मराठी बातम्या /बातम्या /explainer /

मानवी मेंदू शरीराद्वारे वापरल्या जाणार्‍या उर्जेपेक्षा 10 पट जास्त ऊर्जा का खर्च करतो? उत्तर सापडलं

मानवी मेंदू शरीराद्वारे वापरल्या जाणार्‍या उर्जेपेक्षा 10 पट जास्त ऊर्जा का खर्च करतो? उत्तर सापडलं

मानवी मेंदू (Brain) शरीराद्वारे वापरल्या जाणार्‍या उर्जेपेक्षा 10 पट जास्त ऊर्जा (Energy) वापरतो. अगदी आराम करताना, झोपताना, कोमात असतानाही हा वापर खूप जास्त आहे. असे का घडते या प्रश्नाचे उत्तर शास्त्रज्ञ खूप दिवस शोधत होते. नवीन अभ्यासात संशोधकांनी यासाठी जबाबदार असलेल्या न्यूरॉनचा शोध लावला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 4 डिसेंबर: गाडीला चालवण्यासाठी जशी इंधनाची गरज भासते. तशीच गरज आपल्या शरीरालाही (Human Body) हालचाल करण्यासाठी लागत असते. पण, आपल्या शरीरात कोणता अवयव सर्वात जास्त उर्जा वापरतो याची काही कल्पना आहे का? अलीकडेच सायन्स अॅडव्हान्सेसमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात या संदर्भात माहिती समोर आली आहे. याद मानवी मेंदूचा अभ्यास (Human Brain) करण्यात आला आहे. मानवी मेंदू संपूर्ण शरीराच्या ऊर्जा वापरापेक्षा दहापट जास्त खर्च करतो. तो विश्रांती घेत असताना सरासरी व्यक्तीच्या अन्नातून 20 टक्के ऊर्जा वापरतो. मात्र, हे का घडले हे अद्याप कळू शकले नाही. मेंदू निष्क्रिय असतानाही त्याला इतकी ऊर्जा का लागते, हे रहस्य जाणून घेणे मानवी न्यूरोसायन्ससाठी (Neuroscience) खूप महत्त्वाचे होते. आता उत्तर सापडले आहे.

विशिष्ट न्यूरॉनची भूमिका

शास्त्रज्ञांनी मेंदूमध्ये लपलेल्या अशा न्यूरॉनचा शोध लावला आहे जो आपल्या इंधनाचा प्रचंड वापर करतो. जेव्हा आपल्या मेंदूतील एक पेशी दुसऱ्या न्यूरॉनला सिग्नल पाठवते तेव्हा ते दोघांच्यामधील जागेद्वारे असे करण्यास सक्षम असते, ज्याला सायनॅप्स (synapse) म्हणतात.

न्यूरोट्रांसमीटरद्वारे संदेश

प्रथम न्यूरॉन त्यांच्या शेपटीत थैलीसारखा फुगा पाठवते जेणेकरून ते सायनॅप्सच्या अगदी जवळ पोहोचू शकतात. हा फुगा न्यूरॉनच्या न्यूरोट्रांसमीटरमध्ये खेचले जातात, जे संदेशासाठी आवरण किंवा लिफाफा म्हणून काम करतात. हे भरलेले लिफाफे नंतर न्यूरॉनच्या काठावर नेले जातात जेथे ते अस्तरांना भेटतात आणि शेवटी सायनॅप्सपर्यंत पोहोचतात.

वाद घालताना लोक मोठमोठ्याने का ओरडतात? स्टॅनफोर्ड विद्यापीठात संधोशन

सक्रिय मेंदूमध्ये ऊर्जेचा वापर

सायनॅप्सच्या रिकाम्या जागेवर पोहोचल्यावर, ट्रान्समीटर पुढच्या पेशीच्या रिसेप्टर्सला जोडला जातो आणि अशा प्रकारे ही प्रक्रिया चालू राहते. शास्त्रज्ञ मज्जातंतूंच्या या मूलभूत प्रक्रियेशी आधीच परिचित होते, जे मेंदूची भरपूर ऊर्जा घेते. सायनॅप्सच्या जवळील मज्जातंतूचे टोक किंवा टर्मिनल्स इतके उर्जेचे रेणू ठेवू शकत नाहीत. याचा अर्थ या प्रक्रियेसाठी मज्जातंतूंना स्वतःची ऊर्जा निर्माण करावी लागते.

निष्क्रिय स्थितीत काय?

हेच कारण आहे की सक्रिय मेंगू खूप ऊर्जा वापरतो. परंतु, ही यंत्रणा शांत किंवा सक्रिय नसताना उर्जा का सतत वापरली जाते. हे जाणून घेण्यासाठी संशोधकांनी मज्जातंतूंच्या शेवटच्या बिंदूंवर अनेक प्रयोग केले. यामध्ये त्यांनी सायनॅप्सच्या चयापचय स्थितीची तुलना सक्रिय आणि निष्क्रिय अशा दोन्ही स्थितींमध्ये केली.

Google लाँच करणार Smartwatch, अनोख्या कोडनेमसह Apple Watch ला देणार टक्कर

‘पंप’ची भूमिका

संशोधकांना असे आढळून आले की मेसेज फॉरवर्ड करण्यासाठी टर्मिनल्स काम करत नसतानाही, ज्या फुग्यांमध्ये मेसेज गेला होता त्यांना खूप ऊर्जा आवश्यक आहे. त्यांना आढळून आले की, 'पंप', जो प्रोटॉन्सना फुग्यांमधून पुढे पाठवण्याचे काम करतो आणि त्यांना आत खेचतो, तो कधीही विश्रांती घेत नाही. त्यामुळे त्याला नेहमी ऊर्जेची गरज असते. हा 'पंप' सायनॅप्सच्या चयापचय ऊर्जा वापरासाठी जबाबदार आहे.

नेहमी तयार राहण्याची स्थिती

या 'पंप'मध्ये गळती झाल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. सिनॅप्टिक वेसिकल्समध्ये प्रोटॉनचे सतत प्रकाशन होत असते आणि ते न्यूरोट्रांसमीटरने भरलेले असताना आणि न्यूरॉन निष्क्रिय असताना देखील हे घडते. ही चयापचय स्थिती नेहमी तयार अवस्थेत असते ज्यामध्ये न्यूरॉन टर्मिनलमध्ये अनेक सायनॅप्स आणि शेकडो फुगे असतात. त्यामुळे भरपूर ऊर्जा किंवा इंधनाचा वापर होतो.

सायन्स अॅडव्हान्सेसमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात, संशोधकांनी इतर प्रकारच्या मज्जातंतूंमध्ये या उच्च चयापचय भाराच्या परिणामाचा अभ्यास केला. मानवी मेंदूचे इंधन व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी ही तपासणी उपयुक्त ठरेल आणि या इंधन पुरवठ्याच्या बाबतीत आपला मेंदू इतका नाजूक का आहे, हेही स्पष्ट होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.

First published:

Tags: Brain, Brain stroke, Health Tips