्या महायुद्धात असं काय घडलं?

संयुक्त राष्ट्रसंघाने (United Nations) यंदाच्या जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त (World Human Right Day) समानता ही थीम आणली आहे. जगभरात हा दिवस 10 डिसेंबरला का साजरा केला जातो? या दिवसामागचं उदीष्ट काय आहे?

संयुक्त राष्ट्रसंघाने (United Nations) यंदाच्या जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त (World Human Right Day) समानता ही थीम आणली आहे. जगभरात हा दिवस 10 डिसेंबरला का साजरा केला जातो? या दिवसामागचं उदीष्ट काय आहे?

संयुक्त राष्ट्रसंघाने (United Nations) यंदाच्या जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त (World Human Right Day) समानता ही थीम आणली आहे. जगभरात हा दिवस 10 डिसेंबरला का साजरा केला जातो? या दिवसामागचं उदीष्ट काय आहे?

मुंबई, 10 डिसेंबर : अवघ्या काही वर्षांमध्ये दोन महायुद्ध झाल्याने जगभरातील (World) देशांना पुन्हा महायुद्ध नको होतं, यामुळे अशी काही व्यवस्था करण्यावर सर्वांचं एकमत झालं. पहिल्या महायुद्धानंतर शांततेसाठी उचललेली अनेक पावले दुसऱ्या महायुद्धाला कारणीभूत ठरली. हे टाळण्यासाठी 1945 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाची (United Nations) स्थापना करण्यात आली. 1848 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने स्वीकारलेली मानवी हक्कांची सार्वत्रिक घोषणा हे त्याचे महत्त्वाचे पाऊल होते.

हा दिवस साजरा करण्याचा उद्देश काय आहे?

मानवी अधिकार दिवस लोकांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि भौतिक अधिकारांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी साजरा केला जातो, ज्याने प्रत्येक व्यक्तीची समृद्धी सुनिश्चित होईल. या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघ जगातील देशांना सर्व लोकांना समान संधी देण्यासाठी प्रोत्साहित करते.

प्रेरणा कशी मिळाली?

दुसऱ्या महायुद्धात जगात मानवी अत्याचाराचा कळस पाहिला. द्वेषामुळे लाखो निरपराध लोकांना अमानुष छळ सहन करावा लागला ज्यातून अनेक दशके जग सावरू शकले नाही. म्हणूनच संयुक्त राष्ट्रांनी मानवी हक्कांसाठी एक घोषणापत्र जारी केले, जेणेकरून जगाला मानवतेचे संरक्षण सुनिश्चित करता येईल आणि सर्व देश असमानता, बहिष्कार आणि भेदभाव समाप्त करण्यासाठी कार्य करू शकतील.

हा दिवस काय सांगतो?

आजचा 10 डिसेंबर हा प्रत्येक वर्षी मानवाने उपभोगलेल्या सर्व अधिकारांचा द्योतक आहे मग तो रंग, वंश, लिंग, भाषा, राजकीय किंवा इतर विचार, राष्ट्रीय असो वा सामाजिक, मालमत्ता, जन्म किंवा इतर स्तरावर मुक्त असणे. हा दिवस समतेच्या तत्त्वाचा पुरस्कार करतो आणि कोणत्याही प्रकारच्या भेदभावापासून मुक्त करतो.

भारताच्या लोकसंख्येला लागणार ब्रेक? जगभरातील लोकसंख्याही कमी होणार

या वर्षाची थीम काय आहे?

2021 ची संयुक्त राष्ट्रसंघाची थीम “समानता – असमानता कमी करणे, मानवी हक्कांची प्रगती करणे” आहे. ही थीम मानवी हक्क घोषणेच्या कलम 1 शी संबंधित आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की सर्व मानव स्वतंत्र जन्माला आले आहेत. त्यांना समान सन्मान आणि अधिकार आहेत.

समानतेची पूर्वीपेक्षा जास्त गरज

युनायटेड नेशन्सच्या वेबसाइटवर या थीमबद्दल बोलताना असे म्हटले आहे की समानता आणि भेदभाव न करण्याची तत्त्वे मानवी हक्कांच्या केंद्रस्थानी आहेत. संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे की आज मानवी हक्क आणि हा दिवस नेहमीपेक्षा अधिक प्रासंगिक आहे. कारण जगातील असमानता कमी करण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त गरज आहे.

कोविड-19 महामारीचा सामना करताना असमानता

असमानतेची दोन मोठी उदाहरणे जगाने या वर्षात पाहिली आहेत. यापैकी एक म्हणजे कोविड-19 लसीच्या वापरातील असमानता, संयुक्त राष्ट्रांनी आणि त्याच्या सहयोगी राष्ट्रांनी हे ओळखले आहे की जर जगाने लसींच्या बाबतीत समानतेची योग्य भावना दाखवली असती, तर कदाचित आपण महामारीचा सामना करू शकलो असतो. त्यामुळे विषमतेला सामोरे जाण्यासाठी अधिक गांभीर्याची गरज आहे.

MI 17 helicopter | रशियन MI 17 हेलिकॉप्टर भारताला कशी मिळाली? कुठे होते देखलभाल?

दुसरी परिस्थिती हवामान बदलाची आहे. विकसित आणि विकसनशील देशांमधील असमानता जी ग्लास्गो येथे यावर्षीच्या हवामान शिखर परिषदेत दिसून आली. त्यामुळे हवामान बदल हाताळण्याच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे. याशिवाय, 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिनी, असमानतेमुळे उद्दिष्टांच्या दिशेने पुरेशी गती नसणे हे अधोरेखित केलं आहे. आज मानवी हक्कांवर थेट परिणाम करणाऱ्या विविध प्रकारच्या असमानतेला अधिक कठोरपणे सामोरे जाण्याची गरज आहे.

First published:

Tags: Corona, Nobel peace prize, War