• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • एकीकडे लसीकरण बंद आणि दुसरीकडे उपचारांसाठी ICU बेडही नाहीत, मुंबईत भयंकर परिस्थिती; कोरोना वॉररूममधली धक्कादायक माहिती

एकीकडे लसीकरण बंद आणि दुसरीकडे उपचारांसाठी ICU बेडही नाहीत, मुंबईत भयंकर परिस्थिती; कोरोना वॉररूममधली धक्कादायक माहिती

Coronavirus in Mumbai : मुंबईत कोरोनाची परिस्थिती बिकट होत असताना ही दोन संकटं आ वासून उभी राहिलीत.

  • Share this:
मुंबई, 07 एप्रिल : अखेर मुंबईत कोरोनाबाबत ज्याची भीती होती तेच होत आहे.  मुंबईतील कोरोनाची परिस्थिती (Coronavirus in Mumbai) दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. कोरोना रुग्णसंख्या इतक्या प्रमाणात (Mumbai corona cases) वाढली आहे की आता ICU बेड्ससुद्धा फूल (ICU beds for corona patient full in Mumbai) झाले आहेत. तर दुसरीकडे लशीचे डोस उपलब्ध नसल्याने (Covid-19 vaccine shortage)  लसीकरणही बंद करावे लागत आहेत. मुंबईतील कोरोना रुग्णांसाठी आता बेड्सही मिळत नाही आहेत. आयसीयू बेड्स पूर्णपणे भरले आहेत. मुंबई महापालिकेच्या कोव्हिड सेंटरमधील आयसीयू बेड्स फूल झाले आहेत, अशी माहिती मुंबईतील कोरोना वॉर रूममधून मिळत आहेत. त्यामुळे आता आयसीयू बेड्ससाठी फक्त खासगी रुग्णालयांचा पर्याय आहे. हे वाचा - maharashtra corona update : राज्यात रुग्णांची संख्या 60 हजारांजवळ! एकिकडे रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे आता लशींअभावी लसीकरणही बंद करण्याची वेळ आली आहे. पनवेलमध्ये लसीकरण बंद करण्यात आलं आहेत. पनवेलमध्ये लशीचे डोस उपलब्ध नाहीत. लशीचा पुरवठा न झाल्याने लसीकरण तात्पुरतं थांबवण्यात आल्याची माहिती पनवेल महापालिकेने दिली आहे. त्यामुळे खाजगी आणि शासकीय अशा सर्व केंद्रात लसीकरण होणार नाही. लसीकरणाची अशी परिस्थिती साताऱ्यातही आहे. कोरोना लशीची दुसरी खेप मिळाल्यानंतरच लसीकरण केलं जाईल. उद्यापासून इथंही लसीकरण केलं जाणार नाही, अशी माहिती मिळते आहेत. हे वाचा - तुम्ही लोकांचा जीव धोक्यात घालताय, केंद्रीय आरोग्यमंत्री राज्य सरकारवर भडकले कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असताना आता कोरोना प्रतिबंधक लसींचा राज्यात तुटवडानिर्माण झाला आहे. यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी आणखी वाढली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत कोविड-19 लस साठा हा एक ते दोन दिवसांत संपेल आणि त्यासंदर्भात केंद्र सरकारला माहिती दिली आहे अशी माहिती राज्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी दिली. बुधवारी सकाळपर्यंत राज्यात सुमारे 14 लाख लशींचे डोस उपलब्ध असल्याची माहिती राज्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.
Published by:Priya Lad
First published: