मुंबई, 6 डिसेंबर : बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांनी त्यांच्या “द बुद्ध अँड हिज धम्म” या पुस्तकाच्या भूमिकेत एका महिलेचं कौतुक करताना लिहिले आहे की, “तिने माझे वय किमान 10 वर्षांनी वाढवलं आहे”. याच महिलेवर नंतर आंबेडकरवादी लोकांनी आपल्या नेत्याचं निधन ही हत्या असून त्याला ही महिला जबाबदार असल्याचा आरोप केला होता. ही महिला दुसरी कोणी नसून डॉ. आंबेडकरांची दुसरी पत्नी डॉ. सविता होती. ज्याच्या लग्नामुळे आंबेडकरांच्या कुटुंबीयांनाच नव्हे तर त्यांच्या अनेक चाहत्यांनाही राग आला होता. आंबेडकरांच्या मृत्यूनंतर त्यांचं जीवन प्रत्यक्षात कसं गेलं?
आंबेडकरवाद्यांनी डॉ. सविता यांच्यावर आरोप केला तेव्हा जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते. आंबेडकर कुटुंबीय आणि त्यांच्या अनेक अनुयायांच्या मागणीवरून केंद्र सरकारने याची चौकशी केली. मात्र, चौकशीअंती सविता यांना क्लीन चिट देण्यात आली. नंतर काँग्रेसने त्यांना राज्यसभा सदस्यत्वासाठी अनेकवेळा निमंत्रण दिले पण त्यांनी नम्रपणे नकार दिला.
डॉ. आंबेडकरांची दुसरी पत्नी ब्राह्मण कुटुंबातील होती
डॉ. सविता भीमराव आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रातील कुलीन ब्राह्मण कुटुंबात झाला. त्या डॉक्टर होत्या. बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नी झाल्या. जेव्हा आंबेडकरांनी त्यांच्याशी विवाह केला तेव्हा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाच नव्हे तर अनेक अनुयायीही खूप संतापले होते. बाबासाहेब ज्या उच्चवर्णीयांच्या विरोधात सातत्याने संघर्षाचे बिगुल वाजवत होते, त्यांनी त्याच वर्गातील स्त्रीशी लग्न का केले, हे आंबेडकरवाद्यांना समजले नाही.
6 डिसेंबरच्या रात्री काय घडले?
6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचा मृत्यू झाला त्या दिवशी सविता आंबेडकरांसोबत दिल्लीत होत्या. खरं तर दिवसभरात सगळं ठीक होतं. बाबासाहेब एक दिवस अगोदर 5 डिसेंबरच्या संध्याकाळी काही पाहुण्यांना भेटले. त्यानंतर त्यांनी डोकं दुखत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्या मदतनिसाने त्यांचं डोकं चेपून दिलं. जेवण केल्यानंतर आवडते गाणंही गुणगुणत होते. झोपण्यापूर्वी कोणतंतरी पुस्तक वाचत होते. सकाळी पलंगावर ते मृतावस्थेत मिळाले.
कदाचित रात्री झोपताना किंवा पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला असावा. आंबेडकरांना मानणाऱ्या लोकांच्या एका वर्गाने त्यांच्या मृत्यूकडे संशयाने पाहिले. हा मृत्यू नैसर्गिक नसून कटातून झाल्याचा आरोप त्यांनी केला. सविता आंबेडकर यांना लक्ष्य केलं होतं.
महामानवाला अभिवादन करण्यासाठी समीर वानखेडे चैत्यभूमीवर, पण नवाब मलिक म्हणतात..
सविता यांना माई किंवा मेम साहेब म्हणत
जेव्हा सविता माईंनी बाबासाहेबांशी लग्न केलं तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत खूप दिवसांपासून चालवलेल्या चळवळीत उडी घेतली. त्या समाजसेविका होत्याच पण, एक आश्वासक डॉक्टरही. बाबासाहेबांसोबतच त्यांनी बौद्ध धर्मही स्वीकारला. आंबेडकरांचे अनुयायी आणि बौद्ध त्यांना माई किंवा मेम साहेब म्हणत.
डॉ.आंबेडकरांनी अनेक पुस्तके लिहिली असली, तरी "बुद्ध आणि त्यांचा धम्म" लिहिताना त्यांनी सविता माईंचा विशेष उल्लेख केला. केवळ त्यांच्यामुळेच त्यांचे आयुष्य 8-10 वर्षांनी कसे वाढले हे त्यांनी सांगितले.
तेव्हा बायका क्वचितच वैद्यकशास्त्राचा अभ्यास करायच्या
सविता यांचा जन्म 27 जानेवारी 1909 रोजी मुंबईत एका मराठी ब्राह्मण कुटुंबात झाला. तेव्हा फार कमी स्त्रिया शिक्षण घेत असत. अशा स्थितीत त्यांचं शिक्षण नव्हे तर वैद्यकशास्त्रात पदवी घेणे विलक्षण म्हणावे लागेल. स्वातंत्र्यापूर्वीच्या दशकात एमबीबीएस करणे ही मोठी गोष्ट होती. सविता हुशार विद्यार्थिनी होत्या. त्यांनी मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस केले. त्यांचे कुटुंब महाराष्ट्रातील रत्नागिरी येथील एका गावातले होते.
आठ भावंडांपैकी सहा भावांनी आंतरजातीय विवाह केला
त्यांचे कुटुंब बहुधा आधुनिक विचारांचे होते. आठ भावंडांपैकी सहा भावंडांनी आंतरजातीय विवाह केला होता. सविता यांनी स्वतः "डॉ. आंबेडकरांच्या सहवासात" या आत्मचरित्रात लिहिले आहे की, “आमच्या कुटुंबीयांनी भाऊ-बहिणीच्या आंतरजातीय विवाहाला विरोध केला नाही. याचे कारण संपूर्ण कुटुंब सुशिक्षित आणि प्रगतीशील होते.
धर्म कसा बदलला जातो, धार्मिक बदलाने हिंदू होता येतं का? कायदा काय सांगतो?
माझ्याबद्दल चुकीची माहिती पसरवली गेली
फॉरवर्ड प्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात सविता यांनी म्हटले आहे. “डॉ. आंबेडकरांच्या जीवनात मी कसा, कुठे, केव्हा आणि का प्रवेश केला याबद्दल लोकांच्या मनात खूप कुतूहल निर्माण झाले आहे. याबाबत अनेकांकडून दिशाभूल करणाऱ्या गोष्टीही पसरवण्यात आल्या होत्या. डॉ. आंबेडकरांशी त्यांची पहिली भेट मुंबईत त्यांच्या परिचयातील डॉ. एस. एम. राव यांच्या घरी घडली. डॉ.राव यांनीही लंडनमध्ये शिक्षण घेतले. दिल्लीहून मुंबईला आल्यावर आंबेडकर अनेकदा डॉ.रावांच्या घरी जात असत. तेव्हा बाबासाहेब व्हाईसरॉयच्या कार्यकारिणीत कामगार मंत्री होते. पहिल्या भेटीनंतर असे अनेक प्रसंग आले की आंबेडकर सविता यांना भेटले. मग वाढत्या भेटींमुळे जवळीकही वाढली.
डॉ. आंबेडकरांवर उपचार केले
1947 पर्यंत डॉ. आंबेडकरांची प्रकृती ढासळू लागली. सविता ह्याच त्यांच्यावर उपचार करत होत्या. आंबेडकरांची प्रकृती सुधारण्यासाठी त्यांनी खूप काम केले. लोकवाङ्मय गृह प्रकाशन, मुंबई यांनी प्रकाशित केलेलं पुस्तक 'डॉ. बाबासाहेब' यात म्हटलं आहे, की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 16 मार्च 1948 रोजी दादासाहेब गायकवाड यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘सेवेसाठी परिचारिका किंवा घर सांभाळण्यासाठी स्त्री ठेवल्यास लोकांच्या मनात शंका निर्माण होतील. त्यामुळे लग्न करणे हा सर्वात योग्य मार्ग असेल. माझ्या पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आताच्या परिस्थितीत मला माझा निर्धार सोडावा लागणार आहे."
आंबेडकर यांचे सवितासोबत 15 एप्रिल रोजी दिल्लीत दुसरे लग्न
15 एप्रिल 1948 रोजी डॉ. आंबेडकर यांचा विवाह त्यांच्या दिल्लीतील घरी डॉ. सविता कबीर यांच्याशी झाला. तेव्हा बाबासाहेब हार्डिंग अव्हेन्यू (आताचा टिळक पूल) येथे राहत होते. रामेश्वर दयाल यांना दिल्लीचे उपायुक्त विवाहाचे रजिस्ट्रार म्हणून बोलावले होते. हा विवाह नागरी विवाह कायद्यांतर्गत नागरी विवाह म्हणून समारंभपूर्वक केला गेला. यावेळी आंबेकर यांचे जवळचे नातेवाईक वगळता सविताच्या कुटुंबीयांसह अनेकजण उपस्थित होते.
