Home /News /explainer /

केरळमध्ये पसरलेला नोरोव्हायरस किती जीवघेणा? ही लक्षणे आढळल्यास लगेच डॉक्टरांकडे जा

केरळमध्ये पसरलेला नोरोव्हायरस किती जीवघेणा? ही लक्षणे आढळल्यास लगेच डॉक्टरांकडे जा

What is Norovirus: आता नोरोव्हायरसने केरळमध्येही दार ठोठावलं आहे. तिरुअनंतपुरममधील एका शाळेत दोन मुलांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. उलट्या आणि जुलाब ही या संसर्गाची मुख्य लक्षणे आहेत.

    कोची, 6 जून : कोरोना व्हायरस, टोमॅटो फ्लू, निपाह आणि स्वाइन फ्लूनंतर आता केरळमध्ये नोरोव्हायरसचे (What is Norovirus) प्रकरण समोर आले आहे. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, दोन मुलांना नोरोव्हायरसची लागण झाल्याचे आढळून आले आहे. ते म्हणाले की, तिरुवनंतपुरममधील एका शाळेत अन्नातून विषबाधा आणि अतिसाराच्या तक्रारी आल्यानंतर दोन मुलांचे नमुने तपासण्यात आले, ज्यामध्ये नोरोव्हायरसची पुष्टी झाली. सध्या दोन्ही मुलांची प्रकृती स्थिर आहे. आजकतने याची माहिती दिलीय. नोव्हेंबर 2021 मध्ये केरळमध्ये नोरोव्हायरसचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर वायनाडमधील एका पशुवैद्यकीय महाविद्यालयातील 13 विद्यार्थ्यांना या विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले. उलट्या आणि जुलाब ही या विषाणूची प्रमुख लक्षणे आहेत. कोणाला संसर्ग होऊ शकतो? कोणालाही त्यांच्या आयुष्यात अनेक वेळा नोरोव्हायरसचा संसर्ग होऊ शकतो. कारण त्याचे अनेक प्रकार आहेत. त्यामुळे, जर तुम्हाला एकदा संसर्ग झाला असेल, तर तुम्हाला या विषाणूचा संसर्ग पुढेही होऊ शकतो. जर तुम्हाला एका प्रकारच्या नोरोव्हायरसची लागण झाली असेल, तर त्याविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होऊ शकते. परंतु, तुम्हाला पुन्हा दुसर्‍या प्रकाराचा संसर्ग होऊ शकतो. एकदा संसर्ग झाल्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती किती काळ टिकते याबद्दल देखील कोणतीही माहिती नाही. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल (CDC) नुसार, कोणत्याही वयातील कोणत्याही व्यक्तीला संसर्ग होऊ शकतो. याशिवाय, तुम्हाला नोरोव्हायरसची लागण झाली आहे की नाही, हे तुमच्या जनुकांवरही अवलंबून आहे. नोरोव्हायरसला कधीकधी 'पोटाचा फ्लू' किंवा 'पोटात बग' असेही म्हणतात. मात्र, त्याची लागण झाल्यानंतर फ्लूसारखा आजार होत नाही. अचानक चक्कर येते तेव्हा लगेच या गोष्टी करू शकता; औषधांशिवाय कमी होईल त्रास लक्षणे काय आहेत? उलट्या, जुलाब, पोटदुखी आणि मळमळ ही त्याची मुख्य लक्षणे आहेत. काही वेळा रुग्णाला ताप, डोकेदुखी आणि अंगदुखीचीही तक्रार असते. या विषाणूच्या संसर्गामुळे पोटात किंवा आतड्यांमध्ये जळजळ होऊ शकते. संसर्ग झाल्यानंतर 12 ते 48 तासांनंतर लक्षणे दिसू लागतात. एक ते तीन दिवसांत आरामही मिळतो. जर तुम्हाला नोरोव्हायरसची लागण झाली असेल, तर तुम्हाला दिवसातून अनेक वेळा ताप, उलट्या आणि जुलाब होऊ शकतात. याशिवाय डिहायड्रेशनच्या तक्रारीही सतावू शकते. हा विषाणू कसा पसरतो? नोरोव्हायरसने दूषित असलेले कोणतेही अन्न खाल्ल्याने किंवा पेय पिल्याने संसर्ग होऊ शकतो. याशिवाय नोरोव्हायरसने दूषित कोणत्याही पृष्ठभागाला किंवा वस्तूला स्पर्श केल्यासही संसर्ग पसरू शकतो. तुम्ही नोरोव्हायरसने संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलात तरीही संसर्ग होण्याचा धोका वाढतो. नोरोव्हायरसची लागण झालेली व्यक्ती त्याचे अब्जावधी पार्टिकल सोडू शकते आणि त्यातील काही कण दुसऱ्या व्यक्तीला आजारी बनवू शकतात. काय आहेत उपचार? नोरोव्हायरसची लागण झाल्यानंतर एक ते तीन दिवसात बरा होऊ शकतो. त्यामुळे संसर्ग झाल्यास डिहायड्रेशनची समस्या वाढते, त्यामुळे अधिकाधिक पाणी पिणे आवश्यक आहे. बऱ्याच प्रकरणांमध्ये, डिहायड्रेशनची समस्या मोठ्या प्रमाणात वाढते, त्यानंतर रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असते. रुग्णालयात रक्तवाहिनीतून द्रव टोचला जातो.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Kerala, Virus

    पुढील बातम्या