Home /News /explainer /

Explainer: छत्रपती शिवराय, बाळासाहेब की दि. बा. पाटील? काय आहे नेमका नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा वाद

Explainer: छत्रपती शिवराय, बाळासाहेब की दि. बा. पाटील? काय आहे नेमका नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा वाद

Navi Mumbai Airport controversy: नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून काय सुरू आहे वाद? आता राज ठाकरेंनी काय दिलाय त्यावरचा उतारा?

  नवी मुंबई, 22 जून: नवी मुंबई विमानतळाला (Navi Mumai Airport) कुणाचं नाव द्यायचं यावरून गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (Shivsena) आणि प्रकल्पग्रस्तांमध्ये वाद सुरु आहे. या वादात उडी घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackray) यांनी आणखी एक नाव सुचवल्यामुळे वादात अधिकच भर पडलीय. नवी मुंबई विमानतळ हे मुंबई विमानतळाचंच एक्सटेन्शन (Extension) असणार आहे. शिवाय मुंबई विमानतळ हे देशांतर्गत सेेवेसाठी वापरलं जाणार असून नवी मुंबईच्या विमानतळावरूनच आंतरराष्ट्रीय उड्डाणं होणार असल्यामुळे याला छत्रपती शिवरायांचंच (Chatrapati Shivaji Maharaj) नाव देण्यात यावं, असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलंय. राज ठाकरेंची ही सूचना हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं सांगत आपण त्याच्याशी सहमत नसल्याचं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण समितीनं म्हटलंय. वास्तविक, मुंबईचे विमानतळ नवी मुंबईत येत नसून एक नवं विमानतळ इथं तयार होतंय. त्यासाठीच तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा प्रस्ताव शिवसेनेनं दिला. मात्र या दोन्ही नावांना आपली सहमती नसून दि. बा. पाटील यांचंच नाव विमानतळाला देण्याच्या मुद्द्यावर आपण ठाम आहोत, अशी भूमिका कृती समितीनं घेतलीय. वाद काय आहे? नवी मुंबईत तयार होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला कुणाचं नाव द्यायचं, यावरून प्रकल्पग्रस्त आणि शिवेसना आमनेसामने उभे ठाकल्याचं चित्र आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचंच नाव या विमानतळाला द्यावं, या भूमिकेवर शिवसेना ठाम आहे, तर स्थानिकांच्या जमिनीच्या लढ्याचं नेतृत्व करण्यात हयात गेलेल्या दि. बा. पाटील यांचंच नाव विमानतळाला देण्यात यावं, या मागणीवर प्रकल्पग्रस्त ठाम आहेत. कोण आहेत दि. बा. पाटील? दि. बा. पाटील हे पनवेल-उरण मतदारसंघाचे चार वेळा आमदार होते, तर रायगड लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून दोनदा निवडून आले होते.

  हे वाचा - बाळासाहेब असते तर नवी मुंबई विमानतळाला शिवरायांचं नाव दिलं असतं - राज ठाकरे

   1999 साली शिवसेनेच्या तिकीटावर ते लोकसभेला पराभूत झाले आणि त्यानंतर त्यांनी सक्रीय राजकारणातून संन्यास घेत भूमीपूत्रांच्या आंदोलनात उडी घेतली. नवी मुंबईची स्थापन करण्यासाठी सिडकोनं तुटपुंज्या दरात स्थानिकांकडून जमीन विकत घेतली होती. याविरोधात आंदोलन उभं करत दि. बा. पाटील यांनी भूमीपुत्रांना जमिनीचा रास्त भाव मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. जेएनपीटी बंदराच्या उभारणीसाठी जेव्हा शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या गेल्या, तेव्हादेखील आंदोलन उभं राहिलं. दि. बा. पाटील त्यावेळी रुग्णशय्येवर होते. वयाच्या ८७ व्या वर्षीही त्यांनी रुग्णवाहिकेतून आंदोलनस्थळी पोहोचून त्यात सहभाग घेतला होता.
  नामकरणावरून राजकारण नवी मुंबईतील विमानतळावरून पुन्हा एकदा भूमीपुत्र विरुद्ध सिडको असं चित्र उभं राहिलं आहे. नवी मुंबईतील विकासकामांच्या नियोजनाची जबाबदारी असलेल्या सिडकोनं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव विमानतळासाठी निश्चित केलंय, तर प्रकल्पग्रस्तांनी भूमीपुत्रांचे नेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी आग्रह धरलाय. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी नुकतंच मानवी साखळीचं आयोजनही केलं होतं.

  नवी मुंबई विमानतळ नामांतराच्या वादात भाजपची उडी; भाजपने स्पष्ट केली भूमिका

  नवी मुंबई, ठाणे, पनवेल, उरण या भागातील आगरी आणि कोळी समाजातील नागरिक मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते. तर हे विमानतळ मुंबई विमानतळाचाच विस्तार असल्यामुळे त्याला शिवरायांचं नाव देणं योग्य राहिल, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी म्हटलंय.
  असं असेल विमानतळ मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारा ताण लक्षात घेऊन पनवेलपाशी नवं आंतरराष्ट्रीय विमानतळ उभं करण्यात आलंय. याच वर्षी हे विमानतळ कार्यरत करण्याचं नागरी हवाई मंत्रालयाचं नियोजन आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी करणाऱ्या जीव्हीके कंपनीलाच या विमानतळाच्या कामाची जबाबदारी देण्यात आली होती. गेल्या वर्षी जीव्हीके समुहानं यातील त्यांचा हिस्सा हा अदानी समूहाला विकला आहे.
  Published by:desk news
  First published:

  Tags: Airport, Bal Thackeray (Politician), Chhatrapati shivaji maharaj, Mumbai, Raj Thackeray (Politician)

  पुढील बातम्या