Home /News /explainer /

आजच्याच दिवशी देशातील पहिला विधवा पुनर्विवाह झाला! पण, हे इतकं सोपं नव्हतं..

आजच्याच दिवशी देशातील पहिला विधवा पुनर्विवाह झाला! पण, हे इतकं सोपं नव्हतं..

First Time Widow Remarriage in India : 7 डिसेंबर 1856 रोजी देशात प्रथमच विधवा पुनर्विवाह झाला. हा विवाह कोलकात्यात झाला. भारतात सुमारे दीडशे वर्षांपूर्वी मुलींची लग्ने कमी वयात होत असत. परिणामी अल्पवयीन वयात विधवा (Widow) होण्याचं प्रमाण जास्त होतं. हे संपवण्यासाठी ईश्वरचंद्र विद्यासागर (Ishwar Chandra Vidyasagar) यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नांनी पहिल्यांदा कायदा (Hindu Widows' Remarriage) झाला आणि त्यांनी एका विधवेशी लग्न केले.

पुढे वाचा ...
  कोलकाता, 7 डिसेंबर: आजच्याच दिवशी 7 डिसेंबर 1856 रोजी कोलकाता शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. कारण, काही दिवसांपूर्वी विवाह पुनर्विवाह कायदा झाला होता. आता या कायद्याच्या आधारे पहिले लग्न कोलकात्यात होणार होते. विधवा 10 वर्षांची निष्पाप कलामती होती आणि वर श्रीचंद्र विद्यारत्न होते. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. गोंधळ माजला होता. कुठलाही गडबड होऊ नये म्हणून काही लोक पूर्ण तयारीनिशी घरासमोर उभे होते. त्यादिवशी असं वाटत होतं की कोलकात्याचे सगळे रस्ते एकाच घराच्या दिशेने 12, सुकीस स्ट्रीटकडे जात आहेत. प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेल्या राज कृष्ण बंदोपाध्याय यांच्या घरी हा विवाह होत होता. जमावात खळबळ आणि नाराजी रस्त्यावर जमलेला जनसमुदाय चिडला होता, काहीजण चकित तर काही नाराज झाले होते. पालखीतून वधू आणि वराला आणल्यावर परिस्थिती हाताळणे खरोखर कठीण झाले. बंडखोरी होऊ नये असे वाटत होते. मात्र, पोलिसांसह काही लोकांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांचा कडक बंदोबस्त होता काही निवडक लोकच सुकीस स्ट्रीटमध्ये प्रवेश करू शकत होते, यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली होती. ज्या मार्गाने पालखी आणण्यात आली. या संपूर्ण मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याचवेळी, ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या नेतृत्वाखाली कोलकात्याचे काही प्रभावशाली लोक देखील ही व्यवस्था मजबूत करण्यासाठी तिथं उपस्थित होते. ज्यांनी आपला समाज वाईट प्रथा आणि बंधनांपासून मुक्त होण्यासाठी पुढाकार घेतला होता. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुढाकार ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नांमुळे 26 जुलै 1856 रोजी हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा 1856 होऊ शकला. यानंतर हिंदू विधवांचे पुनर्विवाह कायदेशीर करण्यात आले. हा कायदा स्वतः लॉर्ड डलहौसी यांनी तयार केला होता, नंतर तो लॉर्ड कॅनिंगने पास केला होता. मात्र, त्याच्या मार्गात अनेक अडथळे आले. याआधी संमत झालेला मोठा सामाजिक सुधारणा कायदा म्हणजे सती प्रथेवर बंदी घालणे. 10 वर्षांची कलामती काही दिवसांपूर्वी विधवा झाली होती दहा वर्षांची कलामती काही दिवसांपूर्वीच विधवा झाली होती. तिच्याशी लग्न करणारा तरुण श्रीचंद्र विद्यारत्न हा एका संस्कृत महाविद्यालयात शिक्षक होता आणि विद्यासागरचा सहकारी होता.

  धर्म कसा बदलला जातो, धार्मिक बदलाने हिंदू होता येतं का? कायदा काय सांगतो?

