मराठी बातम्या /बातम्या /explainer /शाळीग्राम दगडावर छिन्नी-हातोडा चालणार नाही! 6 कोटी वर्ष जुन्या खडकाची काय आहे विशिष्ट्ये?

शाळीग्राम दगडावर छिन्नी-हातोडा चालणार नाही! 6 कोटी वर्ष जुन्या खडकाची काय आहे विशिष्ट्ये?

शाळीग्राम दगडावर छिन्नी-हातोडा चालणार नाही!

शाळीग्राम दगडावर छिन्नी-हातोडा चालणार नाही!

Ayodhya News: नेपाळहून आणलेल्या महाकाय देवशिला कापण्यासाठी लोखंडी अवजारे कामी येणार नसल्याचं एका शास्त्रज्ञाने म्हटलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

अयोध्या, 4 फेब्रुवारी : अयोध्येत रामाचे भव्य मंदिर बांधले जात आहे. मंदिराच्या उभारणीबरोबरच आता देवाच्या रूपाबाबत विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, नेपाळच्या काली गंडक नदीतून दोन विशाल शालिग्राम देवशिला अयोध्येत आणण्यात आल्या आहेत. या देवशिलेतून प्रभू रामासह चार भावांच्या मूर्ती कोरल्या जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या दोन्ही महाकाय शाळीग्राम देवशिला अयोध्येच्या रामसेवक पुरममध्ये ठेवण्यात आल्या आहेत.

यामध्ये एक शिळा 26 टन तर दुसरी 14 टनांची आहे. रामाची मूर्ती बनवण्यासाठी अयोध्येत आणलेली शिळाही अनमोल आहे. हा खडक कठीण असल्याने यावर साध्या छन्नी-हातोड्याने काम होणार नाही. हिरे कापण्याची उपकरणे महाकाय खडकावर वापरली जाणार आहेत. हे आम्ही म्हणत नसून नेपाळच्या भूवैज्ञानिक शास्त्रज्ञाने या गोष्टी सांगितल्या आहेत. अनेक दिवसांपासून या खडकांवर संशोधन करणारे नेपाळचे भूवैज्ञानिक डॉ. कुलराज चालिसे हा दावा करत आहेत. सीता मातेच्या नगरातून भगवान रामाचे रूप साकारण्यासाठी आणलेल्या देवशिलेला 7 हार्नेस आहेत. म्हणूनच लोखंडी छिन्नीने कोरीव काम करता येत नाही.

वाचा - भारतातील असं मंदिर जिथं लाल तिखटानं करतात अभिषेक; निरोगी आरोग्याची होते कामना

हा दगड 6 कोटी वर्षे जुना असल्याचा दावा नेपाळचे संशोधक डॉ. कुलराज चालिसे यांनी केला आहे. परिणामी हा खडक कोरण्यासाठी लोखंडी अवजारे कुचकामी ठरणार आहेत. हा दगड कोरण्यासाठी डायमंड टूल्सची आवश्यकता असेल. लोखंडामध्ये पाच हार्नेस असतात तर या दगडाला सात हार्नेस आहेत, असं नेपाळच्या भूवैज्ञानिक शास्त्रज्ञानं म्हटलं आहे.

भूवैज्ञानिक डॉ. कुलराज चालिसे यांनी सांगितले की, जूनपासून आतापर्यंत आम्ही या दगडावर संशोधन केले आहे. प्रभू रामाची मूर्ती शालिग्राम खडकापासून बनवली जाणार असल्याचे कळले. जून महिन्यात अयोध्येत आल्यावर आम्हाला या दगडाविषयी कळाले, तेव्हापासून आम्ही या दगडावर संशोधन करत आहोत. त्याच सुमारास आम्ही या दगडाविषयीचा पहिला अहवालही दिला होता, त्यानंतर त्याचा अभ्यास करायला बराच वेळ लागला.

First published:

Tags: Ayodhya, Ram Mandir