मुंबई, 07 सप्टेंबर : तुम्हाला जीम, एक्सरसाइझ यासाठी बिलकुल वेळ मिळत नसेल तर फक्त चालणंही तुमच्यासाठी पुरेसं आहे. अजिबात घाम न गाळता, हेवी वर्कआउट (Heavy Workout) न करता केवळ चालण्याचा (Walking) व्यायाम (Walking excercise) करण्याचेही अनेक फायदे (Walking benefits) आहेत. अनेक संशोधनांतून तसं सिद्ध झालं आहे. अनेक डॉक्टर्सही त्याची शिफारस करतात. दररोज केवळ 15 ते 30 मिनिटं चालणं शरीराला किती विकारांपासून दूर ठेवू शकतं (Benefits of walking).
आता फक्त चालण्यानेच कसं काय बरं शरीर फिट राहतं. चालण्याचे नेमकं काय फायदे आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का? चला
1. मेंदूचं आरोग्यही राहील चांगलं
- चालण्याचा व्यायाम केल्यावर केवळ शरीरावरच नव्हे तर मेंदूवरही चांगले परिणाम दिसून येतात. चालण्यामुळे मेंदूतल्या एंडॉर्फिन (Endorphin) या हॉर्मोनच्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे (Mental Stress) स्ट्रेस अर्थात ताण कमी होतो, असं अभ्यासात आढळून आलं आहे.
2. वेगाने चालणं हृदयासाठी चांगलं
- अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या माहितीनुसार, धावण्याप्रमाणेच चालण्याचा व्यायामही हृदयाच्या आरोग्यासाठी (Heart Health) चांगला आहे. चालण्यामुळे हृदयातलं रक्ताभिसरण (Circulation) वाढतं, कोलेस्टेरॉलची (Cholesterol Level) पातळी कमी होते आणि ब्लड प्रेशर (Blood Pressure) स्थिर राहण्यास मदत होते.
हे वाचा - हात मोडला पण जिद्द सोडली नाही! तब्बल 9 तास Plank करत विश्वविक्रम; पाहा VIDEO
3. फुप्फुसांपर्यंत पोहोचतो जास्त ऑक्सिजन
- चालण्याच्या व्यायामामुळे फुप्फुसं (Lungs) मजबूत होण्यास मदत होते. कारण या व्यायामामुळे ऑक्सिजनचा शरीरातला प्रवाह वाढतो. त्यामुळे फुप्फुसं निरोगी राहतात आणि अनेक विकारांपासून त्यांचा बचाव होतो.
4. डायबेटीसचा धोका कमी
- संशोधनातून असं दिसून आलं आहे, की ज्या व्यक्ती चालण्याचा व्यायाम नियमितपणे करतात, त्यांच्या शरीरात ग्लुकोजची (Blood Glucose Level) मात्रा नियंत्रणात राहते. त्यामुळे डायबेटीसचा (Diabetes) धोका कमी असतो.
5. जिममध्ये घाम गाळण्यापेक्षा चांगलं
- रोज चाललं, तर शरीरातल्या अतिरिक्त चरबीपासून (Fats) सुटका होऊ शकते. चालल्यामुळे शरीरातले स्नायू (Muscles) फिट राहतात. जिममध्ये घाम गाळून व्यायाम करण्यापेक्षा चालण्याचा व्यायाम खूप सोपा आहे.
6. सांधे आणि हाडं मजबूत
नियमितपणे 30 मिनिटं चाललं, तर हाडं (Bones) आणि सांधे (Joints) मजबूत होण्यास मदत मिळते. त्यामुळे दुखापत होण्याचा धोका कमी होतो. चालण्याचे खूप फायदे असतात, असं आर्थ्रायटिस फाउंडेशनचं म्हणणं आहे.
7. शरीर लवचीक
- वय वाढत चाललं, की जास्त व्यायाम करणं अनेकदा कमरेसाठी घातक ठरतं. चालण्यामुळे कंबरदुखीचा त्रास कमी होतो. शरीराची क्षमता वाढते आणि शरीर लवचीक (Flexibility of Body) राहण्यासही मदत होते.
अतिरेक नको
स्वतःला फिट (Fitness), तंदुरुस्त राखण्याचं महत्त्व कोरोना काळात लोकांना चांगलंच पटलं आहे. निरोगी राहण्यासाठी लोक बरंच काही करत आहेत. त्यातलाच एक प्रकार म्हणजे दररोज 10 हजार पावलं चालण्याचा एक ट्रेंड. हा ट्रेंड जगभरात अनेक ठिकाणी आहे. दररोज चालण्याचा व्यायाम नक्कीच फायदेशीर आहे, याबद्दल काही दुमत नाही; मात्र दररोज 10 हजार पावलं चाललं तरच फायदा होतो असं म्हणण्याला किंवा जास्त चालल्यामुळे जास्त निरोगी राहता येईल, या म्हणण्याला वैज्ञानिक आधार नाही, असं तज्ज्ञांनीच स्पष्ट केलं आहे. आपल्याला झेपेल, सहज जमेल तेवढं चालावं, ही खूणगाठ मनाशी बांधावी.
हे वाचा - 'या' कारणांमुळे वाढते मुलांचे वजन, वेळीच घ्या काळजी अन्यथा लठ्ठपणा ठरू शकतो घातक
दररोज 10 हजार पावलं चालू शकणाऱ्यांची संख्या कमीच आहे. कॅनडा आणि अमेरिकेत आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झालेल्या लोकांवर करण्यात आलेल्या अभ्यासात असं दिसून आलं, की दररोज 10 हजार पावलांचं उद्दिष्ट दीर्घ काळासाठी देण्यात आलं, तर लोक चालणंच बंद करतात. स्वतःचं उद्दिष्ट ठरवून नंतर ते पूर्ण करू न शकल्यामुळे तणाव वाढतो. त्यामुळे अनेक विकारांचा धोका वाढतो. त्यामुळे शास्त्रज्ञ आता 10 हजार पावलांऐवजी छोटं उद्दिष्ट ठेवण्यासंदर्भात काम करण्याची गरज व्यक्त करत आहेत. त्यासोबत व्यायाम आणि संतुलित आहार यांची जोड असेल, तर विचित्र लाइफस्टाइलमुळे होऊ शकतील असे विकार होण्याची शक्यता कमी होते.
अमेरिका, कॅनडा (USA, Canada) यांसारख्या विकसित देशांतल्या नागरिकांमध्ये आळशीपणा मोठ्या प्रमाणावर आहे, असं अभ्यासात आढळून आलं आहे. दोन वर्षांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात वेगवेगळ्या देशांतले नागरिक शारीरिकदृष्ट्या किती सक्रिय (Physically Active) आहेत, याचं रँकिंग जाहीर केलं होतं. युगांडाचे (Uganda) नागरिक सर्वांत जास्त मेहनती आणि सक्रिय असल्याचं त्यात जाहीर करण्यात आलं होतं.
हे वाचा - मलायका अरोराच्या Pimple free चेहऱ्याचा 'राज'; अभिनेत्रीने सांगितलं Beauty secret
या 168 देशांच्या यादीत अमेरिकेसह अनेक संपन्न देश मागच्या स्थानावर होते. त्या देशांतले निम्म्याहून अधिक प्रौढ नागरिक शारीरिक व्यायाम (Exercise) करत नाहीत. भारताची परिस्थिती काही फारशी चांगली नाही. भारत या यादीत 117व्या स्थानावर आहे. आपल्या देशातले 34 टक्के नागरिक शारीरिकदृष्ट्या आवश्यकतेएवढे सक्रिय नाहीत.
यापूर्वी अमेरिकेतल्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाने (Stanford University) केलेल्या संशोधनातही भारताला (India) सर्वांत आळशी देशांच्या (Lazy Countries) यादीत टाकलं होतं. त्या देशांत भारत 39व्या स्थानावर होता. भारतातले नागरिक दररोज सरासरी 4297 पावलं चालतात. हाँगकाँगमधले नागरिक दररोज सर्वांत जास्त म्हणजे सरासरी 6880 पावलं चालतात. इंडोनेशियातले नागरिक दररोज सरासरी 3513 पावलंच चालतात. त्यामुळे त्या देशाचा समावेश सर्वांत कमी सक्रिय देशांमध्ये झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fitness, Health Tips, Walk