मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /बापरे! 100 टक्के लसीकरण होऊनही इस्रायलमध्ये कोरोनाचा कहर, जगासमोर नवं आव्हान

बापरे! 100 टक्के लसीकरण होऊनही इस्रायलमध्ये कोरोनाचा कहर, जगासमोर नवं आव्हान

कोरोनामुक्त (Corona Free)  होणारा जगातील पहिला देश (First in the world) असा लौकिक मिळवणारा इस्रायल (Israel) सध्या कोरोनाचा एक हॉटस्पॉट (Hotspot) झाला आहे.

कोरोनामुक्त (Corona Free) होणारा जगातील पहिला देश (First in the world) असा लौकिक मिळवणारा इस्रायल (Israel) सध्या कोरोनाचा एक हॉटस्पॉट (Hotspot) झाला आहे.

कोरोनामुक्त (Corona Free) होणारा जगातील पहिला देश (First in the world) असा लौकिक मिळवणारा इस्रायल (Israel) सध्या कोरोनाचा एक हॉटस्पॉट (Hotspot) झाला आहे.

जेरुसलेम, 8 सप्टेंबर : कोरोनामुक्त (Corona Free)  होणारा जगातील पहिला देश (First in the world) असा लौकिक मिळवणारा इस्रायल (Israel) सध्या कोरोनाचा एक हॉटस्पॉट (Hotspot) झाला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून इस्रायलमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ व्हायला सुरुवात झाली असून 2 सप्टेंबरपर्यंत दैनंदिन 11 हजार 316 नवे कोरोना रुग्ण सापडत असल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे डेल्टा व्हायरस हा किती भयंकर आहे, ही बाब सिद्ध होत असून लसीकरण झालेल्या नागरिकांना कोरोनाची लागण होत असल्याचं सिद्ध झालं आहे.

लसीकरण होऊनही डेल्टाचा प्रभाव

इस्रायलमधील नागरिकांना कोरोनाची लागण होणं, ही नवी बाब नसली, तरी सध्याच्या लसींचा नव्या डेल्टा व्हेरियंटला रोखण्यासाठी उपयोग होत नसल्याचं यातून दिसून येत आहे. इस्रायलमध्ये 100 टक्के लसीकरण पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. इस्रायलच्या 90 लाख लोकसंख्येला प्रत्येकी 2 डोस देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तरीदेखील इतक्या मोठ्या संख्येनं कोरोनाची लागण होत असेल, तर सध्याच्या लसी नव्या व्हेरियंटसाठी प्रभावी नसल्याचंच सिद्ध होतंय, असा दावा शास्त्रज्ञ करत आहेत.

तिसऱ्या डोसला सुरुवात

इस्रायलमधील सर्व नागरिकांना दोन डोस देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता तिसरा डोस देण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. दुसऱ्या डोसची परिणामकारकता साधारण 7 ते 8 महिने राहत असून त्यानंतर अँटिबॉडिजची संख्या कमी व्हायला सुरुवात होत असल्यामुळे आता तिसरा डोस द्यायला सुरुवात झाली आहे. इस्रायलमध्ये दैनंदिन 10 लाख नागरिकांना कोरोना लसीचे डोस दिले जात असून लवकरच ही प्रक्रियादेखील पूर्ण होईल, असं सांगण्यात आलं आहे.

हे वाचा - एकाच कुटुंबातील तिघांना सर्पदंश; 2 चिमुकल्यांनी सोडला प्राण, आईची मृत्यूशी झुंज

लहान मुलांवर परिणाम

इस्रायलमध्ये लहान मुलांचं लसीकरणदेखील सुरू आहे. लस घेतलेल्या लहान मुलांनाही कोरोनाची लागण होत असल्याची उदाहरणं दिसून आली आहेत. त्यामुळे 100 टक्के लसीकरण झालेल्या देशातही जर कोरोनाचा नवा व्हेरियंट एवढा धुमाकूळ घालत असेल, तर इतर देशांमध्ये काय परिस्थिती उद्भवू शकते, याचा विचारही न केलेला बरा, अशी भावना सामान्यांमधून व्यक्त होत आहे.

First published:
top videos