Home /News /videsh /

रशियाकडून विध्वंस, 5000 लोकांच्या मृत्यूनंतर स्मशान बनलं युक्रेनमधलं मारियुपोल शहर

रशियाकडून विध्वंस, 5000 लोकांच्या मृत्यूनंतर स्मशान बनलं युक्रेनमधलं मारियुपोल शहर

Russia and Ukraine War: युक्रेन आणि रशियामधील (Ukraine and Russia War) युद्धाचा आज 34 वा दिवस आहे.

    कीव, 29 मार्च: युक्रेन आणि रशियामधील (Ukraine and Russia War) युद्धाचा आज 34 वा दिवस आहे. रशियाकडून वारंवार हल्ल्यानं युक्रेन आता हैराण झालं आहे. अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. पण मारियुपोलमध्ये सर्वात मोठी शोकांतिका घडली आहे. वृत्तानुसार, या शहरात रशियन हल्ल्यात (Russian attack) 5 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. हजारो लोक बेघर झाले आहेत. रुग्णालये जखमींनी भरलेली आहेत. सद्यपरिस्थिती अशी आहे की, उद्यान आणि शाळांमध्ये मृतांचे दफन केले जात आहे. रशियानं इथे एवढा विध्वंस केला आहे की, 90 टक्के इमारती भग्नावस्थेत बदलल्या आहेत. तर 40 टक्के इमारती अशा आहेत की त्या पूर्णपणे जमिनीवर आहेत. मारियुपोल आहे ज्यामध्ये रशियाने पहिल्यांदा युद्धविराम जाहीर केला होता. युद्धात अडकलेल्या लोकांना येथून बाहेर काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलं. त्यांच्यासाठी मानवी कॉरिडॉर बांधण्यात येणार आहे. सुरक्षित रस्ता उपलब्ध करून दिला जाईल जेणेकरुन लोकांना येथून सहज बाहेर पडता येईल. पण संपूर्ण घटना उलटी घडली. कारण या शहरात रशियन सैनिक रस्त्यावर उतरले आणि लोकांवर अंदाधुंद हल्ले केले. रशियन विमानांनी इतके हवाई हल्ले केले की घरांमधून धूर निघताना दिसत आहे. उद्यान आणि शाळांमध्ये मृतदेह पुरले जात आहेत युक्रेनने मारियुपोलच्या विध्वंसाची तुलना सीरियातील अलेप्पोशी केली. त्यामुळे मृतांना स्मशानभूमीत नेणं कठीण होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे उद्यान आणि शाळांमध्ये मृतदेह पुरले जात आहेत. त्याच वेळी, मारियुपोलमधील दळणवळण सेवा देखील ठप्प झाली आहे. लोकांना त्यांच्या कुटुंबीयांशी बोलता येत नाही. कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी लोकं सोशल मीडियावर अवलंबून आहेत. केवळ लष्करी तळच नाही तर निवासी भागांनाही केलं लक्ष्य युद्धाच्या सुरुवातीला रशियानं कीवला लक्ष्य केलं. सतत हल्ले होत होते. केवळ लष्करी तळांना लक्ष्य करणार असल्याचं सांगण्यात आलं. पण रशियन सैन्याने केवळ लष्करी तळच नव्हे तर निवासी भागांनाही लक्ष्य केले. कीवनंतर खार्किवची वेळ आली, तिथे रशियाने अंदाधुंद हल्ला केला. या हल्ल्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले, पण सर्वात धोकादायक दृश्य मारियुपोलचे होतं. रशियन सैनिकांची एका शहरातून दुसऱ्या शहरात कूच मारियुपोलमध्ये रशियाने शहराला राजधानी कीवशी जोडणारा पूल नष्ट केला. जसजसे युद्ध वाढत गेले, तसतसे रशियन सैन्याने एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवेश केला आणि कहर केला. मारियुपोलच्या महापौरांच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही आमचे 5000 लोक गमावले आहेत. हसणारे शहर उद्ध्वस्त झाले आहे. येथील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. 90 टक्के इमारती पडक्या झाल्या आहेत. 'मारियुपोलला वाचवणे खूप अवघड' युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की, रशियाच्या हल्ल्याशी झुंज देत अलीकडे म्हणाले की, अतिरिक्त टँक आणि विमानांशिवाय मारियुपोल वाचवणे अशक्य आहे. युक्रेन रशियन क्षेपणास्त्रे शॉटगन आणि मशीन गनने मारू शकत नाही. म्हणूनच आवश्यक शस्त्रास्त्रांसाठी आम्ही बराच काळ वाट पाहत होतो. लोकांची खाण्यापिण्यासाठी वणवण रशियाची क्रूरता एवढी होती की, तेथील एका शाळेवर सैनिकांनी हवाई हल्ला केला. या शाळेत 400 जणांनी आश्रय घेतला होता. हे स्पष्ट आहे की, 33 दिवसांत युक्रेनच्या मारियुपोलसह अनेक शहरांचे स्वरूप बदलले आहे. लोकांना खाण्यापिण्याची चिंता आहे. तासनतास लांबच लांब रांगेत थांबल्यानंतर थोडं जेवण मिळालं.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Russia Ukraine

    पुढील बातम्या