मराठी बातम्या /बातम्या /explainer /Explainer : कोणत्या कोरोना रुग्णाला कोणते उपचार द्यावेत? नेमकी कशी ठरते Corona treatment

Explainer : कोणत्या कोरोना रुग्णाला कोणते उपचार द्यावेत? नेमकी कशी ठरते Corona treatment

'कर्मचारी सखी' साधतात महिला रुग्णांशी संवाद

'कर्मचारी सखी' साधतात महिला रुग्णांशी संवाद

कोणत्या कोरोना रुग्णाला कोणते उपचार द्यायचे, उपचाराची दिशा ठरवण्यासाठी काही टेस्ट केल्या जातात.

नवी दिल्ली, 12 जून : एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गाच्या अनुषंगाने लक्षणं दिसू लागताच ती व्यक्ती कोरोना (Corona) पॉझिटिव्ह आहे किंवा नाही हे निश्चित होण्यासाठी आरटीपीसीआर (RT-PCR) किंवा अँटिजेन टेस्ट (Antigen Test) करण्याचा सल्ला दिला जातो. पण प्रत्येक कोरोना रुग्णाला त्याच्या लक्षणांनुसार आणि त्याच्यातील कोरोनाच्या प्रमाणानुसार वेगवेगळे उपचार (Corona treatment) दिले जातात. कोणत्या कोरोना रुग्णाला कोणते उपचार द्यायचे, उपचाराची दिशा ठरवण्यासाठी काही टेस्ट केल्या जातात.

रुग्णाच्या क्लिनिकल स्थितीनुसार सीबीसी, सीआरपी, डी-डायमर, एलडीएच, आयएल 6, एलएफटी , आरएफटी आणि ब्लड शुगर लेव्हल सारख्या लॅबोरेटरी रक्त चाचण्या (Blood Test) करण्याचा सल्ला उपचार आणि रोगनिदानाची दिशा ठरवण्यासाठी दिला जातो. परंतु, या चाचण्यांच्या अनुषंगाने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मनात अनेक प्रश्न असतात, जाणून घेऊया अशाच काही प्रश्नांची उत्तरं.

सीबीसी (CBC)

सीबीसी/सीबीपी म्हणजे संपूर्ण रक्ताची स्थिती दाखवणारी आकडेवारी. यात रक्तपेशी (आरबीसी), पांढऱ्या पेशी (डब्ल्यूबीसी) आणि प्लेटलेटस (थ्रोम्ब्रोसाईटस) यांची पातळी तसंच परिणात्मक आणि आकारात्मक झालेला बदल दिसून येतो. संसर्गामुळे रक्तपेशींमध्ये संख्यात्मक (प्रमाण) आणि मॉर्फोलॉजिकल (आकार) बदल होतात. ज्यामुळे डॉक्टरांना उपचार व्यवस्थापनाची पुढील दिशा ठरवण्यात मदत होते.

सीआरपी (CRP)

सी रिअॅक्टिव प्रोटीन (Protein) यकृतात वेगात संश्लेषित होऊन संसर्गाला प्रतिक्रिया देते. दाह आणि संसर्गाची प्रतिक्रिया म्हणून रक्तातील सीआरपीची पातळी वाढलेली दिसते. मधुमेह आणि रक्तदाबासारख्या तीव्र आजारात याची पातळी सौम्यपणे वाढते. संधिवात आणि संसर्गजन्य संधिवातात ती मध्यम प्रमाणात तर विषाणूजन्य किंवा बुरशीजन्य आजारांमध्ये ही पातळी उच्च प्रमाणात वाढलेली असते.

डी-डायमर (D-Dimer)

सामान्यतः रक्तवाहिन्यांमध्ये नैसर्गिक प्रतिरोध प्रणालीमुळे रक्त साठून राहत नाही. परंतु, रक्तवाहिन्यांना आघात होताच त्यांचं नुकसान टाळण्यासाठी रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. त्याचप्रमाणे रक्तवाहिन्यांमध्ये रक्त गोठू लागलं तर सामान्य प्रवाह राखण्यासाठी या गुठळ्या नष्ट करण्याची यंत्रणा सक्रिय होते. यामुळे अल्पावधीतच निकृष्ट दर्जाच्या गुठळ्या नाहीशा होण्यास सुरुवात होते. परंतु, गंभीर आजार आणि संसर्गामध्ये रक्तवाहिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताच्या गुठळ्या (Blood Clots) तयार होतात. याला प्रतिसाद म्हणून, रक्ताच्या गुठळ्या ब्रेक होतात. परंतु, या विरघळलेल्या गुठळ्यांमधील निकृष्ट दर्जाचे पदार्थ लहान रक्त वाहिन्यांमध्ये साठतात आणि यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो.

हे वाचा - Mucormycosis हा Black Fungus मुळे नव्हे; तज्ज्ञांनी सांगितलं आजाराचं नेमकं कारण

डी-डायमर हे या गुठळ्यातील निकृष्ट गुठळ्यांचे (फायब्रिन) उत्पादन होय. डी-डायमरची पातळी वाढलेली असणं हे रक्तांच्या गुठळ्या अधिक प्रमाणात असल्याचे सूचित करतं. अशावेळी रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी रक्त पातळ करण्याची औषधे सुरू करण्याची गरज असते.

एलडीएच (LDH)

लॅक्टेड डिहायड्रेजनेस हे एन्झामाईन शरीरातील सर्व पेशींमध्ये असतं. काही रोग किंवा संसर्गामुळे पेशींचे नुकसान झालं असल्यास याची रक्तातील पातळी वाढते. अनेकदा अधिक हालचाली किंवा जोरदार व्यायाम केल्याने याची पातळी वाढलेली दिसते. अवयवांशी संबंधित विविध प्रकारचे एलडीएच त्या विशिष्ट अवयवाच्या नुकसानी संबंधी माहिती देऊ शकतात.याचा तपासणीचा उपयोग एखादया अवयवची स्थिती बघून निदान आणि उपचारांसाठी होतो.

आयएल 6 (IL 6)

शरीराच्या प्रतिकारशक्तीमुळे इंटरल्युकीन -6 हा पदार्थ बाहेर पडतो. हा पदार्थ यकृतात सीआरपी आणि फायब्रिनसारख्या घटकांचं उत्पादन वाढवून संसर्गास विरोध करतो. आयएल6 ची रक्तातील वाढलेली पातळी सातत्याने होणाऱ्या संसर्गाची प्रतिक्रिया म्हणून दाह स्वरुपात दर्शवते. संधिवातासारख्या अनेक दाहक आजारांमध्ये त्याची पातळी वाढल्याचे दिसते. याची पातळी वाढली असता यजमान पेशींच्या संरक्षणासाठी अँण्टी इन्फ्लेमेट्री (Anti-Inflammatory) औषधे किंवा स्टेरॉईडस सुरू करणं गरजेचं असतं.

एलएफटी (LFT)

लिव्हर फंक्शन टेस्ट (Liver Function Test) ही रक्ताद्वारे केली जाणारी आणि लिव्हरचे कार्य सामान्यपणे सुरू आहे की नाही हे तपासण्याची एक सामान्य चाचणी असते. लिव्हरचं सामान्य कार्य म्हणजे अलब्युमिनसारखी प्रथिनं तयार करणं आणि बिलीरुबिनसारखे रक्तातील टाकाऊ घटक बाहेर फेकणं. रक्तातील प्रोटीनची कमी पातळी आणि एन्झामाईमची (Enzymes) उच्च पातळी लिव्हरचे कार्य बिघडल्याचे दर्शवते. एलएफटी ही असामान्य येणे म्हणजे नेहमीच लिव्हर डिसीज असल्याचे दर्शवत नसते तर ते संसर्ग आणि औषधांमुळे देखील असामान्य होऊ शकते.

