Home /News /explainer /

MI 17 helicopter | रशियन MI 17 हेलिकॉप्टर भारताला कशी मिळाली? कुठे होते देखलभाल?

MI 17 helicopter | रशियन MI 17 हेलिकॉप्टर भारताला कशी मिळाली? कुठे होते देखलभाल?

भारतीय हवाई दलाच्या (IAF) Mi-17 हेलिकॉप्टरची (Mi 17 Helicopter) संपूर्णपणे भारतात देखभाल केली जात आहे. पाच वर्षांपूर्वीपर्यंत त्याच्या इंजिनची चाचणी, देखभाल आणि दुरुस्ती देशात झाली नव्हती. पण चंदीगड येथील भारतीय हवाई दलाच्या 3 बेस रिपेअर डेपोने (3 BRD) हे कामही आपल्या हातात घेतलं आहे. ही हेलिकॉप्टर उत्कृष्ट सेवा देण्यासाठी ओळखली जातात.

पुढे वाचा ...
  मुंबई, 9 डिसेंबर : सीडीएस जनरल बिपिन रावत (General Bipin Rawat) यांचा मृत्यू झालेल्या एमआय हेलिकॉप्टरचा (MI Helicopeter) हा पहिला अपघात नाही. याआधीही हे अनेकदा क्रॅश झालं आहे. या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असले तरी या हेलिकॉप्टरची वैशिष्ट्ये आणि क्षमता यांची योग्यता एकदा नक्कीच तपासली जाईल, अशी शक्यता आहे. आठ वर्षांपूर्वी देशात प्रथमच आलेल्या या हेलिकॉप्टरची देखभाल चंदीगड येथील भारतीय हवाई दलाच्या 3 बेस रिपेअर डेपोमध्ये केली जाते. रशियासोबत झालेल्या करारांतर्गत ही हेलिकॉप्टर भारतात 2008 मध्ये भारत आणि रशिया यांच्यात झालेल्या 1.3 अब्ज रुपयांच्या करारानुसार Mi-17V5 हेलिकॉप्टर भारताला मिळाले आहेत, ज्याची डिलिव्हरी 2011 मध्ये सुरू झाली आणि फेब्रुवारी 2013 पर्यंत भारतात 36 हेलिकॉप्टर आले. प्रगत वाहतूक हेलिकॉप्टर कार्गो वाहतूक, गस्त, शोध आणि बचाव कार्य यासारख्या कामांसाठी अतिशय योग्य मानली जाते. देशातचं देखभाल करण्याचा निर्णय हेलिकॉप्टरच्या संपूर्ण देखभालीच्या बाबतीत पूर्ण स्वावलंबनाच्या दृष्टीने हे एक मोठं पाऊल होतं. यामुळे सर्व MI-17 V5 च्या उत्पादनानंतरच्या देखभालीची क्षमता सुनिश्चित करणे अत्यंत आवश्यक झाले. मेक इन इंडिया अंतर्गत देशावरील आर्थिक भार कमी करण्यासाठी, MI-17 V5 हेलिकॉप्टरच्या इंजिनांची देखभाल भारतातच करणे ही एक मोठी गरज होती. 1962 मध्ये स्थापना 3BRD ची स्थापना भारतीय हवाई दलाने फेब्रुवारी 1962 मध्ये रशियाकडून प्राप्त वाहतूक विमाने, हेलिकॉप्टर, त्यांची इंजिने आणि इतर संबंधित उपकरणांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी केली होती. डेपोने आधीच 1965 आणि 1971 च्या युद्धात वापरल्या गेलेल्या विविध युद्ध उपकरणांसाठी देखभाल आणि दुरुस्ती सेवा प्रदान केल्या आहेत. या डेपोने AN-12, IL-14 विमाने, Mi-14 हेलिकॉप्टर, त्यांची इंजिने आणि इतर वस्तूंची तपासणी, दुरुस्ती आणि देखभाल केली आहे. ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? विमान किंवा हेलिकॉप्टर अपघाताचं रहस्य तो कसं सांगतो? 1980 च्या दशकात 3BRD ने Mi-8, TV-2 एरोइंजिन आणि VR8 MGB ची चाचणी आणि दुरुस्ती केली आहे. त्यानंतर डेपोने Mi-17 हेलिकॉप्टर आणि AI-20D इंजिन इत्यादींच्या देखभालीसाठी देखील स्वतःला अपग्रेड केलं आणि आज इंजिनसह या हेलिकॉप्टरची पूर्णपणे देखभाल केली जाते. 3BRD ची महत्वाची भूमिका रशियाचे एमआय-17 हेलिकॉप्टर शांतता आणि युद्धात उत्कृष्ट सेवा देत असल्याचे मानले जाते. पण, आता त्यांची संख्या एवढी वाढली आहे की, त्यांची देखभाल आणि दुरुस्ती देशातच करणे आवश्यक झालं आहे. 3BRD ने त्यांची त्वरीत देखभाल करण्यासाठी स्वतःला पूर्णपणे तयार केलं आहे.

  NDA विद्यार्थी ते देशाचे पहिले CDS! कसा होता जनरल बिपिन रावत यांचा प्रवास

  लष्करी उपकरणे आणि शस्त्रास्त्रांच्या देखभालीमध्ये देशाला स्वावलंबी होण्याची सध्या नितांत गरज आहे. या संदर्भात, 3BRD अपेक्षेपेक्षा चांगले काम केलं आहे. मात्र, अजून खूप काम करणे बाकी आहे. शस्त्रास्त्रांच्या निर्मितीमध्ये देश स्वयंपूर्ण होण्यासाठी आधी त्याच्या देखभालीमध्ये स्वयंपूर्ण असणे आवश्यक आहे.
  Published by:Rahul Punde
  First published:

  Tags: Army, Helicopter, Indian army

  पुढील बातम्या