Home /News /coronavirus-latest-news /

आयुर्वेदिक उपचार करताना एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू नाही; All India Institute of Ayurveda चा मोठा दावा

आयुर्वेदिक उपचार करताना एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू नाही; All India Institute of Ayurveda चा मोठा दावा

दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने (All India Institute of Ayurveda) आपण सर्व कोरोना रुग्णांना बरं केल्याचा दावा केला आहे.

    रवी सिंह/नवी दिल्ली, 03 जून : कोरोना रुग्णांवर आयुर्वेदिक (Corona patient ayurvedic treatment) आणि अ‍ॅलोपॅथिक उपचारांवरून योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (Indian Medical Association) यांच्यामध्ये वाद सुरू असताना दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने  (All India Institute of Ayurveda) मोठी माहिती दिली आहे. आतापर्यंत 600 कोरोना रुग्णांवर यशस्वी उपचार केल्याचं सांगत उपचारावेळी एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही, असा दावा या संस्थेने केला आहे. केंद्र सरकारच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदाने आपण आतापर्यंत 600 कोरोना रुग्णांवर यशस्वी उपचार केले असून, ते सर्व रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती बुधवारी दिली होती. या रुग्णालयात सौम्य आणि कमी गंभीर कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. एका रुग्णाची प्रकृती गंभीर होती पण त्याला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तिथं त्याचा मृत्यू झाला आहे. म्हणजे इथं दाखल असलेल्या  रुग्णांपैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला नाही, असं या इन्स्टिट्यूटने म्हटलं आहे. हे वाचा - लहान मुलांवरील कोरोना लशीचं ट्रायल थांबवा; याचिकाकर्त्याने का घेतली कोर्टात धाव? 94 टक्के रुग्णांवर आयुर्वेदाने उपचार करण्यात आले. यामुळे आयुर्वेदिक औषधं, योग आणि प्राणायामचा समावेश आहे. तर फक्त 6 टक्के रुग्णांवर उपचारासाठी अ‍ॅलोपॅथीची मदत घेतल्याचं इन्स्टिट्यूने सांगितलं आहे. एआयआयएच्या डॉ. तनुजा नेसारी यांनी सांगितलं, आमच्या इथं 99.99% रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. 47 बेड असलेल्या या रुग्णालयात आयुर्वेदिक औषध, योग, हवन आणि प्राणायमाने उपचार केले जातात. फक्त रुग्णच नव्हे तर रुग्णालयातील कर्मचारीही योग, प्राणायाम करतात. सकाळी यज्ञ आणि हवन केलं जातं. गिलोई, काही हर्ब्स, आयुष 64, आयुष काढा आणि अश्वगंधा उपचारासाठी रुग्णांना दिलं जातं. रुग्णालयाचे कर्मचारी रुग्णांना प्रोत्साहीतही करतात. जर गरज पडली तर इथं अ‍ॅलोपॅथी डॉक्टरही आहेत. बाबा रामदेव यांचाही आयुर्वेदाने कोरोना रुग्ण बरं केल्याचा दावा कोरोनातून देशाला वाचवण्यात डॉक्टरांचं मोठं काम आहे, हे मी मान्य केलं आहे, पण तसं असलं तरी 90 टक्के रुग्ण बरे करणाऱ्या आयुर्वेदाला कमी लेखण्याचं काम करू नये असं बाबा रामदेव म्हणाले. बाबा रामदेव यांनी 90 टक्के कोरोना रुग्ण योग आयुर्वेदाच्या मदतीने ठीक झाल्याचा दावा केला होता. 90 टक्के रुग्ण प्राणायाम करून बरे झाल्याचा पुनरुच्चान त्यांनी केला. या दाव्यानंतर कोरोना रुग्णांची जबाबदारी बाबा रामदेव यांनी घ्यावी असं आव्हान आयएमएनं दिलं होतं. त्यावर व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवरील रुग्णांना डॉक्टरांनी सांभाळावं इतर सर्वांच्या उपचाराची मी जबाबदारी घेतो असा दावा रामदेव बाबांनी केला. अ‍ॅलोपॅथीबाबत काय म्हणाले होते बाबा रामदेव? योगगुरु रामदेव यांनी कोरोना मृत्यूमागे अ‍ॅलोपॅथी औषधोपचार कारण असल्याचं सार्वजनिकरित्या सांगितलं आहे. कोरोना रुग्णांवर अ‍ॅलोपॅथी औषधांचा मारा केल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. लशीचे दोन डोस घेऊन डॉक्टरांचा मृत्यू झाला. त्यांच्या या विधानांमुळे कोरोनाकाळात रुग्णांची सेवा करण्याऱ्या डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेतला. बाबा रामदेव यांत अब्रूनुकसानीचा दावा ठोकला.  केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी देखील याप्रकरणी हस्तक्षेप केला होता. यासंदर्भात त्यांनी योगगुरू रामदेवबाबा यांना पत्र लिहून रामदेव बाबांना वादग्रस्त विधान मागं घेण्यास सांगितलं होतं. हे वाचा - धक्कादायक! कोरोनाने चिमुकल्याचं 90% फुफ्फुस पोखरून काढलं, तरी टेस्ट निगेटिव्ह आयएमएनं आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पंतजली योगपीठने योगगुरू रामदेव यांची तशी भावना नसल्याचं सांगितलं. तसंच न्यूज 18 च्या विशेष मुलाखतीत बोलताना बाबा रामदेव यांनी हा वाद संपवण्याची मनापासून इच्छा असल्याचं म्हटलं आहे. ही वेळ स्वार्थ सोडून लोकांचा विचार करण्याची आहे. उपचारासाठी लाखो रुपये खर्च करण्याची ऐपत नसणाऱ्यांबाबत विचार करावा असंही बाबा रामदेव म्हणाले. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यासाठी रामदेव बाबांनी माफी मागत असल्याचं म्हटलं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Ayurved, Corona patient, Coronavirus

    पुढील बातम्या