मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Bravo केरळ! एकही लस वाया घालवली नाही; आता रेमडेसिवीरचे 1 लाख डोसही केंद्राला केले परत

Bravo केरळ! एकही लस वाया घालवली नाही; आता रेमडेसिवीरचे 1 लाख डोसही केंद्राला केले परत

कोरोना विषाणूचा चांगल्या प्रकारे सामना केलेल्या केरळ सरकारनं (Kerala Corona) आणखीन एक चांगली कामगिरी केली आहे.

कोरोना विषाणूचा चांगल्या प्रकारे सामना केलेल्या केरळ सरकारनं (Kerala Corona) आणखीन एक चांगली कामगिरी केली आहे.

कोरोना विषाणूचा चांगल्या प्रकारे सामना केलेल्या केरळ सरकारनं (Kerala Corona) आणखीन एक चांगली कामगिरी केली आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 12 मे : एकीकडे लशीचं राजकारण सुरू आहे. केंद्र सरकारकडून पुरेशा लशी उपलब्ध नाहीत, म्हणून अनेक सरकारं एकमेकांवर दोषारोप  करत आहेत. अशा वेळी आपल्या नेमक्या आणि व्यवस्थित कोरोना व्यवस्थापनाने दक्षिणेतला डाव्यांचा बालेकिल्ला मानला गेलेला प्रदेश मात्र सरस ठरतो आहे. कोरोना विषाणूचा चांगल्या प्रकारे सामना केलेल्या केरळ सरकारनं (Kerala Corona) आणखीन एक चांगली कामगिरी केली आहे. केरळ सरकारनं केंद्र सरकारकडे न वापरलेले रेमडेसिवीरच्या (Remdesivir Injection) इंजेक्शनचे 1 लाख डोस परत केले आहेत. सरकारी सूत्रांनी बुधवारी ही माहिती दिली. केरळ सरकारनं रेमेडिसवीरचे डोस केंद्राकडं परत केले आहेत, जेणेकरून हे औषध आवश्यक असलेल्या राज्यांमध्ये पुन्हा वाटप करता येतील. महत्त्वाचे म्हणजे केरळ सरकारनं रेमडेसिवीर औषध अशा काळात परत करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यावेळी इतर राज्यांमध्ये या औषधासाठी अनोगोंदी निर्माण झाली आहे. त्यामुळं त्यांच्या या निर्णयाचं कौतुक होत आहे.

गेल्या आठवड्यातच रेमडेसिवीर औषधाची पुरेशी उपलब्धता व्हावी, यासाठी केंद्र सरकारनं 16 मेपर्यंत सर्व राज्यांना या औषधाचं वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. केंद्रीय रसायन व खते मंत्री सदानंद गौडा यांनी हा निर्णय घेतला व औषध विभाग आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने संयुक्तपणे राज्यांमध्ये औषध वाटप करण्याची योजना तयार केली.

भारतातील दुसरी लाट घसरणीला

केंद्रीय रसायन व खते मंत्रालयाने 21 एप्रिल ते 16 मे दरम्यान राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 53 दशलक्ष रेमडेसिवीरचे डोस देण्याचे ठरवले आहेत. या औषधाचा कोरोना उपचारात फायदा होत असून ते कोरोनावर प्रभावी ठरत आहे. पुरवठा योजनेनुसार सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना वेळेवर पुरवठा करावा यासाठी कंपन्यांना सूचना देण्यात आल्या आहेत, जेणेकरुन कोणत्याही रुग्णाला या साथीच्या रोगाचा त्रास होऊ नये, असे गौडा म्हणाले.

हे वाचा - लॉकडाऊन काळात कोरोना सक्रिय रुग्ण एक लाखांनी घटले; रुग्णसंख्या घटली तरी लॉकडाऊन राहणार कायम

केंद्रीय रसायन व खते मंत्रालयाने सांगितले की, औषधे पुरवण्याच्या योजनेनुसार जायडस कॅडिला 21 एप्रिलपासून 16 मेपर्यंत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये रेमडेसिवीरचे एकूण 9,82,100 डोस दिले आणि हेटेरो 17,17,050 लसींची पूर्तता करणार आहे. या दरम्यान माइलान कंपनी 7,28,000 डोस आणि सिप्ला 7,32,300 डोस पुरवणार आहेत. परिपत्रकात असेही सांगण्यात आले आहे की, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जुबिलेंट कंपनी 4,45,700 डोस आणि सिंजेन/सन 3,73,000 डोस तर डॉ. रेड्डीज कंपनी 3,21,850 डोस पुरवणार आहेत. त्यामुळे आता या औषधाची कमतरता भासणार नाही.

First published:

Tags: Corona virus in india, Coronavirus, Coronavirus cases, Kerala