  ही घटना शिवनाथ शास्त्री यांनी लिहिली आहे, जे त्यावेळी लहान होते. पण नंतर ते ब्राह्मोसमाजाचे आघाडीचे नेते बनले. त्यांनी वृत्तपत्रांत लिहिलं, की हा कायदा लागू होण्याच्या दोन दशकांपूर्वी दक्षिणरंजन मुखोपाध्याय यांनी बर्दवानची राणी आणि राजा तेजचंद्र यांची विधवा वसंता कुमारी यांच्याशी विवाह केला असला तरी, तसा कायदा अजून लागू झाला नव्हता म्हणून तो स्वीकारला गेला नाही. मुखोपाध्याय हे ब्राह्मण असल्यामुळे त्यांनी जातीपलीकडे जाऊन लग्न केले म्हणूनही हे लग्न खास होते.. या लग्नाचे साक्षीदार स्वतः कोलकाता पोलीस दंडाधिकारी बनले. पण यामुळे कोलकाता आणि बंगालमध्ये इतका संताप निर्माण झाला की नवविवाहित जोडप्याला लखनौमध्ये आश्रय घ्यावा लागला. तेव्हा बंगालमध्ये बालविवाहाचं प्रमाण जास्त होतं याआधी जेव्हा पालकांनी त्यांच्या लहान विधवा मुलींचे पुनर्विवाह करण्याचा प्रयत्न केला. त्यांना तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले. त्याकाळी बंगालमध्ये मुलींची लग्ने अगदी लहान वयात 08-10 च्या दरम्यान होत असत. अनेकवेळा मुलींची लग्ने 60 ते 70 वयोगटातील पुरुषांशी लावून दिली जायची. जे जास्त जगू शकत नव्हते. त्यांच्या मृत्यूनंतर या तरुण विधवा मुलींची अवस्था अतिशय दयनीय होत होती. समाज त्यांना अमानुष वागणूक देत होता. पराशर संहितेत विधवा पुनर्विवाह अशा परिस्थितीत विद्यासागर यांनी विधवांचे पुनर्विवाह कायदेशीर ठेवण्याचा पवित्रा घेतला. अशा घटना प्राचीन काळी घडल्यातील किंवा हिंदू धर्मग्रंथांमध्ये असा उल्लेख आला असेल, यासाठी त्यांनी धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास केला. हे ग्रंथ वाचण्यात त्यांनी संस्कृत महाविद्यालयात बराच वेळ घालवला. अखेरीस तो त्यांना मिळाला. पराशर संहितेत त्यांना जे हवं होतं ते मिळालं. म्हणजेच विधवांचे विवाह शास्त्रानुसार होते. मात्र, हिंदू समाजाकडून त्याला प्रचंड विरोध झाला. पण अखेर हे विधेयक मंजूर झाले. मात्र, कायदा होऊनही विद्यासागर यांचे काम संपले नव्हते. जोपर्यंत असे विवाह सुरू होत नाहीत तोपर्यंत असे कायदे करण्यात काही अर्थ नाही, असे त्यांचे मत होते.

  हिंदू धर्म स्वीकारणाऱ्यांमध्ये जगभरातील मोठमोठ्या व्यक्तींचा समावेश!

  लग्नाआधीच वर मागे सरला वर पंडित श्रीचंद्र विद्यारत्न हा त्यांच्या मित्राचा तरुण मुलगा होता. 24 परगणा येथे राहत होता. तर वधू कलामती देवी ही विधवा मुलगी होती, जी मूळची बर्दवानमधील पलासाडंगा गावची होती. 27 नोव्हेंबर 1856 ही पहिली लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, सामाजिक भीतीमुळे श्रीचंद्रने मागे हटण्यास सुरुवात केली. या प्रकरणात, श्रीचंद्राची आई लक्ष्मीमणी देवी ठाम होती की तिने मुलाचे लग्न एका विधवा मुलीशी करावे. ती स्वतः विधवा होती. मग मित्र आणि विद्यासागर यांनी भीती दूर केली बऱ्याच अंशी त्याच्या मित्रांनीही वर श्रीचंद्राची भीती दूर केली. विशेषत: विद्यासागर यांनी त्यांना खूप बळ दिलं. ही गोष्ट जेव्हा कोलकाता आणि बंगालमध्ये कळू लागली तेव्हा त्याचा तीव्र विरोध सुरू झाला. त्यानंतर राज कृष्ण बंदोपाध्याय पुढे आले, ज्यांनी आपल्या घरी लग्नाची संपूर्ण व्यवस्था करण्याची घोषणा केली. विद्यासागर यांनी वधूला स्वतःच्या हाताने विणलेल्या साड्या आणि दागिने भेट दिले आणि लग्नाचा इतर खर्चही स्वतः उचलला. पुढे विद्यासागर यांनी अशा अनेक विवाहांचा खर्च स्वतः उचलला. त्यामुळे त्याच्यावर कर्जही खूप झाले. पहिल्या विधवा विवाहानंतर बंगालमधील हुगळी आणि मिदिनापूर येथे असेच विवाह झाले. सुरुवातीला हे खूप कठीण होते. पण हळूहळू जोर धरला.
  Published by:Rahul Punde
  First published:

  Tags: Child marriage, Marriage, Open marriage

  पुढील बातम्या