जाहिरात
मराठी बातम्या / Explainer / Geminid Meteor Shower : आज मध्यरात्रीनंतर होणार जेमिनीड उल्कावर्षाव! पृथ्वीला धोका तर नाही?

Geminid Meteor Shower : आज मध्यरात्रीनंतर होणार जेमिनीड उल्कावर्षाव! पृथ्वीला धोका तर नाही?

Geminid Meteor Shower : आज मध्यरात्रीनंतर होणार जेमिनीड उल्कावर्षाव! पृथ्वीला धोका तर नाही?

Geminid meteor shower 2021: आज देशाच्या प्रत्येक भागातून जेमिनीड उल्कावर्षाव दिसणार आहे. डिसेंबर महिन्यातच उल्कावर्षाव का होतो. काय आहे कारण? यापासून पृथ्वीला काही धोका आहे का?

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 डिसेंबर : खगोलप्रेमींसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. आज मिथुन राशीतील जेमिनीड (Geminids) उल्कावर्षाव रात्रभर दिसणार आहे. चंद्र प्रकाशाचा अडथळा नसल्याने जेमिनीडच्या अनेक तेजस्वी उल्का पहायला मिळतील असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. ही घटना दरवर्षी डिसेंबर महिन्यात घडते. याला जेमिनीड्स उल्कावर्षाव म्हणतात. काय आहे हा प्रकार? यामुळे पृथ्वीला काही धोका आहे का? चला सविस्तर जाणून घेऊया. उत्तर गोलार्धात जेमिनीड उल्कावर्षावाची (Geminids meteor shower) सर्वाधिक चमक दिसते. हा उल्कावर्षाव 4 ते 17 डिसेंबरपर्यंत सक्रिय राहतात. मिथुन हे अतिशय विश्वासार्ह उल्कावर्षाव आहेत. जे रात्री दोन वाजता जगभर दिसणार आहे. उल्कावर्षावांना जेमिनीड म्हणतात कारण ते मिथुन (जेमिनीड) नक्षत्रातून आलेले दिसतात. मात्र, या उल्कावर्षावाचा मूळ भाग 3200 फेथॉन (3200 Phaethon) नावाचा खडकाळ भाग आहे. यूएस स्पेस एजन्सी नासाच्या म्हणण्यानुसार, जेमिनीड हा 3200 फेथॉनच्या ढिगाऱ्याचा तुकडा आहे. जेमिनीड का दिसतात? दरवर्षी डिसेंबर महिन्यात पृथ्वी जेव्हा 3200 फेथॉन खडकाळ लघुग्रहांच्या ढिगाऱ्यापासून जाते तेव्हा जेमिनीड सक्रिय होतात. जेव्हा या उल्केची धूळ आणि खडे पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात तेव्हा ती पेट घेते. जेमिनीड पृथ्वीच्या वातावरणातून ताशी 78,000 मैल वेगाने प्रवास करतात. मात्र, पृथ्वीच्या खूप वरच्या वातावरणातच पेट घेतात. पहिल्यांदा कधी पाहिलं गेल? 1800 च्या दशकात पहिल्यांदा जेमिनीड उल्का वर्षावाची नोंद झाली. मात्र, त्यावेळी प्रति तास फक्त 10-20 उल्का दिसत होत्या. नासाच्या मते, आज त्यांची संख्या ताशी 120 पर्यंत वाढली आहे. सामान्यतः उल्कावर्षाव बर्फाळ धूमकेतूपासून उद्भवतात. पण, जेमिनीड उल्कावर्षाव अद्वितीय आहेत कारण ते खडकाळ पिंडांपासून निर्माण होतात. जेमिनीड 3200 फेथॉन काय आहे? 3200 फेथॉनच्या स्वरूपाबद्दल खगोलशास्त्रज्ञ एकमत नाहीत. नासाच्या म्हणण्यानुसार, हा एकतर पृथ्वीच्या जवळचा लघुग्रह किंवा नामशेष झालेला धूमकेतू आहे. कधीकधी त्याला खडकाळ उल्का असेही म्हणतात. फेथॉनच्या कक्षेप्रमाणेच 2005 UD नावाचा अपोला लघुग्रहाची देखील एक कक्षा आहे, जी त्याच मोठ्या खगोलीय पिंडाचा भाग असल्याचे म्हटले जाते आणि दुसऱ्या लघुग्रहाशी टक्कर झाल्यावर त्याचे दोन तुकडे झाले. हे नाव प्राचीन ग्रीक देव अपोलोच्या मुलाच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे. 3200 फेथॉनला सर्वप्रथम 1983 मध्ये इन्फ्रारेड खगोलशास्त्रीय उपग्रहाने पाहिले होते. लघुग्रह दर 1.4 वर्षांनी सूर्याभोवती फिरतो. बर्‍याचदा तो पृथ्वीच्या जवळ येतो आणि बुधाच्या कक्षेत सूर्याच्या अगदी जवळून जातो. त्याचे सूर्यापासूनचे अंतर फक्त 0.15 खगोलशास्त्रीय एकक आहे. (खगोलीय एकक किंवा खगोलीय युनिट म्हणजे पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतर: अंदाजे 93 दशलक्ष मैल किंवा 150 दशलक्ष किलोमीटर).

पृथ्वीच्या जीवसृष्टीचे रक्षण करणाऱ्या एका महाकाय ‘कवचा’चा शोध!

पृथ्वीला धोका आहे का? या घटनेत घाबरण्यासारखे काहीही नाही, ही एक सामान्य खगोलीय घटना आहे जी पृथ्वीवर लाखो वर्षांपासून घडत आहे. आज मध्यरात्रीनंतर तुम्ही ते आकाशात पाहू शकता, ही घटना पृथ्वीच्या प्रत्येक भागातून दिसेल. विशेषतः उत्तर गोलार्धातून हे अधिक स्पष्ट दिसेल. कोणत्याही उपकरणाशिवाय तुम्ही ते स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकता. मध्यरात्रीनंतर आकाशात फटाक्यांच्या आतषबाजीसारखे दृश्य पाहायला मिळणार आहे. उल्कापिंडाचे तुकडे खूप मौल्यवान मानले जातात. त्यांची किंमत आकारानुसार करोडो रुपये असू शकते. त्यांना शोधून विकण्याचे कामही अनेक व्यावसायिक करतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात