मराठी बातम्या /बातम्या /explainer /भारताच्या लोकसंख्येला लागणार ब्रेक? जगभरातील लोकसंख्याही कमी होणार, कारण वाचून हैराण व्हाल

भारताच्या लोकसंख्येला लागणार ब्रेक? जगभरातील लोकसंख्याही कमी होणार, कारण वाचून हैराण व्हाल

population decline : एक नवीन अहवाल आला आहे, ज्यात म्हटले आहे की काही दशकांनंतर भारत आणि जगाच्या वाढत्या लोकसंख्येला ब्रेक लागेल. यानंतर लोकसंख्या वाढणार नाही तर घटू लागेल. याची अनेक कारणं सांगितली आहेत.

population decline : एक नवीन अहवाल आला आहे, ज्यात म्हटले आहे की काही दशकांनंतर भारत आणि जगाच्या वाढत्या लोकसंख्येला ब्रेक लागेल. यानंतर लोकसंख्या वाढणार नाही तर घटू लागेल. याची अनेक कारणं सांगितली आहेत.

population decline : एक नवीन अहवाल आला आहे, ज्यात म्हटले आहे की काही दशकांनंतर भारत आणि जगाच्या वाढत्या लोकसंख्येला ब्रेक लागेल. यानंतर लोकसंख्या वाढणार नाही तर घटू लागेल. याची अनेक कारणं सांगितली आहेत.

मुंबई, 9 डिसेंबर : जगभरातील अनेक समस्यांपैकी लोकसंख्येचा विस्फोट ही मोठी अडचण समजली जाते. वाढती लोकसंख्या कमी करण्यासाठी जगभरात अनेक उपाययोजना करण्यात आल्या. यात काहींना यश आलं तर काहींना नाही. भारतात देखील लोकसंख्या हा मोठा प्रश्न आहे. इथंही लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी अनेक उपाय करण्यात आले आहेत. याच संदर्भात आता दिलासादायक बातमी आली आहे. शतकानुशतके वाढत असलेली जगाची लोकसंख्या कधी कमी होईल हे एक अभ्यास सांगणार आहे. लॅन्सेटच्या नव्या अहवालात ही बाब समोर आली आहे. ज्यामध्ये हे कधी होणार आहे याचे आकलन करण्यात आलं आहे. याची सुरुवात याच शतकात होणार आहे.

सध्या जगाची लोकसंख्या 7.8 अब्ज असल्याचे मानले जाते. या अहवालात असे म्हटले आहे की 2064 पर्यंत जगाची लोकसंख्या 9.7 अब्ज पर्यंत वाढेल. मात्र, त्यानंतर ती घसरण्यास सुरुवात होईल. यानुसार सन 2100 पर्यंत जगाची लोकसंख्या 8.79 अब्जांपर्यंत घसरली पाहिजे.

सन 2064 ला अजून 53 वर्षे बाकी आहेत, पण हीच वेळ असेल जेव्हा जगातील लोकसंख्येचा हा सर्वोच्च बिंदू असेल हे निश्चित. लोकसंख्या कमी होण्याची अनेक कारणे असतील. ज्यामध्ये कमी जन्मदर आणि म्हातारी होणाऱ्या लोकसंख्येचा समावेश असेल. हे जपान, थायलंड, स्पेन, पोर्तुगाल, दक्षिण कोरिया आणि इतर देशांसह किमान 23 देशांमध्ये होईल, ज्यांची लोकसंख्या 50 टक्क्यांपर्यंत कमी होणार आहे.

चीनची लोकसंख्या किती कमी होईल?

चीन सध्या सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. 2017 मध्ये तेथील लोकसंख्या 1.4 अब्ज होती. मात्र, 2100 पर्यंत ती निम्म्याने घसरून सुमारे 73.2 कोटी इतकी होईल.

काही देशांमध्ये त्याहूनही अधिक

अहवालात असेही म्हटले आहे की अर्थातच काही देशांमध्ये लोकसंख्या कमी होईल आणि त्याचा परिणाम जगाच्या लोकसंख्येवर होईल. मात्र, काही ठिकाणे अशी असतील जिथं लोकसंख्या वाढेल, जसे की उत्तर आफ्रिका, मध्य पूर्व आणि सहारा आफ्रिका येथील लोकसंख्या सध्याच्या 1.03 अब्ज वरून 3.07 अब्ज पर्यंत वाढू शकते.

हनिमून डेस्टिनेशन नाही तर 'या' कारणांसाठी पर्यटक सर्वात जास्त उटीला भेटा देतात!

भारतातील लोकसंख्या किती कमी होईल?

भारतातही लोकसंख्या कमी होण्यास सुरुवात होईल, असे या अभ्यासात म्हटले आहे. सध्या 1.4 अब्जाच्या जवळपास असलेली लोकसंख्या 2100 पर्यंत 1.09 अब्जांवर येईल. जगात शेवटची लोकसंख्या 14 व्या शतकात कमी झाली होती. त्याचे कारण होते प्लेग. इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशनमधील ग्लोबल हेल्थचे प्राध्यापक स्टॅन एमिल वॉल्सेट यांनी या अभ्यासाचे नेतृत्व केलंय. ते म्हणतात की आमचा अंदाज बरोबर असेल तर लोकसंख्या कमी होण्याचे कारण म्हणजे प्रजनन क्षमता कमी होणे असेल महामारी नाही.

असं का होईल?

अहवाल सांगतो की मुलींच्या शिक्षणात आणखी सुधारणा झाल्यामुळे गर्भधारणा रोखण्याच्या पद्धती वाढतील आणि त्यामुळे प्रजननक्षमता आणि लोकसंख्या दोन्ही कमी होईल. सन 2017 मध्ये प्रजनन दर 2.37 होता, जो 2100 मध्ये 1.6 होईल.

हवामानाची महत्वाची भूमिका

जगातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ मिचियो काकू यांनी "भविष्यातील भौतिकशास्त्र - द इन्व्हेन्शन्स दॅट विल ट्रान्सफॉर्म अवर लाईव्ह्स" या पुस्तकात याबद्दल खूप छान लिहिले आहे. त्यांनी लिहिले आहे की हवामानशास्त्रज्ञांच्या मते, 2030 पर्यंत हवामान ज्या प्रकारे बदलेल, ते मानवी प्रजातींसाठी विनाशकारी सिद्ध होईल. उष्णता वाढू लागेल. पाण्याच्या कमतरतेसह हवेत ऑक्सिजनची कमतरता असेल. आपली लोकसंख्या शंभर कोटींपर्यंत कमी होईल असा अंदाज आहे. इतर काही शास्त्रज्ञांचे मत वेगळे असले तरी हंगामापेक्षा वाढीचा दर कमी झाल्याने लोकसंख्या थांबेल असे त्यांचे म्हणणे आहे.

चीनमध्ये तिसऱ्या मुलाला जन्म दिल्यावर आता सबसिडीसह टॅक्समध्ये सूट!

माणसं आजारांना बळी पडतील

आपण बहुतेक काम यंत्रांच्या साहाय्याने करत असल्याने ग्लोबल वॉर्मिंग आणि निसर्गापासून दूर जात आहोत. अशात नवनवीन आजार उद्भवू शकतात. यंत्र आपल्याला आराम देतील, पण त्यामुळे आपल्या स्नायूंमधील ताकद संपेल आणि आपण कमकुवत होऊ. वैद्यकीय तंत्रज्ञान आणि प्रतिजैविकांच्या विकासामुळे शरीराच्या संरक्षण प्रणालीवर अधिक नकारात्मक परिणाम होऊ शकतात.

60 च्या दशकानंतर जीवन आणि जग कसे बदलेल

प्रसिद्ध शास्त्रज्ञ मिचिओ काकू यांनी "भविष्यातील भौतिकशास्त्र - द इन्व्हेन्शन्स दॅट विल ट्रान्सफॉर्म अवर लाईव्ह्स" या पुस्तकात म्हटले आहे की, "इतर ग्रहांवर आणि अवकाशात वसाहती उभारण्याच्या योजना सुरू होतील. एक नवीन सौर ग्रह देखील शोधला जाऊ शकतो. अंतराळ उड्डाणे अगदी सामान्य होतील. नैसर्गिक ऊर्जा संसाधनांच्या संपुष्टात येण्याची उलटी गिनती सुरू होईल, सूर्याच्या किरणोत्सर्गाच्या किंवा अवकाशातील इतर ग्रहांच्या पर्यायी ऊर्जेच्या शोधाला आकार दिला जाईल. या सर्व गोष्टींबाबत सर्व देशांमध्ये एक नवीन मंच तयार केला जाईल. लोकसंख्या वाढण्याऐवजी कमी होईल. वाढीचा दर कमी झाल्यामुळे, मशीन्स आणि इंटरनेटवर आधारित जीवनावर अवलंबून राहिल्यामुळे प्रजनन शक्ती कमी होणे हे याचं कारण असू शकते. जुन्या परंपरा जतन करण्याचे अयशस्वी प्रयत्न सुरूच राहतील. जुनी जीवनशैली आणि घडामोडी संग्रहालयाच्या वस्तू बनू शकतात."

First published:

Tags: Elderly population, One child policy, Population