Conversion of religion : धर्म कसा बदलला जातो, धार्मिक बदलाने हिंदू होता येतं का? कायदा काय सांगतो?
लग्नानंतर सवितावर कोणते आरोप होते?
लग्नानंतर डॉ. आंबेडकरांना भेटणे अवघड झाल्याची तक्रार अनेकांनी सुरू केली. त्यांना कोणी भेटायचे आणि कोणी नाही हे डॉक्टर सविता स्वतः ठरवत होत्या. त्यांच्या ब्राह्मण जातीमुळे देखील आंबेडकरांच्या अनुयायांना राग होता. पुढे डॉ. सविता आंबेडकर यांच्यावर अनेक पुस्तके लिहिली गेली, ज्यात त्यांनी केवळ पत्नीचीच नाही तर आंबेडकरांच्या डॉक्टरचीही भूमिका केली असल्याचे सांगण्यात आले.
आंबेडकरांच्या मृत्यूनंतर
आंबेडकरांच्या मृत्यूनंतर सविता दिल्लीतच फार्म हाऊसमध्ये राहू लागल्या. आंबेडकरांच्या घराण्याशी त्यांचे संबंध नेहमीच तणावाचे होते. वरून आंबेडकरांच्या मृत्यूबाबत निष्काळजीपणाचा आरोप केला गेला. आंबेडकर अनुयायांच्या प्रचंड दबावाखाली तत्कालीन पंतप्रधान नेहरूंनी तपास सुरू केला. मात्र, तपासात हा नैसर्गिक मृत्यू असल्याचा निष्कर्ष निघाला.
राज्यसभेत येण्याची ऑफर मिळाली
नंतर जवाहरलाल नेहरू आणि नंतर इंदिरा गांधी या दोघांनीही त्यांना राज्यसभेवर येण्याचे आमंत्रण दिले. मात्र, त्यांनी नम्रपणे नकार दिला. भारत सरकारने आंबेडकरांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान "भारतरत्न" देऊन सन्मानित केलं. तर डॉ. आंबेडकरांच्या पत्नीला हा सन्मान 14 एप्रिल 1990 रोजी मिळाला. दिल्लीत आंबेडकरांशी संबंधित अनेक उपक्रमांमध्ये त्या सक्रिय होत्या. राजकीय कार्यांपासून त्यांनी स्वत:ला दूर केले असले तरी नंतर त्यांनी मुंबईत जाऊन राजकीयदृष्ट्या सक्रिय होण्याचा प्रयत्न केला.
नेहरूंनी मोठी नोकरी देण्याची ऑफरही दिली होती
सविता यांनी "डॉ. आंबेडकराच्या सहवासात" नावाचे आत्मचरित्र लिहिले. ते मराठीत प्रकाशित झाले. मग त्याचे हिंदी आणि इंग्रजीत भाषांतरही झाले. त्यात त्यांनी लिहिले की, "डॉ. आंबेडकरांच्या परिनिर्वाणानंतर मला पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सरकारी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून नोकरी द्या आणि राज्यसभेत या, असे सांगितले होतं. पण, मी स्वेच्छेने नकार दिला. त्याचं कारण म्हणजे बाबासाहेबांनी मला कोणत्याही प्रकारच्या नोकरीपासून दूर राहण्यास सांगितले होते. मग राज्यसभेचे सदस्यत्व स्वीकारणे म्हणजे काँग्रेसच्या इच्छेनुसार वागण्यासाठी स्वतःला तयार करणे, जे मला नको होते. हे सर्व स्वीकारणे म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांच्या विरोधात जाणे होते.
मी जगेन तर आंबेडकरांच्या नावाने, मरेन तर याच नावाने
त्यांनी पुढे लिहिले की, "साहेबांनी मला स्वीकारले. मी आंबेडकर माई झाले. मी त्यांना नेहमीच पाठिंबा दिला. गेली 36 वर्षे मी विधवेचे जीवन जगत आहे, तेही आंबेडकरांचे नाव घेऊन. मी आंबेडकरांच्या नावाने जगत आहे आणि याच नावाने मरणार आहे. 19 एप्रिल 2003 रोजी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 29 मे 2003 रोजी त्यांचं निधन झालं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Prakash ambedkar