नवी दिल्ली, 16 जून : कोरोना (Coronavirus) हा आजार फुफ्फुसाशी (Lungs) संबधित असून, तो नॉव्हेल कोरोनाव्हायरसच्या (SARS-COV-2) संसर्गामुळे होतो, हे आपल्यास माहिती आहे. जागतिक आरोग्य संघटनेला या आजाराचा पहिला रुग्ण 31 डिसेंबर 2019 रोजी आढळून आला होता. त्यावेळी या आजाराचे नामकरण कोविड -19 (Covid-19) असं करण्यात आले. हे विषाणू मानवी शरीरात तोंड किंवा नाकावाटे ड्रॉपलेटच्या माध्यमातून प्रवेश करतात. त्यानंतर श्वासनलिकेच्या मार्गाने फुफ्फुसात प्रवेश करतात. काही कोरोना रुग्णांमध्ये न्युमोनियासारखी लक्षणंही दिसतात. पण सर्वसामान्य न्युमोनियापेक्षा (Pneumonia) कोरोना न्युमोनिया (Corona pneumonia) किती वेगळा आहे, पाहुयात.
फुफ्फुसं म्हणजे काय?
उत्तर – मानवी शरीरातील फुफ्फुसं (Lungs) हा अवयव श्वासनलिकेव्दारे नाक आणि तोंडाशी जोडलेला असतो. उजवीकडील फुफ्फुस हे प्रामुख्याने 3 स्तरात विभागलेले आहे. ज्याला अप्पर, मध्यम आणि लोअर लोब (Lobe) असं म्हणतात. डावीकडील फुफ्फुस हे वर आणि खाली अशा 2 भागात विभागलेले असते. आपल्या आसपासची 20 टक्के शुद्ध हवा तोंड आणि नाकाद्वारे श्वासनलिकेच्या माध्यमातून फुफ्फुसात घेतली जाते. फुफ्फुसांमध्ये असंख्य अल्वेवोली (Alveoli) किंवा वायुकोष्ठिका (फुग्यांच्या गुच्छाप्रमाणे) असतात. हे अल्वेवोली श्वास घेतल्यानंतर हवा भरल्याने विस्तारतात आणि वायू बाहेर सोडल्यावर आकुंचन पावतात.
हे वाचा - Explainer : कोणत्या कोरोना रुग्णासाठी कोणते उपचार? कशी ठरते Corona treatment
अल्वेली रक्तामध्ये ऑक्सिजन स्थानांतरित करते आणि हे रक्त डोक्यापासून पायापर्यंत सर्व अवयवांना पुरवले जाते. त्याबदल्यात पेशींमधून कार्बन डाय ऑक्साईडसारखे अनावश्यक घटक बाहेर फेकले जातात, या प्रक्रियेला एअर एक्चेंज (Air Exchange) असं म्हणतात. मानवी शरीरातील सर्व पेशी, उती आणि अवयवांना कार्यक्षम राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते.
2) न्यूमोनिया म्हणजे काय?
उत्तर – न्यूमोनिया (Pneumonia) हा फुफ्फुसांचा आजार असून, या आजारात रक्तास आवश्यक ऑक्सिजन पुरवठा करण्याचे कार्य मंदावते. बुरशी, विषाणू (Virus) किंवा जीवाणूंचा संसर्ग झाल्यास हा आजार उदभवतो. न्युमोनियामध्ये अल्वोलीमध्ये द्रव साठतो आणि हवा साठण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही. त्यामुळे रक्तात ऑक्सिजन मिसळण्याच्या प्रक्रियेवर मोठा परिणाम होतो.
3) न्युमोनिया कसा होतो?
उत्तर – सुक्ष्मजंतू अल्वोलीमध्ये पसरतात आणि ही जागा पूर्णतः व्यापून टाकतात. आपली रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) या सुक्ष्मजंतूंच्या विरोधात लढा देतात. मात्र इन्फ्लेमेशनमुळे फुफ्फुसांमध्ये द्रव आणि मृतपेशी तयार होत असल्याने एअर एक्सचेंजला जागा मिळत नाही. त्यामुळे खोकला आणि श्वास लागणे आदी लक्षणे उदभवू शकतात.
