जाहिरात
मराठी बातम्या / Explainer / कधी विचार केलाय? सात वारांमध्ये रविवारचीच का असते सुटी? कोणी केली याची निवड? वाचा रंजक इतिहास

कधी विचार केलाय? सात वारांमध्ये रविवारचीच का असते सुटी? कोणी केली याची निवड? वाचा रंजक इतिहास

वाचा रंजक इतिहास

वाचा रंजक इतिहास

साप्ताहिक सुटीसाठी आठवड्यातील बाकी वारांऐवजी रविवारचीच निवड का करण्यात आली या मागचं कारण अगदीच रंजक आहे. याबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

    मुंबई, 11 मे:  आठवड्यातील सात वारांपैकी आपल्याला सर्वांत आवडता वार असतो रविवार. याला कारण म्हणजे, जगभरातील बहुतांश देशांमध्ये हा दिवस साप्ताहिक सुटी (Weekly off Sunday) म्हणून निवडलेला असतो. त्यामुळेच लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा वार आवडतो. जगभरात रविवार हा सुटीचा वार (Sunday Holiday) म्हणून मानला जाण्यामागे खरं तर ब्रिटिशांचा अप्रत्यक्ष हात आहे. साप्ताहिक सुटीसाठी आठवड्यातील बाकी वारांऐवजी रविवारचीच निवड का करण्यात आली या मागचं कारण अगदीच रंजक आहे. याबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. TV9 हिंदीने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. भारतात कामगारांनी झगडून मिळवली सुटी आंतरराष्ट्रीय मानकीकरण संस्थेने 1986 साली रविवारला सप्ताहाचा शेवटचा दिवस म्हणून मान्यता दिली. मात्र, रविवारला सुटीचा नियम हा त्यापूर्वीपासूनच चालत आला आहे. याला कारण होते कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे. भारत ब्रिटिशांच्या ताब्यात असताना, देशातील कामगारांना आठवड्याचे सातही दिवस काम करावं लागत होतं. कहर म्हणजे, कामगारांसाठी जेवणाची सुटीदेखील निश्चित करण्यात आली नव्हती. त्यामुळे कामगारांना दररोज, सलग काम करावं लागत होतं. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत होता. मात्र, 1857 मध्ये हे चित्र बदललं. कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे (Narayan Meghaji Lokhande) यांनी कामगारांच्या साप्ताहिक सुटीचा मुद्दा उचलून धरला. मात्र, इंग्रजांनी लगेच ही मागणी मान्य केली नाही. कित्येक वर्षांच्या संघर्षानंतर, अखेर 10 जून 1890 रोजी ब्रिटिशांनी रविवार हा दिवस साप्ताहिक सुटीचा (British announced Sunday as holiday) म्हणून घोषित केला. 31 वर्षे जुने प्रकरण, 353 वर्षांचा इतिहास.. ज्ञानवापी मशीदीवर हक्क कोणाचा?

    ब्रिटिशांमुळे जगभरात हाच नियम ब्रिटिश गव्हर्नर जनरल यांनी सर्वांत पहिल्यांदा ब्रिटनमधील शाळांना रविवारी सुटी (School Holiday Sunday) जाहीर केली होती. ब्रिटिशांच्या जगभरात वसाहती होत्या त्यामुळे ब्रिटनमध्ये जो नियम लागू होई, तोच सगळीकडे होत. त्यामुळे जगभरातील कित्येक देशांमध्ये शाळांना रविवारी सुटी देण्यात आली. भारतदेखील पूर्वी ब्रिटिशांची वसाहत असल्यामुळे आपल्याकडेही हाच नियम लागू झाला, आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही तो कायम ठेवण्यात आला.

    मानवी मेंदूवर मोठं संशोधन! भविष्यातील अनेक संक्रमण आणि धोक्यांचं निदान होणार

    धार्मिक कारणही महत्त्वाचं उडिसा पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, रविवार हा सूर्यदेवाचा वार समजला जातो. जगभरातील प्राचीन संस्कृतींमध्ये तसंच हिंदू धर्मातही सूर्यपूजेला (Sun prayers) मोठे महत्त्व देण्यात आलं आहे. तसंच, ख्रिस्ती धर्मात रविवार हा देवाच्या सामूहिक प्रार्थनेसाठी ठरलेला असतो. या ‘संडे मास’ला (Sunday mass) लोकांना उपस्थित राहता यावं यासाठीदेखील रविवारी सुटी जाहीर केल्याचे म्हटले जाते. यामुळेच यूएई, इराण, इराक, कुवेत, लिबिया, ओमान, इजिप्त, सुदान अशा कित्येक मुस्लिम बहुल देशांमध्ये शुक्रवार हा साप्ताहिक सुटीचा दिवस असतो. कारण, मुस्लिम लोक शुक्रवारी देवाची सामूहिक प्रार्थना करतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: explainer
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात