मराठी बातम्या /बातम्या /explainer /WATER | पृथ्वीवर पाणी आलं कुठून? जपानमध्ये झालेल्या संशोधनात धक्कादायक माहिती समोर!

WATER | पृथ्वीवर पाणी आलं कुठून? जपानमध्ये झालेल्या संशोधनात धक्कादायक माहिती समोर!

पृथ्वी (Earth) हा एकमेव ग्रह आहे जिथे द्रव पाणी (Water) मुबलक प्रमाणात आहे. हे पाणी पृथ्वीवर कुठून आले यावर अनेक मतप्रवाह आहेत. अलीकडील अभ्यासातून नवीन माहिती समोर आली आहे.

पृथ्वी (Earth) हा एकमेव ग्रह आहे जिथे द्रव पाणी (Water) मुबलक प्रमाणात आहे. हे पाणी पृथ्वीवर कुठून आले यावर अनेक मतप्रवाह आहेत. अलीकडील अभ्यासातून नवीन माहिती समोर आली आहे.

पृथ्वी (Earth) हा एकमेव ग्रह आहे जिथे द्रव पाणी (Water) मुबलक प्रमाणात आहे. हे पाणी पृथ्वीवर कुठून आले यावर अनेक मतप्रवाह आहेत. अलीकडील अभ्यासातून नवीन माहिती समोर आली आहे.

मुंबई, 2 डिसेंबर : पाण्यापासूनच या भूतलावावर जिवांची निर्मित झाल्याचं तुम्ही ऐकलं किंवा वाचलं असेल. पण, पृथ्वीवरील पाणी (Water on Earth) आलं कुठून? हा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? या विषयावर अनेक संशोधने झाली आहेत. यात गंमत अशी की कधी पृथ्वीवर पाणी अंतराळातून आलेल्या लघुग्रह आणि उल्कापिंडातून आल्याचे सांगण्यात आले, तर कधी असेही म्हटले गेले की पाणी पृथ्वीवरच निर्माण झाले आणि सुरुवातीपासून इथंच राहिले. यातील बहुतांश संशोधन हे पृथ्वीवर पडलेल्या उल्का आणि लघुग्रहांच्या तुकड्यांवर करण्यात आलेलं आहे. नवीन अभ्यासामध्ये जपानच्या 2010 च्या हायाबुसा मोहिमेतून (Hayabusa Mission) मिळालेल्या प्राचीन लघुग्रहाच्या नमुन्याचे विश्लेषण करण्यात आले. या अभ्यासात पृथ्वीवरील पाणी हे अवकाशातील धुळीच्या कणांपासून (Dust Particles) आले आहे, ज्यामुळे ग्रहांची निर्मिती झाली आहे.

सौर वाऱ्याची भूमिका

यूके, ऑस्ट्रेलिया आणि यूएस मधील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की सूर्यापासून येणारा सुर्यापासून निघालेल्या वाऱ्यामुळे अंतराळातील धुळीच्या कणांची रासायनिक रचना बदलते. ज्यामुळे या धूलिकणांमध्ये पाण्याचे अनु तयार होता.

महासागरात इतकं पाणी?

शास्त्रज्ञ या प्रक्रियेला स्पेस वेदरिंग म्हणतात. नेचर अॅस्ट्रॉनॉमी या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात शास्त्रज्ञांनी सांगितले आहे की, लघुग्रहांसारख्या स्रोतातील सामग्रीचे मिश्रण करून पृथ्वीच्या महासागरांमध्ये पाण्याची रचना तयार करणे हे अत्यंत आव्हानात्मक काम आहे. परंतु, सौर वारे या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतात.

वेस्टर्न डिस्टर्बन्स काय आहे? देशातील मुसळधार पाऊस आणि थंडीमागे हे आहे कारण?

सिद्धांत काय सांगतात?

पृथ्वीच्या महासागरात इतके पाणी कसे आले हे जाणून घेण्याची शास्त्रज्ञांना फार पूर्वीपासून इच्छा होती. काही सिद्धांतांनी असे सुचवले आहे की हे 4.6 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर आदळलेल्या लघुग्रहांमुळे इतकं पाणी तयार झालं असावं. पृथ्वीवरील काही पाणी ‘सी’ प्रकारच्या लघुग्रहातून आल्याचे संशोधकांचे मत आहे.

बहुत उपयोगी होगी यह पड़ताल

संशोधकांचा असाही विश्वास आहे की पृथ्वीवरील पाणी हे सौरमालेत इतरत्र असलेल्या अन्य सौम्य समस्थानिक स्त्रोतातून आले असावे. नवीन तपासणीमुळे पृथ्वीवर पाण्याचे आगमन आणि पृष्ठभागाच्या आजूबाजूला असलेल्या मोठ्या प्रमाणातील अनेक रहस्ये देखील उघड होतील. या अभ्यासाचे परिणाम वायुविहीन ग्रहांवर पाणी शोधण्यासाठी भविष्यातील अंतराळ मोहिमांमध्ये उपयुक्त ठरतील, अशी आशाही शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत.

अंतराळातील खडकाच्या नमुन्यांचा अभ्यास

ग्लासगो विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय पथकाने अणू प्रोब टोमोग्राफीचा वापर करून विविध प्रकारच्या अवकाश खडकांच्या नमुन्यांचा अभ्यास केला. या खडकांना S प्रकारातील लघुग्रह म्हणतात, जे C प्रकारच्या लघुग्रहांपेक्षा जवळ राहून सूर्याभोवती फिरतात.

Aids | एचआयव्ही मानवामध्ये पसरण्याचं खरं कारण कोणत? चिंपांझी की समलिंगी संबंध?

नमुन्यांमधील पाण्याचे रेणू

हे नमुने इटोकावा लघुग्रहाचे असून त्यांचे विश्लेषण करण्यात आलं आहे. शास्त्रज्ञांनी एका वेळी एका अणूच्या आण्विक संरचनेचा अभ्यास केला तेव्हा असे आढळून आले की त्यांच्यात पाण्याचे रेणू आहेत. या अभ्यासाचे प्रमुख लेखक, डॉ. ल्यूक डेले यांनी, पाण्याचे हे रेणू त्यांच्यात कसे पोहोचले किंवा तयार झाले हे स्पष्ट केलं.

डॉ. डेले म्हणाले की सूर्याकडून येणारे हायड्रोजन आयन हवेशिवाय लघुग्रहासह अंतराळात असलेल्या धुळीशी आदळले आणि पदार्थाच्या आत गेले आणि त्यांच्या रासायनिक रचनेवर परिणाम झाला. यामुळे हायड्रोजन आयनची हळूहळू ऑक्सिजन रेणूंशी प्रतिक्रिया झाली, जे खडक आणि धूळ यांच्या आत पाण्याचे रेणू तयार करतात, जे लघुग्रहांच्या खनिजांमध्ये लपलेले होते. ही धूळ सौरवारे आणि लघुग्रहांसह पृथ्वीवर आल्याने पाण्याची निर्मिती झाली.

First published:

Tags: Earth, Freshwater, Water