अबुधाबी, 20 जानेवारी : या आठवड्याच्या सुरुवातीला संयुक्त अरब अमिरातीतील (United Arab Emirates) अबुधाबी येथे ड्रोन हल्ल्यात तीन जण ठार झाले होते. यामध्ये दोन भारतीयांचा देखील सहभाग होता. हुथी (Houthis) बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सौदीच्या नेतृत्वाखालील सैन्य (Saudi led Forces)आणि येमेनच्या हुथी बंडखोरांमध्ये ही काही नवीन गोष्ट नाही. या दोघांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. मात्र, गेल्या चार वर्षांपासून हुथी बंडखोर शांत होते. पण या नव्या हल्ल्याने हुथी बंडखोरांचे आणखी काही इरादे दिसून आले आहेत. पण, हे हुथी बंडखोर आहेत तरी कोण? त्यांना काय हवे आहे? सौदी अरेबिया आणि त्यांचे मित्र देश त्यांच्या विरोधात का आहेत, असे प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाले आहेत.
येमेनमध्ये संघर्ष
हल्ल्याची जबाबदारी घेत इराण-समर्थित हुथी बंडखोरांनी इशारा दिला आहे की जोपर्यंत येमेनशी संघर्ष सुरू आहे तोपर्यंत यूएई एक असुरक्षित देश आहे. येमेन हा सर्वात गरीब अरब देशांपैकी एक आहे. गेल्या सात वर्षांपासून हा देश गृहयुद्धाच्या भीषणतेचा सामना करत आहे. जेव्हा हुथी बंडखोरांनी येमेनची राजधानी ताब्यात घेतली तेव्हा हे युद्ध सुरू झाले होते.
संयुक्त अरब अमिरातीचे सहभागी होणे
या घटनेनंतर सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील लष्कराने हस्तक्षेप करत हुथी बंडखोरांविरुद्ध युद्ध पुकारले. प्रदेशातील इराणचा हस्तक्षेप संपवून जुने सरकार पुन्हा स्थापन करणे हा त्यांचा उद्देश होता. संयुक्त अरब अमिराती 2015 मध्ये सौदी मोहिमेत सामील झाली. तेव्हापासून हा देश या संघर्षात अडकला आहे, मात्र 2019 आणि 2020 मध्ये लष्कर हटवण्याची घोषणाही केली.
कोण आहेत हुती?
हुथी संघटनेची स्थापना 1990 च्या दशकात येमेनच्या शिया-बहुसंख्य समुदायातील हुसेन बदरुद्दीन अल-हौती यांनी केली होती. हुथी संघटनेची एकच घोषणा आहे - अल्लाह महान आहे, अमेरिका आणि इस्रायलचा मृत्यू, ज्यूंना शाप आणि इस्लामचा विजय. 2004 मध्ये येमेनी सैनिकांनी हुसेनची हत्या केली, त्यानंतर त्याचा भाऊ अब्दुल मलिक याने संघटनेची सूत्रे हाती घेतली.
इंडोनेशियाच्या नव्या राजधानीचं हिंदू संस्कृतीशी नातं, वाचा Nusantara चा इतिहास
हा समाज बंडखोर कसा झाला?
1962 ते 1970 पर्यंत चाललेल्या या युद्धात एके काळी अत्यंत शक्तिशाली झैदी मार्जिनवर येऊ लागले. यानंतर 1980 च्या दशकात सुन्नी समाजाचे वर्चस्व वाढू लागले. यानंतर अनेक असंतुष्ट येमेनी शिया त्यांचे हुकूमशहा अध्यक्ष अली अब्दुलाह सालेह यांच्यावर नाराज होऊन सौदी बंडखोर गटांमध्ये सामील झाले.
सालेह यांची भूमिका
सालेहने 2012 मध्ये निदर्शनांमुळे सत्ता सोडली. मात्र, 2014 मध्ये हुतींनी येमेनची राजधानी सना ताब्यात घेतली, तत्कालीन अध्यक्ष अब्द रब्बू मन्सूर हादी यांना हटवले आणि सालेहसोबत युती केली. पण हादी हा एक कमकुवत शासक ठरला, ज्यामुळे येमेन भूक, बेरोजगारी, भ्रष्टाचार यासारख्या समस्यांनी वेढला गेला. सालेह सौदी समर्थित युतीकडे जात असल्याचे पाहून, हुथींनी डिसेंबर 2017 मध्ये सालेहलाही ठार केले.
5G नेटवर्कमुळे विमानातील यंत्रणेवर होणार परिणाम? एअरलाइन्सनी दिला धोक्याचा इशारा
जगातील इतर अनेक शक्ती देखील
तेव्हापासून हुतींनी उत्तर येमेनवर कब्जा केला आहे, तर त्यांच्या विरोधकांचे उर्वरित येमेनवर नियंत्रण आहे, ज्याला सौदी अरेबियाचा पाठिंबा आहे. सौदी अरेबियाच्या युतीला अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सचा पाठिंबा आहे. युतीने दक्षिण येमेनमधून हुतींना हुसकावून लावले. परंतु, ते हुथींना पूर्णपणे संपवू शकले नाही आणि आजही संघर्ष सुरू आहे. येमेनमध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे, तर महिला आणि मुलांची परिस्थिती बिकट झाली आहे.
युनायटेड अरब अमिराती मार्च 2015 पासून युतीशी संबंधित आहे. त्यांचे सैन्य सालेहच्या पुतण्याच्या संघटनेला समर्थन देत आहे. पण यूएई सौदी अरेबियासारख्या हुती बंडखोरांचे लक्ष्य राहिलेले नाही. 2019 मध्ये UAE ने देखील येमेनमधून सैन्य मागे घेण्याची घोषणा केली. मात्र, अलीकडेच UAE समर्थित गटाने Houthis वर भयंकर हल्ला केला. यानंतर हुथींनी या महिन्यात यूएईचे एक जहाज देखील ताब्यात घेतले. आता ताज्या हल्ल्याला हुतींचा इशारा सांगण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.