मुंबई, 8 एप्रिल: भारतात कोरोना संसर्गाची (Coronavirus second wave Maharashtra updates) दुसरी लाट जास्त घातक ठरताना दिसत आहे. काही राज्यांमध्ये संसर्गाची स्थिती नियंत्रणात असली तरी काही राज्यांमध्ये मात्र स्फोटक स्थिती निर्माण झाली असून ही बाब चिंताजनक ठरत आहे. त्यामुळे असा प्रश्न निर्माण होतो की या राज्यांमध्ये अशी काय कारणं आहे की तेथील स्थिती चिंताजनक बनलीय. महाराष्ट्र (Coronavirus Maharashtra Updates) हे त्यापैकीच एक राज्य असून येथे दोन्ही लाटांदरम्यान स्थिती चिंताजनक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यातच येथे सध्या दुसऱ्या लाटेमुळे स्थिती अधिकच स्फोटक झाली आहे.
8 राज्यांमध्ये सर्वाधिक केसेस
तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात, केरळ आणि पंजाबमध्ये संसर्गाचा वेग जास्त नाही. परंतु छत्तीसगड सारख्या राज्यात संसर्गाचा वेग चिंता वाढवणारा आहे. देशातील सुमारे 80 ते 90 टक्के संसर्ग हा केवळ 8 राज्यांमध्ये दिसून येत आहे. केंद्र सरकारने स्थितीची पाहणी करण्याकरिता एक पथक महाराष्ट्र,पंजाब आणि छत्तीसगड राज्यात पाठवले आहे. महाराष्ट्रात रात्रीचा कर्फ्यू (Night Curfew)आणि आठवडाखेर लॉकडाऊन (Weekend Lockdown)लावण्यात आलेला आहे. सार्वजनिक ठिकाणी कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत.
'जे अनुभवलं त्यामुळे अजून झोप लागत नाही..', BKC कोव्हिड सेंटरचं भयाण वास्तव?
महाराष्ट्रातच अशी स्थिती का?
निवडणुका सुरु असलेल्या राज्यांमध्ये किंवा धार्मिक कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर जमाव होत असलेल्या राज्यांमध्ये कोरोनाचा तितकासा संसर्ग वेगाने पसरत नसताना महाराष्ट्रातच वेगाने संसर्ग का फैलावतोय हा प्रश्न सध्या अनेकांना पडलाय. त्यावर संशोधक,अभ्यासकांनी काही कारणं सांगितलं आहेत.
काय कारणे असू शकतात?
एवढ्या वेगानं संसर्ग फैलावण्याचे कारण शोधण्यासाठी सविस्तर संशोधन आणि आकडेवारीचं विश्लेषण आवश्यक असतं. त्यानंतर काही कारणं स्पष्ट होऊ शकतात. किंबहुना काही अस्पष्ट देखील राहतात. देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यांपैकी महाराष्ट्र हे एक प्रमुख राज्य आहे.
संसर्ग पसरण्यासाठी मुंबई हे कसे योग्य आहे?
मुंबई हे देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. एकट्या मुंबईत झोपडपट्टया आणि कमी अर्थिक उत्पन्न असलेल्या भागात सर्वाधिक गर्दी पाहयला मिळते.
एकीकडे लसीकरण बंद, दुसरीकडे उपचारांसाठी ICU बेडही नाहीत; मुंबईत भयंकर परिस्थिती
या शहरात जग तसेच देशभरातून लाखो प्रवासी येत असतात. शहराची जीवनरेखा समजल्या जाणाऱ्या मेट्रोतून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे ही स्थिती या भागात संसर्ग पसरण्यास सहाय्यक ठरते.
महाराष्ट्राची अशी आहे स्थिती
महाराष्ट्रातील शहरी भागात लोकसंख्या घनता,प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या ही देशातील पूर्व आणि केंद्रशासित राज्यांच्या तुलनेत खूप जास्त आहे. उद्योग क्षेत्रात लोकांची खूप गर्दी पाहयला मिळते.
Shocking Video: Remdesivir इंजेक्शनसाठी भलीमोठी रांग, मेडिकल समोरील व्हिडीओ व्हा
त्यामुळे संसर्ग वेगात आणि सहजपणे फैलावतो. यामुळेच दोन्ही लाटांमध्ये महाराष्ट्रातील संसर्गाची स्थिती प्रमाणापेक्षा अधिक गंभीर झाल्याचं पाहायला मिळालं.
ग्रामीण भागाचे प्राबल्य असलेल्या राज्यांत स्थिती चांगली का?
ज्या राज्यांमध्ये ग्रामीण लोकसंख्या (Rural cencus)मोठ्या प्रमाणात आहे,तेथे बाधित रुग्णसंख्या आणि दर दोन्हीही कमी आहे. तसेच गंभीर केसेसचे प्रमाण देखील कमीच आहे. ग्रामीण भागात लोकसंख्येची घनता कमी असते. तेथील घरांमध्ये हवा खेळती असते. तसेच तेथील लोक खुल्या जागेत जास्त प्रमाणात काम करतात. तसेच ग्रामीण लोकांमध्ये रक्तदाब,लठ्ठपणा,मधुमेह,हृदयरोग यांसारख्या शहरी आजारांचे प्रमाण कमी असते. तसेच वायुप्रदुषण (Air Pollution)देखील कमी प्रमाणात असते.
'क्वारंटाइन टाळण्यासाठी 10 हजारांची मागणी'; मुंबईच्या हॉटेलबद्दल गायिकेचा दावा
महाराष्ट्रात वेगाने संसर्ग वाढण्यामागे अजूनही काही कारणे असू शकतात. तपासणी दर,लोकांकडून नियमांचे पालन होणं किंवा न होणं,लक्षणे दिसताच तातडीने कोविड तपासणी केल्यानं संसर्ग फैलावण्याची संख्या आणि दरावर परिणाम करताना दिसून येतात. त्यामुळे लसीकरण आणि मास्क वापरणे,सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे यांसारख्या गोष्टीच संसर्ग थोपवण्यात महत्वाचे घटक ठरु शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Maharashtra