मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

अचानक चक्कर येते तेव्हा लगेच या गोष्टी करू शकता; औषधांशिवाय कमी होईल त्रास

अचानक चक्कर येते तेव्हा लगेच या गोष्टी करू शकता; औषधांशिवाय कमी होईल त्रास

अनेकांना चक्कर येण्याचा त्रास होतो, उन्हाळ्याच्या दिवसात तर हा त्रास जास्त वाढतो. उन्हाळ्याचा हंगाम संपत आला असला तरीही अजून उष्णता जाणवते. चक्कर आलीच तर किंवा चक्कर येऊ नये म्हणून कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, याबाबत जाणून घेऊया.

अनेकांना चक्कर येण्याचा त्रास होतो, उन्हाळ्याच्या दिवसात तर हा त्रास जास्त वाढतो. उन्हाळ्याचा हंगाम संपत आला असला तरीही अजून उष्णता जाणवते. चक्कर आलीच तर किंवा चक्कर येऊ नये म्हणून कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, याबाबत जाणून घेऊया.

अनेकांना चक्कर येण्याचा त्रास होतो, उन्हाळ्याच्या दिवसात तर हा त्रास जास्त वाढतो. उन्हाळ्याचा हंगाम संपत आला असला तरीही अजून उष्णता जाणवते. चक्कर आलीच तर किंवा चक्कर येऊ नये म्हणून कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, याबाबत जाणून घेऊया.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk
मुंबई, 06 जून : उन्हाळा संपत आला तरी अजून उष्णतेमुळे थकवा, घाम येणे, ऊन यामुळे अनेकांना अशक्तपणा आणि चक्कर येण्याचा त्रास होतो. उन्हाळ्यात गरगरणे किंवा चक्कर येण्याची समस्या सामान्यतः अशा लोकांमध्ये जास्त दिसून येते ज्यांना जास्त घाम येतो आणि सहज निर्जलीकरण होते. इतकेच नाही तर उन्हाळ्यात चक्कर येण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे कमी रक्तदाब. हा आजार नसला तरी काही वेळा हे आरोग्याच्या समस्येचे लक्षणही असू शकते. मेडिकल न्यूज टुडेमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, वेगवेगळ्या कारणांमुळे वेगवेगळ्या लोकांना चक्कर येण्याची समस्या उद्भवू शकते. कोणत्याही औषधांशिवाय ही समस्येवर मात करण्याचे उपाय (How to deal with Dizziness) जाणून घेऊया. चक्कर येत असेल तर हे उपाय करा - फिरल्या सारखं वाटत असेल तर लगेच कुठेही शांत बसावं. जास्त चक्कर येईल अशा गोष्टी टाळा. उदाहरणार्थ, डोके वर करणे, मागे वळून पाहणे इ. चक्कर आल्यासारखे वाटत असेल तर दोन उशा डोक्याखाली ठेवा आणि डोके थोडे वर करून आराम करा. रात्री झोपताना नाईट लाईट चालू ठेवा. तुम्हाला चक्कर येत असेल तर अंधाऱ्या खोलीत डोळे मिटून झोपा. खोल भाग पाहून चक्कर येत असेल तर गाडी चालवणे टाळा आणि पायऱ्या चढणेही टाळा. अशावेळी थंड पाण्याने चेहरा धुवून पाणी प्या. चक्कर आल्यास लगेच लिंबू, साखरेचा पाक किंवा कोणताही गोड रस प्यावा. हर्बल उपाय काम करेल आले चहा - आल्याचा चहा बनवा आणि दिवसातून दोनदा प्या. यासाठी एका ग्लास पाण्यात आल्याचा तुकडा 5 मिनिटे चांगला उकळून प्या. त्यात चवीनुसार मीठ आणि लिंबू घालू शकता. बदाम - चक्कर येण्याचा त्रास असलेल्यांनी दररोज मूठभर बदाम खाल्ले पाहिजे. यामध्ये अ, ब आणि ई जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असल्याने चक्कर येण्याच्या त्रासावर मात करता येते. हायड्रेटेड रहा - आपल्या शरीराला दररोज 8 ते 10 ग्लास पाण्याची गरज असते. अशा परिस्थितीत दिवसभर पुरेसे पाणी पिण्याचा प्रयत्न करा. एसेंशियल ऑयल आपल्यासोबत नेहमी पेपरमिंट, लेविंडर, जिंजर किंवा लेमन एसेंशियल ऑयल ठेवा. यामुळे नॉजिया आणि चक्‍कर येण्याच्या समस्‍येमध्ये आराम मिळू शकतो. अ‌ॅपल सायडर व्हिनेगर आणि मध एक चमचा सफरचंद सायडर व्हिनेगरमध्ये थोडं मध मिसळा आणि पाण्यासोबत प्या. यामुळे शरीरातील रक्त प्रवाह वाढतो आणि चक्कर येण्याची समस्या कमी होते. हे वाचा - Heart Attack वेळी फक्त छातीतच दुखत नाही; अनेकांमध्ये अशी लक्षणं पण दिसून येतात व्यायाम - पलंगावर बसा आणि सुमारे 45 अंशाच्या कोनात डोके फिरवा आणि बेडवर पाय दुमडून झोपा. थोडा वेळ असेच राहा. आता पुन्हा बेडवर बसा आणि त्याच पद्धतीने तुमच्या डोक्याचा 45 अंशाचा कोन दुसऱ्या दिशेने वळवून पुन्हा बेडवर झोपा. तुम्हाला आराम वाटेल. हे वाचा - स्वयंपाकात दालचिनीचा वापर करणाऱ्या अनेकांना त्याचे हे आरोग्य फायदे माहीत नाहीत डॉक्टरांशी संपर्क साधा - जर कोणाला वारंवार मूर्च्छा येत असेल किंवा वारंवार चक्कर येत असेल तर कदाचित हा गंभीर मेडिकल प्रॉब्लेम असू शकतो. अशावेळी ताबडतोब आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Health, Health Tips

पुढील बातम्या