मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Cyber Attack | सायबर हल्ल्यांमुळे विमान आणि हेलिकॉप्टर क्रॅश होऊ शकतात का?

Cyber Attack | सायबर हल्ल्यांमुळे विमान आणि हेलिकॉप्टर क्रॅश होऊ शकतात का?

Cyber Hack In Aerospace Oprating System : एरोस्पेस क्षेत्रात (Aerospace Sector) दिवसेंदिवस डिजीटल क्रांती (Digital technology) होत आहे. मात्र, यामुळे सायबर हल्ल्याचा धोकाही वाढला असल्याची भीती अमेरिका आणि युरोपमधील सायबर तज्ज्ञांनी (Cyber Experts) व्यक्त केली आहे. वास्तविक, विमान किंवा हेलिकॉप्टरच्या ऑपरेटिंग सिस्टीमचा कोड ओळखणं कठीण आहे. पण, असे झाल्यास आश्चर्य वाटू नये, असे तज्ज्ञांचे मत आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 10 डिसेंबर : चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या हेलिकॉप्टर अपघातानंतर अशा उड्डाणांच्या सुरक्षेबाबत अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत. जरी Mi 17 हेलिकॉप्टर अतिशय सुरक्षित आणि टँकसारखे मजबूत मानले गेले आहे. तरीही, आता एरोस्पेस हे जगभरातील सायबर हल्लेखोरांसाठी एक नवीन लक्ष्य म्हणून उदयास येत आहे. याबाबत युरोप आणि अमेरिकेत विविध अहवाल प्रसिद्ध झाले आहेत. अमेरिकेत अशा घटना टाळण्यासाठी रिहर्सलही सुरू झाल्या आहेत.

19 सप्टेंबर 2016 रोजी, बोईंग 757 विमान अटलांटिक विमानतळावर उतरताच, त्याची ऑपरेटिंग सिस्टम हॅक झाल्याचे आढळून आले. कोणीतरी बाहेरून बसून त्याची व्यवस्था ताब्यात घेतली होती. दरवाजे उघडता येत नव्हते आणि विमानातील कोणतीही यंत्रणा पायलटच्या निर्देशांचे पालन करत नव्हती. कॉकपिटमध्ये बसलेले पायलट आणि प्रवासी यामुळे अचंबित झाले होते.

ही एक दिलासा देणारी बाब होती की ती तालीम होती, जी अमेरिकेच्या होमलँड विभागाने केली होती. विमानात न बसता बाहेरून विमानाच्या ऑपरेटिंग सिस्टीमचा भंग होऊ शकतो का, याची ते रिहर्सल करत होते. बाहेर बसलेल्या हॅकरने खूप चांगलं काम केलं. मात्र, विमानाच्या ऑपरेटिंग आणि सिक्युरिटी सिस्टिमचा कोड जाणून घेणे सोपे नसते.

अमेरिकेने दिला इशारा

2019 मध्ये, यूएस डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीने विमान आणि हेलिकॉप्टर पायलटसाठी एक अलर्ट जारी केला आहे. विमानांची यंत्रणा हॅक करून हॅकर्स मोठे नुकसान करू शकतात, असं यात म्हटलं आहे. यासाठी सिस्टीमची सुरक्षा सुधारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचं काम काय असतं? किती स्टाफ असतो आणि पगार किती?

एरोस्पेसमध्ये चिनी हॅकर्सचा शिरकाव?

अशा परिस्थितीला तोंड देता यावे यासाठी अमेरिका गेली काही वर्षे सातत्याने अशी तालीम करत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला चीनमधील एका सायबर गटाला जगभरातील विमानातील प्रवासी आणि इतर माहिती मिळवता येत असल्याचे आढळून आले होते. गेल्या काही वर्षांपासून ते सातत्याने असे काहीतरी करत आहेत. सायबर हल्ल्यांचे हँडबुक थेल्स अँड व्हेरिएंट्स म्हणते की जगातील सायबर हल्लेखोरांनी लक्ष्य केलेल्या पाच क्षेत्रांमध्ये एरोस्पेस देखील आहे.

सायबर दहशतवादी एरोस्पेससाठी मोठा धोका बनू शकतात

ऑक्टोबर 20 मध्ये आलेल्या एका ब्रिटिश रिपोर्टनुसार सायबर दहशतवादी हेलिकॉप्टर आणि विमानाच्या ऑनबोर्ड संगणक प्रणाली हॅक करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आले आहे. हे हॅकर्स यात यशस्वी झाल्यास ते कोणतेही विमान किंवा हेलिकॉप्टर क्रॅश करू शकतात.

विमान आणि हेलिकॉप्टरच्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये काय होऊ शकतं?

या अहवालानंतर, यूके अधिकाऱ्यांनी कबूल केले की सायबर दहशतवादी विमानात न येता सॉफ्टवेअर व्हायरस, रफ कॉम्प्युटर प्रोग्राम्स आणि ईमेलद्वारे प्रवासी विमान किंवा हेलिकॉप्टरच्या सिस्टममध्ये घुसू शकतात. या अहवालात असेही म्हटले आहे की अशा प्रकारच्या सायबर हल्ल्यांची काही प्रकरणे विमान वाहतूक क्षेत्रातही पाहायला मिळाली आहेत.

व्हीआयपींसाठी विमान आणि हेलिकॉप्टरचे सुरक्षा नियम काय आहेत?

कोणते 5 क्षेत्र सायबर हल्लेखोरांचे लक्ष्य आहेत?

सध्या सायबर हल्लेखोरांनी लक्ष्य केलेल्या जगातील प्रमुख क्षेत्रांमध्ये सरकार आणि संरक्षण, वित्त, ऊर्जा, वाहतूक आणि एरोस्पेस यांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांत इतर क्षेत्रांप्रमाणेच विमान वाहतूक क्षेत्रातही डिजिटल तंत्रज्ञानाने पाऊल ठेवले आहे. आता विमान कंपन्या, विमानतळांची सर्व कामे डिजिटल तंत्रज्ञानाने केली जात असल्याने नवीन शोधाप्रमाणे आता जहाजांचे नियंत्रण संगणकावर आधारित ऑपरेटिंग सिस्टीमने केले जात आहे.

सायबर हल्ले करून हॅकर्स हेलिकॉप्टर आणि विमानांवर पूर्ण नियंत्रण ठेवू शकतात, असे अमेरिकन सायबर सुरक्षा तज्ज्ञ सतत सांगत आहेत. ते म्हणाले, की संपूर्ण प्रणालीशी छेडछाड केली जाऊ शकते.

First published:

Tags: Cyber crime, Helicopter, Indian army