मराठी बातम्या /बातम्या /explainer /वेस्टर्न डिस्टर्बन्स काय आहे? देशातील मुसळधार पाऊस आणि थंडीमागे हे आहे कारण?

वेस्टर्न डिस्टर्बन्स काय आहे? देशातील मुसळधार पाऊस आणि थंडीमागे हे आहे कारण?

गेल्या काही दिवसांपासून देशात अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (Rain) पडत असल्याच्या आणि पूर आल्याच्या बातम्या येत आहोत. नोव्हेंबर, डिसेंबर महिने हे खरं तर थंडीचे महिने; पण या महिन्यांत पाऊस पडू लागल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशात अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (Rain) पडत असल्याच्या आणि पूर आल्याच्या बातम्या येत आहोत. नोव्हेंबर, डिसेंबर महिने हे खरं तर थंडीचे महिने; पण या महिन्यांत पाऊस पडू लागल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशात अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (Rain) पडत असल्याच्या आणि पूर आल्याच्या बातम्या येत आहोत. नोव्हेंबर, डिसेंबर महिने हे खरं तर थंडीचे महिने; पण या महिन्यांत पाऊस पडू लागल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.

  नवी दिल्ली, 1 डिसेंबर : गेल्या काही दिवसांपासून देशात अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (Rain) पडत असल्याच्या आणि पूर आल्याच्या बातम्या येत आहोत. नोव्हेंबर, डिसेंबर महिने हे खरं तर थंडीचे महिने; पण या महिन्यांत पाऊस पडू लागल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) आणि तमिळनाडूमध्ये (Tamilnadu) मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत केलं असून, अनेक ठिकाणी पूर आले आहेत.

  तापमानातही प्रचंड घट झाल्यानं थंडीचा कडकाही वाढला आहे. यामुळे आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान होत असल्यानं शेतकरी वर्गही चिंताग्रस्त झाला आहे. अचानक असा पाऊस पडण्यामागे काय कारण आहे, असा प्रश्न लोकांना भेडसावत असून ही परिस्थिती कधी बदलणार, आणखी किती दिवस हा पाऊस पडणार असे प्रश्न विचारले जात आहेत. हवामान खात्याने (IMD) या प्रश्नांचं उत्तर दिले असून, पुढील काही दिवसांतल्या हवामानाच्या स्थितीचा अंदाजही वर्तवला आहे. 'टीव्ही 9 हिंदी'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

  वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे (Western Disturbances) हा पाऊस पडत असल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे. आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूनंतर 1 ते 6 डिसेंबरदरम्यान राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर भारतातही जोरदार पावसाची शक्यता आहे. 2 ते 3 डिसेंबर रोजी वेस्टर्न डिस्टर्बन्स देशात धडकण्याची शक्यता असल्यानं हा पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. गुजरात, कोकण आणि महाराष्ट्रातही 1 आणि 2 डिसेंबरच्या रात्री पाऊस पडू शकतो. असा अंदाजही शास्त्रज्ञांनी वर्तवला होता. तो खरा ठरल्याचं राज्यातल्या आजच्या हवामानावरून स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडत असल्याचं वृत्त आहे. मंगळवारनंतरच (7 डिसेंबर) दक्षिण भारतातल्या राज्यांमध्ये पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं. याशिवाय ईशान्येकडच्या राज्यांमध्ये 5 आणि 6 डिसेंबरला पावसासह अनेक भागात बर्फवृष्टी होऊ शकते. त्याचबरोबर गंगेच्या पठारी भागात यामुळे थंडीची लाट (Chill Wave) येऊन दाट धुकं (Dense Fog) पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान खात्याचे शास्त्रज्ञ आरके जेनामानी यांनी दिली.

  या सगळ्या परिस्थितीला कारणीभूत ठरणारा वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजे नेमकं काय असतं, याबाबत हवामान खात्याच्या तज्ज्ञांनी माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा देशातलं हवामान बदलते तेव्हा भूमध्य समुद्र, कॅस्पियन आणि लाल समुद्रावर हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं. या दाबामुळे समुद्रातल्या आर्द्रतेसोबत हवा फिरू लागते. वाऱ्याची दिशा असेल, त्याच दिशेला हा डिस्टर्बन्स निर्माण होतो. ही दिशा समजून घेऊन, हवामानशास्त्रज्ञ वेस्टर्न डिस्टर्बन्सचा अंदाज वर्तवतात. या वर्षी 2 ते 3 डिसेंबरदरम्यान वेस्टर्न डिस्टर्बन्स येऊ शकतो, असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त वर्तवला आहे.

  हे ही वाचा-कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस; 17 जिल्ह्यांना अलर्ट, मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा

  सध्या या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम उत्तर आणि मध्य भारतात होणार आहे. म्हणजेच वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांतली आर्द्रता आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या दाबामुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पाऊस पडू शकतो. पश्चिमेकडच्या वाऱ्यांमुळे (West Winds) हा बिगरमान्सून पाऊस होत आहे. उन्हाळ्यातल्या पावसासाठी दक्षिणेकडून येणारे वारे कारणीभूत असतात. त्यामुळे उन्हाळा आणि हिवाळ्यात पडणाऱ्या पावसाची कारणंही वेगळी असतात. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे मुसळधार पाऊस पडतो. त्याचा थेट परिणाम पिकांवर होतो. भूस्खलन, पूर आणि हिमस्खलनाच्या घटना घडू शकतात. तसंच यामुळे थंडीची लाट येऊ शकते. दाट धुकंही पडू शकतं. अनेक दिवस ही स्थिती राहू शकते, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

  First published:
  top videos

   Tags: Rain, Rainfall