मराठी बातम्या /बातम्या /explainer /माणसासाठी किती घातक असतो अमोनिया वायू? जाणून घ्या या प्रश्नाच अचूक उत्तर

माणसासाठी किती घातक असतो अमोनिया वायू? जाणून घ्या या प्रश्नाच अचूक उत्तर

अमोनिया म्हणजे काय, तो कितपत विषारी (Poisonous) आहे आणि आणि त्याची गळती झाल्यानंतर कोणते उपाय केले पाहिजेत, या विषयी माहिती असणं आवश्यक आहे.

अमोनिया म्हणजे काय, तो कितपत विषारी (Poisonous) आहे आणि आणि त्याची गळती झाल्यानंतर कोणते उपाय केले पाहिजेत, या विषयी माहिती असणं आवश्यक आहे.

अमोनिया म्हणजे काय, तो कितपत विषारी (Poisonous) आहे आणि आणि त्याची गळती झाल्यानंतर कोणते उपाय केले पाहिजेत, या विषयी माहिती असणं आवश्यक आहे.

नवी दिल्ली,29 मार्च: गेल्या वर्षी (सप्टेंबर 2021) उत्तर प्रदेशातील फूलपुरमध्ये (Phulpur) अमोनिया वायूची गळती (Ammonia Leakage) होऊन झालेल्या दुर्घटनेत दोन अधिकार्‍यांचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा काही दिवसांपूर्वी पूर्व युक्रेनमधील (Ukraine) सुमी शहरामध्ये असलेल्या केमिकल प्लांटमधून अमोनियाची गळती झाल्याचं वृत्त आलं होतं. त्यावेळी स्थानिक प्रशासनानं नागरिकांना ग्राउंड फ्लोअरला आश्रय घेण्याचं आवाहन केलं होतं. वरील दोन्ही घटनांसारख्या अमोनिया गळतीच्या घटना सातत्यानं आपल्या कानांवर पडत असतात. गेल्या काही वर्षांमध्ये तर अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे अमोनिया म्हणजे काय, तो कितपत विषारी (Poisonous) आहे आणि आणि त्याची गळती झाल्यानंतर कोणते उपाय केले पाहिजेत, या विषयी माहिती असणं आवश्यक आहे. टीव्ही 9 भारतवर्षनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

अमोनिया हा एक रंगहीन आणि हलका वायू आहे ज्याला अतिशय उग्र गंध (Strong Smell) असतो. नायट्रोजन (Nitrogen) आणि हायड्रोजनच्या (Hydrogen) मिश्रणातून अमोनिया तयार होतो. पाण्यात विरघळलेल्या अमोनियाला लीकर अमोनिया म्हणतात. अमोनियाचे विविध उपयोग आहेत. त्याचा सर्वाधिक वापर रासायनिक खतांच्या निर्मितीसाठी (Fertilizer Production) होतो. यामध्ये युरिया, अमोनियम सल्फेट, अमोनियम फॉस्फेट, अमोनियम नायट्रेट आणि सोडियम कार्बोनेटचा प्रामुख्यानं समावेश होतो. याशिवाय बर्फ तयार करण्याच्या कारखान्यात कुलिंग सबस्टन्स म्हणूनही अमोनियाचा वापर केला जातो. जगभरात दरवर्षी जवळपास 17 कोटी टन अमोनियाची निर्मिती होते. म्हणजेच जगातील सर्वांत जास्त निर्मिती होणाऱ्या केमिकल्समध्ये अमोनियाचा समावेश होतो.

रशियानं उद्ध्वस्त केलं शहर, हसता- खेळत्या शहरातल्या 5 हजार लोकांचा मृत्यू 

भारतामध्ये अमोनियाचं उत्पादन आणि औद्योगिक वापर मोठ्या प्रमाणात होतो. भारताशिवाय, जगातील अनेक मोठे देशदेखील अमोनियाचं उत्पादन (Ammonia Production) करतात. चीनमध्ये जगातील सर्वात जास्त अमोनियाचं उत्पादन होतं. त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. याशिवाय युरोप आणि अमेरिकेतही अमोनियाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं.

अमोनियाशी अतिशय कमी प्रमाणात संपर्क आल्यास तो फारसा घातक ठरत नाही. डीडब्ल्यूनं दिलेल्या रिपोर्टनुसार, अमोनियाला अतिशय उग्र वास असतो त्यामुळे हवेतील त्याचं अस्तित्व पट्कन लक्षात येतं. हवेमध्ये काही प्रमाणात नैसर्गिक अमोनियाचं (Natural Ammonia) अस्तित्व असतं. विशेषत: दलदलीच्या प्रदेशांमध्ये किंवा ज्या ठिकाणी प्राण्यांचे कुजलेले मृतदेह असतात, अशा ठिकाणी अमोनिया निर्माण होतो. जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात जास्त प्रमाणात अमोनिया गेला तर तिचा मृत्यूदेखील (Death) होऊ शकतो. हवेत अमोनियाचं प्रमाण जास्त असल्यानं नाक, घसा आणि श्वासनलिकेमध्ये तीव्र जळजळ होते आणि श्वास गुदमरतो. डोळ्यांतून पाणी गळून डोकेदुखीची समस्याही जाणवते.

अमोनियाच्या संपर्कात आल्यास, डोळे आणि चेहरा पाण्यानं धुण्याचा सल्ला दिला जातो. अमोनिया हा पाण्यात विरघळणारा वायू आहे. म्हणून, चेहरा धुतल्याने त्यापासून होणारा त्रास कमी होतो. चेहऱ्यावरचा अमोनिया पाण्यात विरघळून जाऊ शकतो. याशिवाय जर एखादी व्यक्ती अमोनियाच्या संपर्कात आली तर तिला लगेच मोकळ्या हवेमध्ये घेऊन जावं किंवा पाण्याची वाफ द्यावी. असं केल्यास त्या व्यक्तीच्या शरीरावर अमोनियाचे दुष्परिणाम कमी होतील.

First published:
top videos

    Tags: Breaking News