आरएफटी (RFT)

मूत्रमार्ग शरीरातील अनावश्यक घटक बाहेर टाकत किडनी (Kidney) रक्त शुध्द करीत असते. किडनी फंक्शन टेस्टमध्ये किडनीव्दारे फिल्टर केलेल्या अलब्युमिन, युरिया आणि क्रिएटिनिन सारख्या घटकांचे मूल्य दर्शवते. असामान्य आकडेवारी किडनीच्या क्षमतेवर परिणाम झाल्याचे दर्शवते. मात्र किडनी फंक्शन टेस्टचा (Kidney Function Test) रिपोर्ट असामान्य येणे म्हणजे किडनी विकारच आहे असे समजू नये, कारण रिपोर्ट असमान्य येण्यास अन्य आजार किंवा औषधे देखील कारणीभूत असतात.

युरीन रुटीन मायक्रोस्कोपी किंवा युरिन अॅनालिसिस (Urine Analysis)

या चाचणीत युरीनची मायक्रोस्कोपखाली (Microscope) तपासणी केली जाते. यात युरीनचे स्वरुप, केंद्रीकरण आणि सामुग्री तपासली जाते. मुत्रमार्गातील संसर्ग, मुतखडा आणि मधुमेहासंबंधी विकारांवर उपचारांकरिता ही चाचणी उपयुक्त ठरते.

ब्लड शुगर टेस्ट (Blood Sugar Test)

ही तपासणी प्रामुख्याने रक्तातील ब्लड शुगर लेव्हल बघण्यासाठी केली जाते. मधुमेही (Diabetes) रुग्णांवरील उपचारांसाठी ही सर्वात महत्वाची तपासणी असते. तणाव, संसर्ग किंवा स्टेरॉईड सारख्या औषधांमुळे ब्लड शुगर लेव्हल विस्कळीत होऊ शकते.

प्रो-कॅल्सिटोनिन टेस्ट (PCT)

रुग्ण बुरशीजन्य आजाराला कशाप्रकारे प्रतिसाद देत आहे, हे पाहण्यासाठी ही रक्ताव्दारे केली जाणारी बायोमार्कर टेस्ट (Biomarker) आहे. याची रेंज बुरशी संसर्गाच्या 3ते6 तासांनी वाढते, 12 ते 24 तासांत सर्वोच्च पातळीवर जाते आणि संसर्ग बरा झाल्यावर कमी होते. मात्र विषाणूजन्य आजारांमध्ये याची प्रो-कॅल्सिटोनिनची पातळी कमी होते. दुय्यम बुरशीजन्य (Fungual) संसर्गाची तपासणी आणि रोगाची प्रगती ठरवण्यासाठी पीसीटी मदत करते.

हे वाचा - Explainer: पालकांनो लक्ष द्या! लहान-किशोरवयीन मुलांसाठी कोरोना लस सुरक्षित आहे?

स्टेरॉईडसमुळे किंवा बुरशीच्या संसर्गामुळे डब्ल्यूबीसीची (WBC) संख्या वाढली आहे की नाही हे देखील या टेस्टद्वारे समजू शकते. रुग्णाला अँटिबायोटिक औषधांची गरज आहे की नाही हे ठरवण्यासाठी पीसीटी एक महत्वाचे साधन आहे. यामुळे अँटिबायोटिकचा (Antibiotic Medicine) वापर योग्य प्रमाणात होऊन दुष्परिणाम आणि खर्च कमी होतो. अनेक अभ्यासांनुसार हे स्पष्ट होते की आजाराची तीव्रता आणि बरे होण्याची शक्यता ठरवण्याची योग्य क्षमता पीसीटीमध्ये आहे.

(लेखक - डॉ. निकेत राय, एमबीबीएस, एमडी, मौलाना आझाद मेडिकल कॉलेज अँड असोसिएटेड लोकनायक हॉस्पिटल, दिल्ली)

First published:

Tags: Corona, Corona patient, Coronavirus, Medicine