मराठी बातम्या /बातम्या /explainer /

महाभारतातील अभिमन्यूमुळे कबड्डीचा उदय? काय आहे इतिहास? Olympics मध्ये का नाही समावेश?

महाभारतातील अभिमन्यूमुळे कबड्डीचा उदय? काय आहे इतिहास? Olympics मध्ये का नाही समावेश?

सध्या सगळीकडे प्रो कबड्डी (pro kabaddi league season 8) लीगचा बोलबाला आहे. 22 डिसेंबरपासून सुरू झालेल्या यंदाच्या मोसमात 12 टीम 135 सामने खेळणार आहेत. सध्या चर्चेत असलेल्या कबड्डीचा इतिहास (history of Kabaddi) तुम्हाला माहिती आहे का?

सध्या सगळीकडे प्रो कबड्डी (pro kabaddi league season 8) लीगचा बोलबाला आहे. 22 डिसेंबरपासून सुरू झालेल्या यंदाच्या मोसमात 12 टीम 135 सामने खेळणार आहेत. सध्या चर्चेत असलेल्या कबड्डीचा इतिहास (history of Kabaddi) तुम्हाला माहिती आहे का?

सध्या सगळीकडे प्रो कबड्डी (pro kabaddi league season 8) लीगचा बोलबाला आहे. 22 डिसेंबरपासून सुरू झालेल्या यंदाच्या मोसमात 12 टीम 135 सामने खेळणार आहेत. सध्या चर्चेत असलेल्या कबड्डीचा इतिहास (history of Kabaddi) तुम्हाला माहिती आहे का?

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 23 डिसेंबर : प्रो कबड्डी लीगच्या आठव्या मोसमाचं (pro kabaddi league season 8) 22th डिसेंबरला बिगुल वाजले आहे. दोन वर्षांच्या अंतरानंतर पुन्हा एकदा कबड्डीच्या चाहत्यांना मैदानातला थरार अनुभवता येणार आहे. या मोसमात 12 टीम 135 सामने खेळणार आहेत. सध्या प्रत्येकाच्या चर्चेचा विषय असलेला कबड्डी हा खेळ किती जुना आहे हे माहिती आहे का? अगदी महाभारतात देखील या खेळाचा उल्लेख आढळतो. तुकाराम महाराजांच्या अभंगातही कबड्डी येते. खरच या खेळाची उत्पत्ती कधी झाली? इतिहास सांगतो की कबड्डी चार हजार वर्षांपूर्वी जन्माला आला. चला कबड्डीचा मागोवा घेऊ.

तुकाराम महाराजांच्या अभंगात उल्लेख Tukaram Maharaj

संत तुकाराम महाराज एका अभंगात आपला प्रिय देव कृष्ण कबड्डी खेळत असल्याचा उल्लेख केला आहे. इतर दंतकथांनुसार, कबड्डीचा उगम 4000 वर्षांपूर्वी तामिळनाडूमध्ये झाला. पूर्वी हा खेळ राजकन्या किंवा त्यांच्या नववधूंना त्यांचे सामर्थ्य दाखवण्यासाठी राजपुत्र खेळत असत.

अभिमन्यूमुळे कबड्डीचा उदय? Kabaddi due to Abhimanyu?

महाभारत (Mahabharata) काळापासून कबड्डी हा भारतीय संस्कृतीचा एक मोठा भाग आहे. अभिमन्यूच्या स्मरणातून कबड्डीचा शोध लागला असे काहींचे मत आहे. हा खेळ विकसित करण्यामागील प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे एकाचवेळी अनेक गटांकडून होणाऱ्या हल्ल्यांविरुद्ध बचाव पद्धती विकसित करणे. कबड्डीबद्दल सर्वात मनोरंजक गोष्ट अशी आहे की हा असा खेळ आहे, ज्यामध्ये एक गट बचाव करतो, तर दुसरीकडून एकटाच हल्ला करतो.

तामिळनाडूमध्ये उगम? Origin in Tamil Nadu?

या खेळाचा उगम प्राचीन भारतातील तामिळनाडू येथे झाला. आधुनिक कबड्डी हे त्याचेच सुधारित रूप आहे, जे वेगवेगळ्या ठिकाणी इतर अनेक नावांनी ओळखले जाते. ही जागतिक दर्जाची कीर्ती 1936 च्या बर्लिन ऑलिम्पिकमधून मिळाली. 1938 मध्ये कलकत्ता येथील राष्ट्रीय खेळांमध्ये त्याचा समावेश करण्यात आला. 1950 मध्ये अखिल भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना झाली आणि कबड्डी खेळण्याचे नियम निश्चित करण्यात आले. या फेडरेशनची 1972 मध्ये 'हौशी कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया' या नावाने पुनर्रचना करण्यात आली. त्याची पहिली राष्ट्रीय स्पर्धा त्यावर्षी चेन्नई येथे खेळली गेली.

IPL 2022: अहमदाबादच्या टीमबाबत BCCI ने घेतला मोठा निर्णय

हा खेळ वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. उदाहरणार्थ, कबड्डीला तामिळनाडूमध्ये चदुकट्टू, बांगलादेशमध्ये हड्डू, मालदीवमध्ये भावतिक, पंजाबमध्ये कुड्डी, पूर्व भारतात हू तू तू, आंध्र प्रदेशमध्ये चेडुगुडू म्हणून ओळखले जाते. कबड्डी हा शब्द मूळतः 'काई- पीडी' या तमिळ शब्दापासून आला आहे ज्याचा अर्थ हात पकडणे असा आहे, कबड्डी हा शब्द उत्तर भारतात खूप प्रसिद्ध आहे.

जपानमध्येही कबड्डी प्रसिद्धी Kabaddi famous in Japan

जपानमध्येही कबड्डीला खूप प्रसिद्धी मिळाली. तिथे सुंदर राम नावाच्या भारतीयाने हा खेळ 1979 मध्ये सर्वांसमोर ठेवला. या खेळासाठी त्यावेळी 'हौशी कबड्डी'च्या आशियाई महासंघातर्फे सुंदर राम जपानला गेले होते. तेथे त्यांनी लोकांसह दोन महिने प्रचार केला. 1979 मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यातील या खेळाचा सामना भारतातच झाला होता. 1980 मध्ये या खेळासाठी आशिया चॅम्पियनशिप सुरू झाली, ज्यामध्ये भारताने बांगलादेशचा पराभव करून स्पर्धा जिंकली. या दोन देशांव्यतिरिक्त नेपाळ, मलेशिया आणि जपान हे देशही या स्पर्धेत होते. 1990 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत या खेळाचा समावेश करण्यात आला होता. हा खेळ बीजिंगमध्ये इतर अनेक देशांमधील सामन्यांसोबत खेळला गेला.

आंतरराष्ट्रीय कबड्डी International Kabaddi

कबड्डीच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघांमध्ये प्रत्येक संघात 7 खेळाडू असतात. खेळाचे मैदान दोन संघांमध्ये समान भागांमध्ये विभागलेले आहे. पुरुष खेळल्या जाणाऱ्या कबड्डीमध्ये मैदानाचे क्षेत्रफळ (10 बाय 13) असते, तर महिलांच्या कबड्डीमध्ये मैदानाचे क्षेत्रफळ (8 बाय 12) असते. दोन्ही संघात तीन अतिरिक्त खेळाडू आहेत. हा खेळ दोन 20 मिनिटांच्या अंतराने खेळला जातो, ज्यामध्ये खेळाडूंना पाच मिनिटांचा अर्धा वेळ मिळतो. या अर्ध्या वेळेत दोन्ही पक्ष त्यांचे कोर्ट बदलतात.

IND vs SA सीरीजपूर्वी Shastri दिसले नव्या अवतारात, दक्षिण आफ्रिकेला दिला इशारा

कबड्डीचा ऑलिम्पिकमध्ये समावेश का नाही? Why is Kabaddi not included in the Olympics?

कबड्डीचा अजूनही ऑलिम्पिकमध्ये समावेश न होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे व्यावसायिक कबड्डी संघटना आणि लीगची अनुपस्थिती. त्याशिवाय, जर एखाद्या खेळाला ऑलिम्पिकसाठी पात्र व्हायचे असेल तर तो 75 देश आणि 4 खंडांमध्ये खेळला जायला. यामुळे कबड्डीचा ऑलिम्पिकमध्ये समावेश होण्याची शक्यता कमी होते.

First published:

Tags: Pro kabaddi, Pro kabaddi league, Sports