Home /News /lifestyle /

हात मोडला पण जिद्द सोडली नाही! तब्बल 9 तास Plank करत विश्वविक्रम; पाहा VIDEO

हात मोडला पण जिद्द सोडली नाही! तब्बल 9 तास Plank करत विश्वविक्रम; पाहा VIDEO

आधीच्या रेकॉर्डपेक्षा तब्बल 1 तासापेक्षा जास्त वेळ त्याने प्लॅंक केला आहे (Plank World Record).

    कॅनबेरा, 07 सप्टेंबर : तुम्ही जिम (Gym), एक्सरसाइझ (Excecise) करत असाल तर प्लॅंक (Plank) करणं किती कठीण हे हे तुम्हाला माहितीच असेल. एका तरुणाने मात्र याच प्लॅंकचा वर्ल्ड रेकॉर्ड (World Record) केला आहे. सर्वात जास्त वेळ त्याने प्लॅंक केला आहे (Plank World Record). गिनीज बुकमध्येही त्याची नोंद झाली आहे (Guinness World Records). ऑस्ट्रेलियातील (Australia) डॅनिअल स्कॅलीने (Daniel Scali) 6 ऑगस्ट 2021, रोजी 9 तास 30 मिनिटं, 1 सेकंद प्लँक पोझिशनवर राहिला. याआधी अमेरिकेतील (USA) जॉर्ज हूड (George Hood)  याच्या नावावर या विक्रमाची नोंद होती.  त्याने 20 फेब्रुवारी  2021 रोजी रेकॉर्ड केला होता. त्याचा रेकॉर्ड 8 तास 15 मिनटं 15 सेकंदांचा होता. त्यावेळी तो 62 वर्षांचा होता. डॅनिअलने जॉर्जपेक्षा एक तासांपेक्षाही जास्त प्लॅंक करत त्याचा रेकॉर्ड मोडला आहे. डॅनिअलचा हा रेकॉर्ड खास आहे कारण त्याला कॉम्प्लेक्स रिजनल पेन सिंड्रोम  (complex regional pain syndrome) आहे. हे वाचा - इंजेक्शन घेऊन घेऊन फुगवले, फायटिंग करताना फुटले Biceps; बॉडीबिल्डरचा Shocking video गिनीज बुक रेकॉर्डने दिलेल्या माहितीनुसार डॅनिअल जेव्हा 12 वर्षांचा होता तेव्हा त्याचा एक हाथ एक्सरसाइझ करतना तुटला होता. त्यानंतर त्याला कॉम्प्लेक्स रिजनल पेन सिंड्रोम झाला होता. डॅनिअलने सांगितलं की या सिंड्रोममुळे त्याचा मेंदू दुखापत झालेल्या भागाला चुकीचा संदेश पोहोचवतो. ज्यामुळे डॅनिअलच्या हाताता थोडा जरी स्पर्श झाला तरी त्याला प्रचंड वेदना होतात. डॅनिअलने सांगितलं की प्लँक करताना त्याच्या कोपरापासून खांद्यापर्यंत खूप दबाव पडत होता. सुरुवातीचे काही तास त्याच्या हातात खूप वेदना होत होत्या. हा रेकॉर्ड करण्याच्या तयारीबाबत सांगताना त्याने सांगितलं की तो पुशअप आणि सिटअप करायचा. मानसिकदृष्ट्या स्वतःला तयार करणंही खूप कठीण होतं. हे वाचा - अरे बापरे! फक्त एका शिंकेत मोडू शकतात बरगड्या; भयंकर आजाराशी झुंज देतोय चिमुकला तो जास्तीत जास्त कठीण एक्सरसाइझ करतो ज्यामुळे त्याला नेहमी होणाऱ्या वेदना सहन करण्यात मदत मिळते. प्लॅंक करताना ज्याला ज्या वेदना झाल्या त्या सहन करण्याची शक्ती त्याने आपलं मन मजबूत केल्याने मिळाली, असं त्याने सांगितलं
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Fitness, Lifestyle, World record

    पुढील बातम्या