मराठी बातम्या /बातम्या /explainer /HIV Aids | एचआयव्ही मानवामध्ये पसरण्याचं खरं कारण कोणत? चिंपांझी की समलिंगी संबंध?

HIV Aids | एचआयव्ही मानवामध्ये पसरण्याचं खरं कारण कोणत? चिंपांझी की समलिंगी संबंध?

एचआयव्ही एड्स (HIV Aids) हा एक असा आजार आहे, ज्यावर कोणतेही उपचार नाहीत. एड्स दिन 2021 (Aids Day 2021) लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. हा 1988 पासून दरवर्षी 1 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. हा असाध्य रोग मुळापासून नष्ट करणे हाच लोकांना जागरूक करण्याचा हेतू आहे. हा आजार कसा पसरला याबद्दल दोन वेगवेगळ्या तर्क सांगितले जातात.

पुढे वाचा ...

मुंबई, 1 डिसेंबर : एड्स (World Aids Day 2021) हा एक असाध्य रोग आहे. याला आळा घालण्यासाठी जनजागृती हाच एकमेव उपाय आहे. या जीवघेण्या आजारापासून लोकांना वाचवण्यासाठी 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो. पूर्वी या आजाराबाबत लोकांच्या मनात अनेक गैरसमज होते. पण आता या आजाराशी संबंधित अनेक गैरसमज लोकांच्या मनातून दूर झाले आहेत. मात्र, मागासलेल्या देशांबद्दल बोलायचे झाले तर या देशांची परिस्थिती अजून सुधारलेली नाही. माणसापासून माणसात पसरणारा हा आजार जगात पहिल्यांदा कसा पसरला (How Aids Was Spread) हे जाणून तुम्ही थक्क व्हाल.

एड्स कसा पसरतो हे आता बहुतेक लोकांना माहित आहे. यात असुरक्षित लैंगिक संबंध, एचआयव्हीचा विषाणू संक्रमित रक्त किंवा इंजेक्शननेही पसरतो. पण, हा विषाणू पहिल्यांदा मानवांमध्ये कसा पसरला? हे मात्र अनेकांना माहित नाही. या संदर्भात दोन तर्क सांगितले जातात.

एड्सबद्दल संयुक्त राष्ट्रांचा जगाला इशारा! ...तर परिस्थिती बिकट होईल

चिंपांझीमुळे मानव संक्रमित

एड्सचा प्रसार सर्वप्रथम चिंपांझींद्वारे मानवांमध्ये झाला. एचआयव्ही हा एक धोकादायक विषाणू असून तो पहिल्यांदा चिंपांझीमध्ये आढळला होता. पण प्रश्न पडतो की जर हा विषाणू चिंपांझीमध्ये होता तर तो मनुष्यात कसा आला? एचआयव्ही बाधित चिंपांझी 1920 मध्ये काँगोच्या कॅमेरोनियन जंगलात सापडला होता. 1920 मध्ये या चिंपांझीने जंगलात शिकार करायला गेलेल्या माणसावर हल्ला केला. शिकारीने आधी चिंपांझीला जखमी केलं होतं. त्यावेळी चिंपांझीनेही शिकाऱ्यावर हल्ला केला. अशा प्रकारे दोघांचे रक्त मिसळले आणि हा विषाणू चिंपांझीपासून माणसात पसरल्याचे सांगितले जाते.

ही कथा चुकीची असल्याचे यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनचा (Centre For Disease And Prevention) अहवालाने सांगितले आहे. त्यांच्या मते समलिंगी जोडप्यामुळे एड्सचा प्रसार जगात झाला. अहवालानुसार, 1981 मध्ये अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये 5 तरुणांना या विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले. ते एकमेकांशी संबंध ठेवत असल्याने हा आजार पसरला. दुसरीकडे एड्सच्या पहिल्या नोंदवलेल्या केसबद्दल बोलायचे झाले तर गॅटन दुगोसचे नाव पेशंट झिरोमध्ये नोंदवले गेले आहे. फ्लाइट अटेंडंट गेटन हा एचआयव्हीचा पहिला रुग्ण असल्याचे मानले जाते. त्याने अनेक लोकांशी संबंध ठेवून हा विषाणू पसरवला होता.

समलिंगी संबंध

आता आपण त्या व्यक्तीबद्दल जाणून घेऊ ज्याला एचआयव्हीचा पहिला रुग्ण म्हटले जाते. त्याचं नाव गॅटन दुगोस (Gaëtan Dugas) होते. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या अहवालानुसार एड्स पसरवण्यात या समलिंगी व्यक्तीचा हात आहे. गॅटन हा कॅनडाचा फ्लाइट अटेंडंट होता. गॅटन हा समलिंगी होता आणि त्याने मुद्दाम अनेक लोकांपर्यंत हा आजार पसरवला. आपल्याला एड्स नावाचा गंभीर आजार झाला असून यावर कोणतेही उपाचार नसल्याचे गॅटनला समजले होते. तरीही त्याने अनेकांशी संबंध ठेऊन हा आजार पसरवला. गॅटन दुगोस याला पेशंट झिरो असेही म्हणतात.

सुरुवातीला पुरुषांमध्ये जास्त पसरला

मी तुम्हाला एड्सशी संबंधित आणखी एक खास गोष्ट सांगतो. अमेरिकेत जेव्हा लोकांना या आजाराची माहिती मिळाली तेव्हा लोकांना आश्चर्य वाटले. पुढील आठ वर्षांपर्यंत, हा रोग पहिल्यांदा उदयास आला तेव्हापासून सुमारे 92 टक्के एचआयव्ही पॉझिटिव्ह लोक पुरुष होते. केवळ आठ टक्के महिलांना या असाध्य आजाराने ग्रासले होते. हळूहळू त्यांची संख्या वाढत गेली.

First published:
top videos

    Tags: Corona, Rare disease, Virus