जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / 'जे अनुभवलं त्यामुळे अजून झोप लागत नाही..', नावाजलेल्या BKC कोव्हिड सेंटरचं भयाण वास्तव?

'जे अनुभवलं त्यामुळे अजून झोप लागत नाही..', नावाजलेल्या BKC कोव्हिड सेंटरचं भयाण वास्तव?

वयोवृद्ध व्यक्ती डायबेटीज पेशंटला कोरोना झाल्यास धोका वाढतो आणि याच पेशंटला ब्लॅक फंगस इन्फेक्शनची भितीही जास्त असते. डायबेटीज पेशंटच्या शरीरात ग्लुकोजचं प्रमाण जास्त असतं. ऍन्टी-फंगल ट्रिटमेंटनंतरही जास्त काळ औषधोपचार घ्यावे लागतात.

वयोवृद्ध व्यक्ती डायबेटीज पेशंटला कोरोना झाल्यास धोका वाढतो आणि याच पेशंटला ब्लॅक फंगस इन्फेक्शनची भितीही जास्त असते. डायबेटीज पेशंटच्या शरीरात ग्लुकोजचं प्रमाण जास्त असतं. ऍन्टी-फंगल ट्रिटमेंटनंतरही जास्त काळ औषधोपचार घ्यावे लागतात.

या व्यक्तीने फेसबुक (Facebook) आणि ट्विटरवर (Twitter) एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी मुंबईमधील बीकेसी (BKC Covid Center, Mumbai) याठिकाणी असणाऱ्या कोव्हिड सेंटरमधील एकंदरित व्यवस्थेवर ताशेरे ओढले आहेत (फीचर इमेज- सांकेतिक फोटो)

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 07 एप्रिल: सोशल मीडिया हे आज अनेकांसाठी व्यक्त होण्याचं साधन बनलं आहे. दरम्यान कोरोना काळात (Coronavirus) अनेकांनी या सध्याच्या परिस्थितीबाबत आपापली मतं सोशल मीडियावर (Social Media) मांडली आहे. राज्य-केंद्र सरकार, कोव्हिडबाबत न घेतली जाणारी खबरदारी, घ्यावयाची काळजी याबाबतीत अनेकांनी सोशल मीडियावर प्रत्येकाची मतं मांडली आहे. दरम्यान सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट व्हायरल होते आहे. संजय पाटील या युजरनी फेसबुक (Facebook) आणि ट्विटरवर (Twitter) एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी मुंबईमधील बीकेसी (BKC Covid Center, Mumbai) याठिकाणी असणाऱ्या कोव्हिड सेंटरमधील एकंदरित व्यवस्थेवर ताशेरे ओढले आहेत. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. पाटील यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटल्यानुसार ते याठिकाणी 13 दिवस उपचार घेत होते. सर्वच काही चुकीचं होतं असं त्यांचं म्हणणं नाही, पण प्रोटोकॉलचा अभाव या समस्येवर त्यांनी बोट ठेवलं आहे. त्यांनी सरकारवर टीका करत असं म्हटलं आहे की, ‘सरकार या भल्या मोठ्या कोविड सेंटर्सचा जो काही डंका वाजवत आहे, त्याचा कोणीतरी review घ्यायची गरज आहे.’ ’…माणसं उन्हानं मरतील’ याठिकाणी उन्हाळ्याबाबत कोणतीही उपाययोजना नाही, ही समस्या देखील पाटील यांनी त्यांच्या पोस्टमधून मांडली आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की, ‘मा. आयुक्तांनी या कोविड सेंटर्स ना एकदा भेट द्यावी, ही व्यवस्था उन्हाळ्यासाठी नाही, माणसं उन्हाने मरतील, अशी इथे परिस्थिती आहे. शिवाय इथे उपचार घेणाऱ्या प्रत्येक पेशंट ला कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट त्याला दिली जाते हे समजून घेण्याचा नक्कीच अधिकार आहे. शिवाय मिळणारी ट्रीटमेंट मानवी आणि स्वच्छ वातावरणात मिळायला हवी. डॉक्टर्स आणि नर्सेस यांच्यावर नक्कीच ताण आहे, पण याचा अर्थ ते पेशंट शी हवं तसं वागू शकत नाहीत. कोरोना ट्रीटमेंट च्या प्रोटोकॉल बद्दल तर कोणालाच कल्पना नसते. आपल्याला डॉक्टर्स आणि नर्सेस ना या प्रोटोकॉल ची रात्री 2 वाजता आठवण करून द्यावी लागावी यापेक्षा ते दुर्दैव काय? माझी फाईल बघून मला औषधं द्या हे मी शेवटपर्यंत दररोज बदलणाऱ्या डॉक्टर आणि नर्सेस ना सांगत राहिलो.’

बीकेसी कोविड सेंटर मध्ये 13 दिवस ट्रीटमेंट घेतल्यानंतर तिथे जे बरे वाईट अनुभव आले त्यावर लिहायचं आहे. पण अजून अंगात… Posted by Sanjay Patil on  Tuesday, 6 April 2021

जाहिरात

‘पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती, तिथून किडे बाहेर आले’ पाटील यांनी दावा केला आहे की, या पोस्टमध्ये त्यांनी काही आरोप केले आहेत त्यांचे त्यांच्याकडे फोटो देखील आहेत. ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी काही व्हिडीओ देखील शेअर केले आहेत. याठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी गेल्यानंतरही साडेपाच तासानंतर बेड मिळाल्याचं ते म्हणाले. याबाबतीत पाटील लिहितात की, ‘पहिले 8 दिवस बेडवर स्वच्छ चादर मिळाली नाही. पहिले 3 दिवस जोपर्यंत भांडलो नाही तोपर्यंत टॉयलेट स्वच्छ झालं नव्हतं. टॉयलेट्स मोडकळीला आली आहेत. जी बाथरूम्स आहेत, त्यात कपडे अडकवायची सोय नाही, साबण ठेवायला जागा नाही, आंघोळ केल्यावर सर्व पाणी बाहेर येतं. जिथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती तिथे कित्येक दिवस स्वच्छता केली गेली नव्हती, एक दिवस ढीगभर किडे तिथून बाहेर आले (माझ्याकडे या सगळ्याचे फोटो आहेत). अनके कोपऱ्यात लोकं गुटखा आणि तंबाखू खाऊन थुकले आहेत. (इथल्या अस्वच्छ परिस्थितीला लोकं नक्कीच जास्त जबाबदार आहेत).’ त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, ‘कोव्हिड पेशंटला नाश्ता म्हणून वडा पाव, समोसा पाव? आधीच तोंडाला चव नसते, त्यात जेवणाची परिस्थिती खूप बिकट होती. इथे दिवस भर जसजसं सूर्य वाढत जातो त्याप्रमाणे उष्णता वाढत जाते, पेशंट उन्हाने हैराण होतात. रात्री इथे प्रचंड थंडी पडते. ही व्यवस्था उन्हाळ्यात काम नाही करू शकत. माणसं उन्हाने मरतील. डासांचं साम्राज्य आहे. संध्याकाळी पाच वाजले की सुरुवात होते.’

मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची विनंती पाटील यांनी मांडलेला अनुभव अत्यंत भयावह आहे. अजूनही जे अनुभवलं त्यामुळे झोप लागत नाही असं त्यांनी पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे. पोस्टचा शेवट करताना त्यांनी असं लिहिलं आहे की, ‘सगळंच वाईट आहे असं नाही, पण प्रोटोकॉल चा अभाव, लोकांनी शिस्त न पाळणं, सरकारी व्यवस्था म्हणून मानवी ट्रीटमेंट मिळू नये असे नाही, लोकं आधीच घाबरलेली असतात, त्यात पेशंट ना योग्य ती माहिती दिली जात नाही, त्यामुळे आणखी गोंधळ वाढतो. अनेक गोष्टी आहेत पण अजूनही रात्री झोप लागत नाही, इथे जे अनुभवलं आहे त्यामुळे!’ दरम्यान ट्विटरवर पोस्ट शेअर करताना पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना देखील टॅग केलं आहे. त्यांनी निदान रुग्णांसाठी तरी या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात