मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

मलायका अरोराच्या Pimple free चेहऱ्याचा 'राज'; अभिनेत्रीने सांगितलं आपलं Beauty secret

मलायका अरोराच्या Pimple free चेहऱ्याचा 'राज'; अभिनेत्रीने सांगितलं आपलं Beauty secret

अभिनेत्री मलायका अरोराने पिंपल्सवर घरगुती उपाय सांगितला आहे.

अभिनेत्री मलायका अरोराने पिंपल्सवर घरगुती उपाय सांगितला आहे.

अभिनेत्री मलायका अरोराने पिंपल्सवर घरगुती उपाय सांगितला आहे.

मुंबई, 07 सप्टेंबर : अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आपले बोल्ड फोटोज आणि व्हिडिओज, तसंच फिटनेस (Malaika Arora fitness) आणि सौंदर्यासाठी (Malaika Arora beauty) प्रसिद्ध आहे. ती एका 18 वर्षांच्या मुलाची आई आहे. पण तरी ती स्वतः विशीतली तरुणी वाटते. महत्त्वाचं म्हणजे तिच्या चेहऱ्यावर एकही पिंपल नाही (Malaika Arora beauty secret). तिचा चेहरा अगदी तुळतुळील आहे. तिच्या पिंपल फ्री (Malaika Arora pimple free face) चेहऱ्याचा नेमका राज काय? असा प्रश्न आपल्यालाही पडतो. मलायकाने आपलं हे ब्युटी सिक्रेट शेअर केलं आहे (Malaika Arora beauty tips). चेहऱ्यावर तारुण्यपीटिका, मुरुमं किंवा पुटकुळ्या उठणं ही समस्या कित्येक जणांना भेडसावत असते. प्रत्येकाकडून त्यावर आपापल्या परीने उपचार केले जातात. कोणी काही घरगुती उपचार (Remedy) सांगितले तर करून पाहिले जातात. मात्र मलायका म्हणते, की या समस्येची तीव्रता वेळीच ओळखावी आणि घरगुती उपायांनी ती कमी होत नसेल, तर तातडीने वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक आहे. कारण सगळ्यांनाच घरगुती उपायांनी आराम पडतो असं नाही.
प्रत्येकाची समस्या बाहेरून दिसायला सारखी असली, तरी प्रत्येकाच्या समस्येचं कारण वेगवेगळं असू शकतं. त्यामुळे घरगुती उपाय लागू पडला नाही, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असल्याचं ती म्हणते. हे वाचा - आईची ड्युटी निभावत मलायका अरोरा कशी ठेवते स्वतःला फीट; अभिनेत्री दिल्या खास टीप्स मलायकाने सांगितलं, की तिची त्वचा संवेदनशील (Sensitive Skin) आहे. त्यामुळे अनेकदा तिच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात. ती घरातच त्यावर उपचार करते. आपल्या उपचारांची माहिती तिने आपल्या चाहत्यांनाही दिली आहे. मलायकाने दिलेल्या माहितीनुसार, थोडीशी दालचिनी पावडर, एक चमचा शुद्ध मध (Honey) आणि लिंबाचा रस यांच्या साह्याने ती घरच्या घरी फेस पॅक तयार करते. त्यासाठीची कृतीही तिने सांगितली आहे. हे वाचा - पुरुषांनो, लक्ष द्या! तुम्ही ही Personal Hygiene राखताय ना? आधी एका वाटीत दालचिनी पावडर घ्यावी. त्यात मध आणि लिंबाचा रस घालून चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावं. त्यानंतर तयार झालेलं मिश्रण चांगल्या ब्रशच्या साह्याने चेहऱ्यावर लावावं. डोळे आणि तोंडाच्या जवळच्या त्वचेला हे मिश्रण लागणार नाही, याची काळजी घ्यावी. हा फेस पॅक आठ ते 10 मिनिटं तसाच राहू द्यावा आणि त्यानंतर चेहरा 8 ते 10 मिनिटांनी धुऊन घ्यावा. हा फेसपॅक (Face Pack) लावल्यानंतर चेहऱ्याला थोडं वेगळं सेन्सेशन जाणवू शकतं; मात्र त्याचं प्रमाण जास्त असेल, तर हा फेसपॅक तातडीने धुऊन टाकावा, 10 मिनिटं ठेवू नये, असा सल्ला मलायकाने दिला आहे.
First published:

Tags: Beauty tips, Entertainment, Lifestyle, Malaika arora

पुढील बातम्या