Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

आता तुम्हीच ठरवा तुमच्यासाठी कोणती कोरोना लस योग्य; मोदी सरकारने सर्वसामान्यांवर सोपवला निर्णय

आता तुम्हीच ठरवा तुमच्यासाठी कोणती कोरोना लस योग्य; मोदी सरकारने सर्वसामान्यांवर सोपवला निर्णय

18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या कोरोना लसीकरण (Covid Vaccination) टप्प्यात केंद्र सरकारने खूप मोठा बदल केला आहे.

18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या कोरोना लसीकरण (Covid Vaccination) टप्प्यात केंद्र सरकारने खूप मोठा बदल केला आहे.

18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या कोरोना लसीकरण (Covid Vaccination) टप्प्यात केंद्र सरकारने खूप मोठा बदल केला आहे.

नवी दिल्ली,  30 एप्रिल : एक मेपासून 18 ते 44 वयोगटातल्या व्यक्तींचं कोरोना लसीकरण (Covid Vaccination) करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. पण लसीकरणाच्या या टप्प्यात केंद्र सरकारने खूप मोठा बदल केला आहे. तुमच्यासाठी कोणती कोरोना लस योग्य (You can Choose corona vaccine) आहे, याचा निर्णय मोदी सरकारने सर्वसामान्यांवर सोपवला आहे. तुमच्यासाठी योग्य अशी कोरोना (Corona vaccine) लस निवडण्याचा अधिकार तुम्हाला दिला आहे.

सध्या भारत बायोटेकची (Bharat Biotech) कोव्हॅक्सिन (Covaxin) आणि सीरम इन्स्टिट्यूटची (SII) कोविशिल्ड (Covishield) अशा दोन लशींचे पर्याय भारतात उपलब्ध आहेत. लसीकरणाच्या 30 एप्रिलपर्यंतच्या टप्प्यांमध्ये आरोग्य कर्मचारी, कोविड योद्धे तसंच 45 वर्षांवरच्या व्यक्तींना केंद्र सरकारतर्फे लस देण्यात आली. या टप्प्यांमधल्या व्यक्तींना लस निवडण्याची संधी देण्यात आली नव्हती.  नव्या टप्प्यात लस घेऊ इच्छिणाऱ्यांना या दोन लशींपैकी कोणती लस घ्यायची हे ठरवता येणार आहे.

कोविड-19 लसीकरणासंदर्भातल्या विशेषाधिकार दिलेल्या समितीचे अध्यक्ष आणि कोरोना लसीकरणासाठी असलेल्या को-विन (Co-win) प्लॅटफॉर्मचे प्रमुख आर. एस. शर्मा (R. S. Sharma) यांनी कोरोना लसीकरण आणि त्याच्या नोंदणीसंदर्भात सीएनएन-न्यूज 18 ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत महत्त्वाची अशी माहिती दिली आहे.

आर. एस. शर्मा यांनी सांगितलं, 'कोव्हॅक्सिन (Covaxin) किंवा कोविशिल्ड (Covishield) या दोन लशींपैकी कोणती लस घ्यायची हे निवडण्याची संधी दिली तुम्हाला दिली जाणार आहे.  मात्र ही सुविधा केवळ खासगी केंद्रावरच उपलब्ध असेल, जिथे लोकांना लस विकत घ्यावी लागेल. खासगी केंद्रं त्यांच्याकडे लसीकरणाला उपलब्ध असलेल्या लशींची नावं आणि त्यांच्या किमती जाहीर करतील. खासगी केंद्रांवर (Private Centres) उपलब्ध असलेल्या लशी आणि त्यांच्या किमती को-विन पोर्टलवर (Co-WIN Portal) दिसतील. त्यामुळे लसीकरण करू इच्छिणाऱ्यांना लस सहजपणे निवडता येईल.  तसंच पहिला डोस ज्या लशीचा घेतला, त्याच लशीचा दुसरा डोस दिला जाईल.'

हे वाचा - 1 मेपासून सुरू होणारं लसीकरण केवळ नावापुरतं! या आठ राज्यांनी केले हात वर

एक मेपासून लस उत्पादक कंपन्या त्यांच्या उत्पादनापैकी 50 टक्के साठा थेट राज्य सरकार आणि खासगी हॉस्पिटल्सना विकू शकतात. तसंच उर्वरित 50 टक्के लशींचा साठा केंद्र सरकारला पाठवणं त्यांना बंधनकारक असणार आहे. केंद्राला पाठवला जाणारा लशी 45 वर्षांवरच्या सध्या सुरू असलेल्या लसीकरण कार्यक्रमासाठी वापरला जाणार आहे.