4) कोविड न्यूमोनिया आणि अन्य न्यूमोनियामध्ये काय फरक आहे?
उत्तर – कोरोना विषाणूंमुळे उदभवणारा न्यूमोनिया आणि इतर विषाणू, बॅक्टेरिया किंवा बुरशीमुळे होणारा न्यूमोनिया यामधील फरक ओळखणे फारच कठीण आहे. त्यामुळे अचूक निदानासाठी लॅबोरेटरी चाचण्या करणे आवश्यक असते. काही संशोधनात असं आढळून आलं आहे की कोरोनाव्हायरस (Corona Virus) फुफ्फुसातील छोट्या जागेवर कब्जा करतो. त्यानंतर फुफ्फुसात पसरण्यासाठी बरेच दिवस किंवा आठवड्यांपर्यंत ते स्वतःच्या रोगप्रतिकार पेशींचा वापर करतात. संसर्ग हळूहळू फुफ्फुसाकडे (Lungs) जात असताना ताप, खोकला, श्वासोच्छवासास त्रास होणे आदी लक्षणे दिसू लागतात. कोविड -19च्या रुग्णांमध्ये मूत्रपिंड, ह्दय आणि अन्य अवयवांना नुकसान पोहचते.
5) कोविड-19 चे सर्व रुग्ण न्यूमोनियाने ग्रस्त असतात?
उत्तर – नाही. न्यूमोनिया हे कोविड-19 चे सामान्य सादरीकरण नाही. उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदय आणि फुफ्फुसाचे विकार, लठ्ठपणा, कॅन्सर (Cancer) असे अन्य आजार असलेल्या 60 किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या व्यक्ती या संसर्गामुळे गंभीर आजारी पडू शकतात. तथापि, कोविड-19 मुळे कोणीही आजारी पडू शकतो किंवा कोणत्याही वयाची व्यक्ती गंभीर आजारी पडू शकते.
हे वाचा - नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीनुसार कोरोना लशीच्या प्रभावावर काही परिणाम होतो का?
ज्यांना अशी लक्षणे दिसतात त्यांच्यापैकी बहुतेक (80 टक्के) रुग्णालयात राहून उपचार न घेताही या आजारातून बरे होतात. सुमारे 15 टक्के रुग्णांमध्ये हा आजार गंभीर स्वरुप धारण करतो आणि त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता भासते आणि 5 टक्के रुग्ण गंभीर स्वरुपात आजारी पडतात आणि त्यांना व्हेन्टिलेटर( Ventilator) आणि इनटेन्सिव्ह केअरची (ICU) गरज भासते. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू होण्याची शक्यता खूपच कमी असते. परंतु, तणाव आणि चिंता यामुळे लक्षणे वाढून ऑक्सिजनची मागणी वाढते. त्यामुळे संसर्ग झाला तरी रुग्णांनी योग्य प्रकारे शारीरिक आणि मानसिक विश्रांती घेणं आवश्यक आहे.
6) योग्य उपचार घेतल्यास कोरोना किती दिवसांत बरा होतो?
उत्तर – इतर न्यूमोनियाच्या तुलनेत कोविड न्यूमोनिया बरा होण्यास आठवडे किंवा महिन्याचा कालावधी लागतो. हा न्यूमोनिया पूर्णतः बरा होण्यासाठी काही केसेसमध्ये 6 महिन्यांचाही कालावधी लागतो. काही रुग्णांमध्ये फुफ्फुसांचे कायमचे नुकसान होते. परंतु, ऑक्सिजन (Oxygen) सॅच्युरेशन ठेवण्यासाठी फुफ्फुसाचा उर्वरित चांगला भाग कार्य करतो.
7) पोस्ट कोविड रिकव्हरीसाठी काय उपाययोजना कराव्यात?
उत्तर – उपचारांसाठी सातत्याने फिजिशियनच्या संपर्कात राहावे. त्यांनी दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे. प्रोन पोझिशन चेस्ट फिजीओथेरपीचा रोज सराव करावा. जीवनशैली आरोग्यदायी (Fit) असावी आणि आहार सकस घ्यावा. तसेच मानसिक आरोग्यासाठी मेडिटेशन आणि योगावर भर द्यावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus