जाहिरात
मराठी बातम्या / देश / लहान मुलांवरील कोरोना लशीचं ट्रायल थांबवा; याचिकाकर्त्याने का घेतली कोर्टात धाव?

लहान मुलांवरील कोरोना लशीचं ट्रायल थांबवा; याचिकाकर्त्याने का घेतली कोर्टात धाव?

लहान मुलांसाठी आता आणखी एक धोक्याची घंटा वाजलेली आहे.

लहान मुलांसाठी आता आणखी एक धोक्याची घंटा वाजलेली आहे.

याच महिन्यात लहान मुलांवर कोरोना लशीचं क्लिनिकल ट्रायल (Child corona vaccine clinical trial) सुरू होणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 03 जून : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोरोनाचं (Coronavirus in children) वाढतं संक्रमण आणि तिसऱ्या लाटेत जास्त धोका लक्षात घेता आता लहान मुलांनाही कोरोना लस (Child corona vaccination) देण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. अवघ्या काही दिवसांतच लहान मुलांवरील कोरोना लशीची चाचणी सुरू (Child corona vaccine clinical trial) होणार आहे, पण आता याविरोधात दिल्ली उच्च न्यायालायात (Delhi High Court) याचिका दाखल करण्यात आली आहे. लहान मुलांवरील कोरोना लशीचं ट्रायल थांबवा अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने  (DCGI) भारत बायोटेकच्या ( Bharat Biotech) कोवॅक्सिन (Covaxin) लशीची कोरोना चाचणी करायला मंजुरी दिली आहे. पण ही चाचणी सुरू होण्याआधी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.  2 ते 18  वयोगटातील लहान मुलांवर कोवॅक्सिन कोरोना लशीचं दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलला स्थगिती द्यावी, अशा मागणीची ही याचिका आहे. हे वाचा -  धक्कादायक! कोरोनाने चिमुकल्याचं 90% फुफ्फुस पोखरून काढलं, तरी टेस्ट निगेटिव्ह पीटीआयच्या वृत्तानुसार याचिकाकर्ते संजीव कुमार यांनी सांगितलं, केंद्र सरकार आणि भारत बायोटेकला याआधी नोटीस बजावण्यात आली आहे. ते प्रकरण हायकोर्टात पेंडिग आहे. जूनपासून ट्रायल सुरू होणार आहे. कोर्टाने याप्रकरणी सुनावणी देतात स्थगिती दिलेली नाही, त्यामुळे सरकार ट्रायल सुरू करत आहे. लहान मुलांना क्लिनिक ट्रायलमध्ये सहभागी झालेले स्वयंसेवक नाही म्हणू शकत कारण, चाचणी परिणाम समजून घेण्यास ते सक्षम नाहीत. निरोगी मुलांवर चाचणी करणं म्हणजे मनुष्यवध आहे, असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे अशा प्रकरणात मृत्यू झाल्यास खटल्याची मागणी त्यांनी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात