Home /News /explainer /

Explainer : पुण्यात क्लास वन अधिकारी असलेल्या कांशीरामांनी कसं उभं केलं सर्वात मोठं बहुजन आंदोलन

Explainer : पुण्यात क्लास वन अधिकारी असलेल्या कांशीरामांनी कसं उभं केलं सर्वात मोठं बहुजन आंदोलन

Birthday Kanshi Ram : कांशीराम यांच्या काळामध्ये या संघटनेनं बसपासाठी (BSP) त्याच पद्धतीनं काम केलं जसं भाजपसाठी आरएसएस काम करते.

    पंजाब, 15 मार्च : पंजाबच्या रोपड जिल्ह्यामध्ये (रुपनगर) राहणारे कांशीराम (Kanshi Ram) पुण्याच्या दारुगोळा फॅक्ट्रीमध्ये क्लास वन अधिकारी म्हणून कार्यरत होते. याच ठिकाणी राजस्थानच्या जयपूरमध्ये राहणारे दीनाभाना हे चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून काम करत होते. ते याठिकाणी एससी, एसटी वेलफेअर असोसिएशनशी संबंधित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सुट्टीवरुन दीनाभाना यांचा आपल्या वरिष्ठासोबत वाद झाला. या कारणावरुन त्यांना निलंबित करण्यात आलं होतं. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या महाराष्ट्रातील डी. के. खापर्डे यांना देखील निलंबित करण्यात आलं. ते महार जातीचे होते. कांशीराम यांना जेव्हा हे समजलं तेव्हा ते म्हणाले की, 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सुट्टी न देणाऱ्यांची जोपर्यंत मी सुट्टी करत नाही तोपर्यंत मी शांतपणे बसू शकत नाही.' आज बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कांशी राम यांचा जन्मदिवस आहे. यापूर्वी त्यांनी बामसेफचीही स्थापना केली होती. कांशीराम वंचितांसाठीच्या संघर्षात उतरले. त्यांना देखील निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी त्या अधिकाऱ्याला मारहाण केली ज्यांनी त्यांना निलंबित केलं होतं. ही ती घटना आहे ,ज्यामुळे दलित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी काम करणाऱ्या सर्वात मोठी संघटना बामसेफचा (BAMCEF-Backward And Minority Communities Employees Federation) जन्म झाला. त्यानंतर डीएस-4 आणि बसपाची स्थापना झाली. कोणी केली बामसेफची स्थापना - कांशीराम यांच्या काळामध्ये या संघटनेनं बसपासाठी (BSP) त्याच पद्धतीनं काम केलं जसं भाजपसाठी आरएसएस काम करते. वामन मेश्राम यांनी सांगितलं की, 'दीनाभाना यांना पुन्हा कामावर घेतलं. त्यांची बदली दिल्लीमध्ये करण्यात आली. कांशीराम यांनी विचार केला की, जर आपल्यासारख्या अधिकाऱ्यांवर अन्याय होत असेल तर देशातील दलित आणि मागासवर्गीयांवर किती होत असेल. त्यासाठी त्यांनी नोकरी सोडली आणि बामसेफची स्थापना केली.' या संघटनेचे दीनाभाना, डी. के खापर्डे आणि कांशीराम हे तिघे संस्थापक होते. मेश्राम यांनी पुढं सांगितलं की, 'कांशीराम तिसऱ्या क्रमांकावर असून सुद्धा पहिल्या क्रमांकावर यासाठी आले कारण त्यांनी आपली नोकरी सोडली होती. त्यांच्याकडे वेळच वेळ होता. ते त्या एससी, एसटी वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष झाले ज्यामध्ये दीनाभाना सहभागी होते. त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की फक्त एससी, एसटीसाठी काम करुन चालणार नाही. परिवर्तनसाठी त्यांनी एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्यांकांसाठी देखील काम सुरु केलं.'42 वर्षांपूर्वी झाली बामसेफची स्थापना - 6 डिसेंबर 1973 साली अशी संघटना स्थापन करण्याची कल्पना करण्यात आली. त्यानंतर 6 डिसेंबर 1978 साली राष्ट्रपती भवनच्या समोर असलेल्या बोट क्लब मैदानावर या संघटनेची औपचारिक स्थापन करण्यात आली. या संघटनेला 'बर्थ ऑफ बामसेफ' असं नाव देण्यात आलं. बामसेफच्या बॅनरखाली कांशीराम आणि त्यांच्या साथीदारांनी दलितांवर होणाऱ्या अत्याचाराचा विरोध केला. हे ही वाचा-Explainer: संसदेच्या कामकाजाच्या LIVE प्रसारण कसं सुरू झालं? वाचा रंजक प्रवास कांशीराम यांनी दिल्ली, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील दलित कर्मचाऱ्यांची एक मजबूत संघटना स्थापन केली. तेव्हा त्यांनी समाजाला सांगितलं होतं की, 'त्यांना जर स्वत:चा उत्कर्ष साधायचा असेल तर मनुवादी समाज व्यवस्था मोडून काढली पाहिजे.' मेश्राम म्हणाले की, 'बरेच अधिकारी आणि कर्मचारी ही संघटना चालवण्यासाठी आपल्या पगाराचा बहुतांश हिस्सा देत होते. देशामध्ये यावेळी 31 राज्यातील 542 जिल्ह्यांमध्ये जवळपास 25 लाख लोकं या संघटनेमध्ये सहभागी आहेत. यामध्ये 57 सहाय्यक संघटना आहेत. ज्यामध्ये अनेक व्यावसायातील लोकं आहेत. नॅशनल नेटिव्ह बहुजन एम्प्लॉईज युनियन नावाची एक कामगार संघटना एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्यांक कर्मचार्‍यांच्या हिताचं रक्षण करण्याचं काम करते.' डीएस- 4 ची घोषणा काय होती? - बामसेफच्या माध्यमातून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एकत्रित करण्याचे काम सुरु होतं. यासोबतच सामान्य बहुजनांचे संघटन करण्यासाठी कांशीराम यांनी 1981 मध्ये डीएस-4ची (दलित शोषित समाज संघर्ष समिती) स्थापना केली. याचा नारा होता 'ठाकूर, ब्राम्हण, बनिया छोड, बाकी सब है डीएस-४'. हे एक राजकीय व्यासपीठ नव्हतं. मात्र या माध्यमातून कांशीराम यांनी फक्त दलित नाही तर अल्पसंख्यांकांना देखील एकत्र करण्यास सुरुवात केली होती. डीएस- 4च्या माध्यमातूनच त्यांनी जनसंपर्क अभियान सुरु केलं. सायकल मोर्चा काढला. या मोर्चाच्या माध्यमातून सात राज्यांमध्ये जवळपास 3,000 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करण्यात आला. यामाध्यमातून ते दलित आणि मागासवर्गीय लोकांना एकत्र आणत होते. बसपाची स्थापना कशी झाली? - कांशीराम येथेच थांबले नाही. 1984 साली कांशीराम यांनी निर्णय घेतला की, 'राजकीय सत्ता अशी चावी आहे ज्या माध्यमातून सर्व टाळे खोलू शकतो.' कांशीराम यांनी निवडलेल्या या नवीन मार्गामुळे बामसेफचे काही संस्थापक सदस्य वेगळे झाले. अशामध्ये त्यांच्यासोबत असलेले बामसेफ कार्यकर्ते काही कमी नव्हते. बामसेफचे दुसरे संस्थापक सदस्य डी. के खापर्डे यांनी याची सुत्रं हाती घेतली आणि आंदोलन सुरुच ठेवलं.
    First published:

    Tags: Pune

    पुढील बातम्या