मराठी बातम्या /बातम्या /explainer /

गुजरात निवडणूक : काँग्रेससाठी केवळ भाजप नाही, तर 'हे' आहे मोठं आव्हान! होऊ शकतं पानिपत

गुजरात निवडणूक : काँग्रेससाठी केवळ भाजप नाही, तर 'हे' आहे मोठं आव्हान! होऊ शकतं पानिपत

Gujarat Elections: 2017 मध्ये, 182 सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसने 77 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी मोठ्या संख्येने लोकांनी काँग्रेसच्या बाजूने मतदान केले होते. गुजरातच्या ग्रामीण भागातील जनतेने काँग्रेसवर विश्वास व्यक्त केला होता.

Gujarat Elections: 2017 मध्ये, 182 सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसने 77 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी मोठ्या संख्येने लोकांनी काँग्रेसच्या बाजूने मतदान केले होते. गुजरातच्या ग्रामीण भागातील जनतेने काँग्रेसवर विश्वास व्यक्त केला होता.

Gujarat Elections: 2017 मध्ये, 182 सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसने 77 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी मोठ्या संख्येने लोकांनी काँग्रेसच्या बाजूने मतदान केले होते. गुजरातच्या ग्रामीण भागातील जनतेने काँग्रेसवर विश्वास व्यक्त केला होता.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

अहमदाबाद, 10 जुलै : भाजपने अनेक राज्यात विरोधी पक्षाची सरकारं पाडून सत्ता स्थापन केली आहे. अशा परिस्थितीत गुजरातमधील यंदाची विधानसभा निवडणूक विरोधी पक्ष काँग्रेससाठी सर्वात कठीण निवडणूक ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेससमोर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा (भाजप) पराभव करण्यासोबत आम आदमी पार्टी (AAP) आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) यांसारख्या पक्षांपासून आपला पाया सुरक्षित ठेवण्याचं काँग्रेससमोर दुहेरी आव्हान आहे. ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा (भाजप) पराभव करण्याचे आव्हान आहे. AAP आणि AIMIM सारखे पक्ष गुजरातमध्ये खूप सक्रिय झाले असून त्यांचे राजकीय मैदान तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या गुजरात निवडणुकीत लोक काँग्रेसला मतदान करतील. कारण, राज्यातील सामान्य जनता भाजपच्या दोन दशकाच्या "कुशासन"ला कंटाळली असल्याचा दावा काँग्रेसच्या गुजरात युनिटच्या प्रवक्त्याने केला आहे. मात्र, राजकीय निरीक्षकांचे असे मत आहे की, गुजरातमधील काँग्रेसला मजबूत स्थानिक नेते आणि सक्रिय कार्यकर्त्यांच्या अभावाशिवाय अंतर्गत कलहाचा देखील सामना करावा लागत आहे. 1995 पासून गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस जिंकू शकलेली नाही. राजकोटचे रहिवासी राजकीय निरीक्षक सुरेश सामानी यांनी पीटीआयला सांगितले की, "गुजरातमधील काँग्रेससाठी ही सर्वात कठीण निवडणुकांपैकी एक असेल."

2017 च्या निवडणुकीत काँग्रेसला 77 जागा

ते म्हणाले की, 2017 मध्ये काँग्रेसने 182 सदस्यीय विधानसभेत 77 जागा जिंकल्या होत्या. मोठ्या संख्येने लोकांनी काँग्रेसच्या बाजूने मतदान केले होते. विशेषतः गुजरातच्या ग्रामीण भागातील जनतेने काँग्रेसवर विश्वास व्यक्त केला होता. भाजप 99 जागांसह सत्तेत परतला. सुरेश सामानी म्हणाले, 2017 च्या निवडणुकीच्या वेळी शेतकरी वर्ग त्यांच्या पिकाला चांगला भाव मिळत नसल्याने खूश नव्हता. गेल्या पाच वर्षांत राज्यातील भाजप सरकारने भुईमुगासारख्या व्यावसायिक पिकांसह प्रत्येक कृषी उत्पादनाची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) वाजवी दरात खरेदी केली आहे. ग्रामीण जनतेला आता तक्रार करण्यासारखे काहीच नाही.

राज्यसभेतील नामनिर्देशित सदस्यांचा असा आहे इतिहास? तेंडुलकरांच्या वेळेस का झाला वाद?

'काँग्रेसची स्वतःच्या बालेकिल्ल्यातही स्थिती कमकुवत'

महागाई वाढूनही हिंदुत्वासह विविध कारणांसाठी शहरी मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्गीय मतदार भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे राज्याच्या शहरी भागात आपला पाया मजबूत करण्याची काँग्रेसची योजना फारशी यशस्वी होण्याची शक्यता नाही, असे सामानी म्हणाले. काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या गुजरातमधील उत्तरेकडील आणि काही आदिवासी भागात पक्षाची स्थिती कमकुवत झाली आहे. कारण, गेल्या पाच वर्षांत त्यांचे अनेक दिग्गज भाजपमध्ये सामील झाले आहेत. सामानी यांच्या मते, काँग्रेसमधील अंतर्गत कलह आणि सक्रिय कार्यकर्त्यांची कमतरता हेही पक्षासाठी चिंतेचे कारण आहे.

आप आणि एआयएमआयएमने काँग्रेसच्या अडचणी वाढवल्या

काँग्रेससमोर दुसरे आव्हान अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील AAP आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील AIMIM सारखे पक्ष आहेत, जे गुजरातमध्ये त्यांचे स्थान मजबूत करून काँग्रेसच्या पारंपारिक मतपेढीला सतत खीळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत. आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अलीकडच्या काळात गुजरातमध्ये अनेक रॅली घेतल्या आणि काँग्रेसवर निशाणा साधत लोकांना मतदान न करण्याचे आवाहन केले आहे. भाजपला पराभूत करण्याची क्षमता काँग्रेसमध्ये नाही, असे केजरीवाल म्हणतात. गुजरातमध्ये 'आप' भाजपला कडवी टक्कर देण्याचा प्रयत्न करत आहे.

व्हिप म्हणजे काय? त्यानुसार नेमकी कोणावर कारवाई होणार? शिंदे गट की शिवसेना?

काँग्रेस भाजपला कडवी टक्कर देऊ शकते...

छोटू वसावा यांच्या भारतीय आदिवासी पक्षाने (बीटीपी) आदिवासी मतांसाठी काँग्रेसशी सामना करण्यासाठी आपसोबत युती करण्याची घोषणा केली आहे. अल्पसंख्याक समुदायाला आकर्षित करण्याच्या उद्देशाने AIMIM प्रमुख ओवेसी यांनी अलीकडेच अहमदाबाद, उत्तर गुजरातमधील वडगाम आणि कच्छमधील काही मुस्लिमबहुल मतदारसंघांना भेट दिली. ओवेसी गुजरातमध्ये आपल्या पक्षाची स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच वेळी, खाम (क्षत्रिय, हरिजन, आदिवासी आणि मुस्लिम) व्होट बँक आणि असंतुष्ट पटेल समुदायावर लक्ष केंद्रित केल्यास काँग्रेस भाजपला कडवी टक्कर देऊ शकते, असा विश्वास आणखी एक राजकीय निरीक्षक हरी देसाई यांनी व्यक्त केला.

'गुजरातची जनता भाजपला कंटाळली आहे'

काँग्रेसच्या गुजरात युनिटचे प्रवक्ते मनीष दोशी म्हणाले की, गुजरातमधील लोक भाजपच्या दोन दशकांहून अधिक काळच्या "अहंकार आणि कुशासनाला" कंटाळले आहेत. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत ते सत्ताधारी पक्षाच्या विरोधात मतदान करतील. दोशी म्हणाले, "काँग्रेसने रणनीती आखली असून, पक्षाचे केंद्रीय नेतृत्व सर्व गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. निवडणुकीत कोणते धोरण अवलंबायचे याबाबत सूचना देत आहे." आम्ही ही निवडणूक गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या विरोधात लढण्याचे ठरवले आहे. ते म्हणाले की, काँग्रेसला ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध विरोधक अशी करायची नाही.

First published:

Tags: Election, Gujarat