'ऑक्सिजनचा वापर Cut-to-Cut; रुग्णसंख्या वाढली तर...'; वाचा मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

'ऑक्सिजनचा वापर Cut-to-Cut; रुग्णसंख्या वाढली तर...'; वाचा मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील परिस्थितीबाबत वक्तव्य केलं.

  • Share this:

मुंबई, 30 एप्रिल : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोनाची रुग्णसंख्या स्थिर झाली आहे. याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ऑक्सिजन, रेमेडिसिवीर इंजेक्शन पुरविण्याबाबत केंद्र अपूर पडत असल्यांचा आरोप केला. याशिवाय 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त त्यांनी कामगारांना शुभेच्छा दिल्या व अभिवादन केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कोरोनाची परिस्थिती स्थिरावत असल्याचं सांगितलं. याशिवाय मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, सध्या राज्यात ऑक्सिजनचा वापर कट-टू-कट सुरू आहे. रुग्णसंख्या वाढली तर गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे-

-कामगारांनाही महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि अभिवादन.

-संयुक्त महाराष्ट्रात गिरणी कामगारांचं मोठं योगदान

-संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान करणाऱ्यांना

-मी अनेक बंधंन घातली, नागरिकांनी त्याचं पालन केलं. त्यामुळे रुग्णवाढ कमी झाली आहे.

-अजूनही रुग्णवाढ उताराला लागली नाही, मात्र स्थिरावली आहे.

-आजपर्यंत आपण जो संयम दाखविला, त्यामुळे सकारात्मक परिणाम. येते काही दिवस याचे पालन करणे आवश्यक.

-गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केला तेव्हा 2 लॅब होत्या. आजची परिस्थिती पाहिली तर 609 लॅब सुरू केल्या आहेत. यातही अधिक वाढ केली जात आहे.

-बेड्स वाढू शकतो, मात्र डॉक्टर आणि ऑक्सिजनचं काय?

-राज्याची ऑक्सिजन तयार करण्याची मर्यादा 1200 मेट्रिक टन इतकी आहे. केंद्राने इतर राज्यातून काही कोटा ठरवून दिला आहे.

-आपण बाहेरून येणारा ऑक्सिजनसाठी, दळण-वळणासाठी पैसे पूरवित आहोत.

-मात्र रुग्णवाढ अधिक झाली तर परिस्थिती कठीण होऊ शकतो.

-दररोज सरासरी 50 हजार रेमेडिसिविरच्या इंजेक्शनची आवश्यकता आहे. मात्र केंद्राने याचं वितरण आपल्या हातात ठेवलं आहे.

-तिसरी लाट जरी आली तरी ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही.

हे ही वाचा-तुम्हीच ठरवा कोणती कोरोना लस योग्य? मोदी सरकारने सर्वसामान्यांवर सोपवला निर्णय

ऑक्सिजनची सद्यस्थिती

आज राज्यात मेडीकल ऑक्सिजनचे उत्पादन करणाऱ्या पाच प्रमुख कंपन्या. तसेच इतर छोटे उत्पादक मिळून राज्याची ऑक्सिजन उत्पादन क्षमता 1270 टन इतकी आहे

जेएसडब्ल्यू स्टील यांनी अतिरिक्त 80 मे. टन उत्पादन वाढवले आहे

केंद्र शासनाने निश्चित केलेला कोटा 1784 टन. त्यात राज्यातील व राज्याबाहेरील उत्पादकांचा समावेश

राज्यात सध्या 1650 मेट्रीक टन ऑक्सिजन आवश्यकता.

आजच्या घडीला खालीलप्रमाणे इतर राज्यांतून ऑक्सिजन मिळतोय :

भिलाई, छत्तीसगड 100 टन (Actual allocation 130)

बेल्लारी कर्नाटक 100 टन (Actual allocation 140)

रिलायन्स, गुजरात 100 टन (Actual allocation 125)

Published by: Meenal Gangurde
First published: April 30, 2021, 9:02 PM IST

ताज्या बातम्या