सध्याच्या लसीकरण मोहिमेत सरकारी केंद्रांवर लशी मोफत देण्यात येत असून, खासगी केंद्रांमध्ये प्रत्येकी 250 रुपये मोजावे लागत आहेत. 18 ते 45 वयोगटातल्या व्यक्तींना लशी विकत घ्याव्या लागणार असून, अनेक राज्यांनी त्यांनाही लशी मोफत देण्याची घोषणा केली आहे. तरीही खासगी केंद्रांमध्ये लस घेणाऱ्यांना ती विकतच घ्यावी लागणार आहे. कोविशिल्ड लस बनवणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटने राज्य सरकारसाठी एका डोसची किंमत 300 रुपये जाहीर केली असून, खासगी हॉस्पिटल्ससाठी ती 600 रुपये ठरवण्यात आली आहे. कोव्हॅक्सिन लस बनवणाऱ्या भारत बायोटेकने राज्य सरकारांसाठी प्रति डोस 400 रुपये, तर खासगी हॉस्पिटल्ससाठी प्रति डोस 1200 रुपये एवढी किंमत जाहीर केली आहे.

18 वर्षांवरच्या व्यक्तींची लसीकरणासाठीची नोंदणी को-विन पोर्टलवर 28 एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून सुरू झाली. तेव्हापासून शुक्रवारी (30 एप्रिल) सकाळपर्यंत या वयोगटातल्या 2.45 कोटी जणांनी या पोर्टलवर नोंदणी केली आहे, अशी माहिती आर. एस. शर्मा यांनी दिली. दरम्यान, नोंदणी झाली असली तरी राज्यांकडे लशीचा पुरेसा साठा असल्याशिवाय हा लसीकरण कार्यक्रम सुरू होणार नाही. महाराष्ट्रासह किमान आठ राज्यांनी एक मेपासून या वयोगटातल्या व्यक्तींना लसीकरण करता येणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

'45 वर्षांवरच्या व्यक्तींचा लसीकरण कार्यक्रम पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे. राज्याराज्यांतल्या लशीच्या उपलब्धतेनुसार 18 ते 44 वयोगटातल्या व्यक्तींचं लसीकरण त्या त्या राज्यात सुरू होईल,' असं शर्मा यांनी स्पष्ट केलं.

हे वाचा - पुन्हा Bhilwara Model ची चर्चा! मोठ्या शहरांना जमलं नाही ते या छोट्या शहरात घडलं

एक मेपूर्वी नोंदणी सुरू करणं किंवा सर्व राज्यं आणि हॉस्पिटल्समध्ये लशीचा पुरेसा साठा होण्याची वाट पाहायची, असे दोन पर्याय होते. मात्र केंद्र सरकारने पहिला पर्याय निवडला. कारण भारतासारख्या मोठ्या देशात एकाच वेळी सगळीकडे पुरेसा लस साठा होणं अवघड होतं, असं शर्मा यांनी स्पष्ट केलं.

'काही राज्यं आणि काही हॉस्पिटल्स एक मेपासून लसीकरण सुरू करू शकतील, अशी अपेक्षा आहे; मात्र उद्यापासून एकाच वेळी देशभरात सगळीकडच्या लोकांना लस मिळू शकणार नाही. राज्यं आणि खासगी केंद्रांना लशीचा पुरवठा होत जाईल, त्यानुसार ते कार्यक्रम सुरू करतील,' असं शर्मा यांनी सांगितलं.

पोर्टलवर नोंदणी केल्यानुसार लसीकरणाचा प्राधान्यक्रम ठरवला जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 'तुम्ही लस घेण्यासाठी अपॉइंटमेंटचा दिवस आणि वेळेचा स्लॉट निवडला असेल आणि तुम्हाला तो सिस्टीमकडून दिला गेला, तर तुम्हाला त्या स्लॉटलाच लस मिळेल,' असं त्यांनी सांगितलं.

को-विन पोर्टलवर नोंदणी करणं आणि लस घेण्यासाठी अपॉइंटमेंट घेणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, असं शर्मा यांनी आधीच्या मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. आपलं नाव, ओळखपत्र आणि जन्मसाल ही माहिती देऊन नोंदणी करता येते. मोबाइल नंबरवर ओटीपी येऊन ही माहिती व्हेरिफाय केली जाते. त्यानंतर नोंदणी पूर्ण होते. नोंदणी केल्यानंतर आपण आपला पिनकोड टाकून किंवा जिल्ह्याचं नाव टाकून जवळचं लसीकरण केंद्र निवडून त्यात लस घेण्यासाठी आपल्या सोयीच्या वेळेचा स्लॉट निवडायचा आहे.

18 ते 44 या वयोगटातल्या व्यक्तींना थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस मिळणार नाही. त्यांनी पोर्टलवर नोंदणी करणं बंधनकारक आहे, असंही सरकारने आधीच स्पष्ट केलं आहे.

हे वाचा - अशी परिस्थिती देशात फक्त एकट्या मुंबईत; BMC ने जारी केली कोरोनाची आकडेवारी

16 जानेवारीपासून सुरू झालेल्या देशव्यापी लसीकरणाचा हा तिसरा टप्पा आहे. सध्या कोरोना संसर्गाची तीव्रता आणि वेग वाढलेला असल्यामुळे कोरोना लसीकरणासाठीही लोकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ती होतही आहे. म्हणूनच तरुणांच्या वयोगटासाठी ऑनलाइन नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे.

First published:

Tags: Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus